अंकुश

अंकुश

अंकुश –

हात्ती हाकताना त्याला ताब्यात ठेवण्यासाठी माहूत च्या हातात जे शस्त्र असते त्याला अंकुश  म्हणतात. हत्ती लढाईतील एक महत्वाचा प्राणी. आनेक राजे स्व:ताच गजदल बाळगून असतात.  हत्ती चा उपयोग लढाईसाठी सोबत राजे महाराजे यावर अंबारी बांधून त्यावरून प्रवास व मिरवणूक काढतात.

हत्ती हा जलदपणे शिकणारा प्राणी असल्याने त्याचा अनेक ठिकाणी उपयोग करतात. हत्ती सोंडेने गंधाच्या संवेदनावर सहा कि.मी वरच्या माणसाचा गंध तो घेऊ शकतो.

घोड्याला लगाम , बैलाला व्यसण असत तस या महाकाय हत्तीला नियंत्रणात ठेवण्यासाठी अंकूश असत. हत्तीला स्पर्शज्ञान चांगले असल्याने त्याला माहूताने दिलेली अंकुशाची भाषा त्याला चांगली समजते. अंकुशाला वरच्या बाजूस अर्धवर्तुळाकार टोकदार शूळ असत व वरच्या बाजूस भाल्या सारख पात असत.

अखंड पोलादाच हे अंकुश असून.नक्षिदार व मजबूत  असतात. तंजावर भागातले अंकुश हे खास असतात. पितळेच्या धातुपासून कधीकधी वरचा भाग बनवला जातो. अंकुशाच्या दांडीवर सापाने वेटोळे घातलेले पाहायला मिळतात. काही अंकुशांना मागच्या बाजूला लांब बांबू लावायची सोय केलेली असते. याला भाल्यासारखे पाते असल्याने याने चांगला मारा करता येतो.

अंकुश प्राचीन काळपासून पाहायला मिळतो. गणपतीच्या हातात अंकूश कायम असतो. तो भगवान वरूण ने त्याला दिलाय. नंदा देवीच्या हातात अंकुश असतो.  काही नाण्यांवर अंकूशाचे चिन्ह कोरलेले दिसते.

अंकुशाद्वारे हात्तीला हाकण्याला राजस्थानात #वित म्हणतात.  हत्ती बेफाम झालातर त्याच्या गंडस्थलावर याने प्रहार करतात. अशी आठ शस्त्र आहेत जे तुम्ही बलवान असण्याचे संकेत देतात त्यात #अंकुश एक आहे. आनेक वाक्यप्रचारात अंकुश शब्द येतो.तर दक्षिणेत #गजांकुश नावाची अडनाव आहेत.

संतोष चंदने. चिंचवड पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here