महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा छोटासा पण प्रामाणिक उपक्रम हाती घेतले आहे. वेबसाईट वरती विविध लेखकांचे
५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.
वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

आनंदेश्वर मंदिर, लासूर

आनंदेश्वर मंदिर, लासूर

आनंदेश्वर मंदिर, लासूर, ता.दर्यापूर, जि.अमरावती.

वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले लासूरचे आनंदेश्वेर मंदिर अमरावती जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव आहे. दर्यापूर तालुका मुख्यालयापासून अकोला मार्गावर १२ कि.मी. अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर लासूर नावाचे एक छोटेसे गाव आहे. गावाच्या दक्षिण दिशेला हेमाडपंथी प्राचीनकलेचा अप्रितम नमुना असलेले शिवमंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात जागृत शिवलिंगाची स्थापना केली आहे. १२ व्या शतकात बांधलेले हे शिवमंदिर आनंदेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाते.

सद्यस्थितीत जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या तीन शाबूत हेमाडपंथी मंदिरांपैकी अग्रगण्य असलेले हे मंदिर ३५०० चौ. फुटांच्या अतिभव्य दगडी बांधकामात आहे. वरुन स्वस्तिक आकार असणाऱ्या या मंदिराला कळस नाही. हे मंदिर अष्टकोनी असून समोरच्या भागाकडून एखाद्या भल्यामोठ्या रथाला हत्ती जुंपल्यासारखे दिसते. या मंदिराचा दर्शनी भाग उत्तरेकडे असून दारे व खिडक्या पुर्व-पश्चिम व उत्तर दिशेला आहेत. संपुर्ण मंदिराचे बांधकाम एकावर एक दगडी शिळा रचून नंतर त्यावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या आतील भागात १२ खुले व भिंतीमधील ६ असे एकूण १८ खांब आहेत. लासूरचे हे मंदिर अतिशय देखणे आणि उत्तरायण काळात दुपारी बाराला सूर्य माथ्यावर असतांना इथे पडणारा प्रकाश व सावल्या पाहताना गणित आणि खगोलचे मिश्रण स्तंभीत करणारे आहे. सध्या लासूर येथील पुरातन वास्तु भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखमध्ये आहे.

माहिती साभार – फेसबुक काका आणि गुगल मामा.

फोटो – Traval_o_graphy

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here