महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,98,725

अलक्ष्मी

By Discover Maharashtra Views: 2573 3 Min Read

अलक्ष्मी –

अगदी नावाप्रमाणेच अमंगल, अवलक्षणी, अहितकारी, दानवांत वावरणारी, दारिद्र्याची देवता, अलक्ष्मी

“देवी लक्ष्मी ची मोठी बहीण”

जनमानसांत तिज बदल फारसे ज्ञात नाही,तसेच मंदीराच्या बाह्यांगावर ही तिचे शिल्पांकन अगदी तुरळक किंवा क्वचितच आढळते. सहसा अलक्ष्मी ची शिल्पे ही दक्षिण भारतात दिसून येतात.

“अलक्ष्मी” संज्ञेचे नेमके प्रयोजन ते काय?

लक्ष्मी या संज्ञेत जेवढी सात्त्विक गुढता सामावलेली आहे,अगदी त्याउलट अलक्ष्मी या संज्ञेत उग्र गुढता सामावलेली आहे…

‘लक्ष्मी मांगल्याची’ तर ‘अलक्ष्मी अमांगल्याची’…
“लक्ष्मी ऐश्वर्याची” तर “अलक्ष्मी दारिद्र्याची”…
‘लक्ष्मी मोदाची’ तर ‘अलक्ष्मी विषादाची’…

एकुण च “लक्ष्मी च्या विरुद्ध अलक्ष्मी” ही बाब अधोरेखित होते..

भागवत पुराणानुसार, समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी पुर्वी, अ-लक्ष्मी आल्याचे उल्लेख आढळतात. देवी लक्ष्मी प्रमाणेच, अ-लक्ष्मी ची उत्पत्ती देखील समुद्रातून झाल्याने तिस देवी लक्ष्मी ची मोठी बहीण मानले जाते, तिचा विवाह “उद्दालक” नामक ऋषी सोबत झाल्याचे उल्लेख आढळतात.

काही ग्रंथांनुसार, समुद्र मंथनासमयी मदीरे समवेत बाहेर आलेली स्त्री म्हणजे च “अ-लक्ष्मी” होय. भगवान विष्णू ने हाती मदीरा असल्याने तिस दानवांस सोपवले, अन् तत्पश्चात तिने असुरी शक्तींचाच स्विकार केला असावा, असे ही नानाविध तर्क वितर्क, मतप्रवाह दिसून येतात..

ज्या गृही सुख-शांती, समृद्धी नसून केवळ अशांती, अधर्म, अराजकता विराजते तेथे अ लक्ष्मी वास करते.. तर याउलट जेथे सुख शांती समृद्धी असते, तेथे मात्र देवी लक्ष्मी चे अधिकार क्षेत्र असते.. अलक्ष्मीस उग्र तिखट तथा आंबट आवडतं असा समज अाहे, त्यामुळे घराबाहेर किंवा दुकानाबाहेर लिंबू-मिरच्या टांगल्या जातात, त्यामुळे अ लक्ष्मी तिच्या असुरी शक्तींसह गृहप्रवेश न करता उंबरठ्यावर च त्याचा भोग घेते, असा एक समज रुढ अाहे, तर केवळ कमलपुष्पावरच विराजमान असलेली देवी लक्ष्मी पूजनीय मानली जाते.

अ-लक्ष्मी बाबतच्या पौराणिक वर्णनास मूर्तरूप देण्यात कलाकारास अपेक्षेपेक्षा अधिक यश आल्याचे दिसून येते. अशा शिल्पांकनात अ लक्ष्मी ही अलंकार विरहित किंवा न्यूनतम अलंकारासहीत, उग्र चर्येची मात्र नाजूक देहयष्टी ची दिसून येते.

उपरोक्त शिल्प प्रतिमेतील अलक्ष्मी च्या हाती सूप, झाडू (खराटा), सुरा व पात्र(कपाल) आहे.  अ लक्ष्मी ही दारिद्र्याची देवता, दारिद्र्याचे आगमन म्हणजे हाती पात्र.. चोरी-लूटमार गुंडगिरी अशा अधर्मी कृत्यास दर्शवणारा सुरा, धान्य पाखडून उलटे ठेविलेले सूप म्हणजे धान्याचा ही र्हास,

सूप उभे आहे म्हणजे धान्य साफ करण्यासाठी आता शिल्लक ही नाही हे सुचवले आहे आणि झाडू उभा म्हणजे मूठ खाली दाखवली आहे,हे अशा वेळी असते जेव्हा घर झाडून झालेले असते,अर्थात झाडण्यासारखी जागा ही नाही हे त्याचे प्रतीक असून खालील बाजूस नरमुंड, भूतावळ तर वाहन गाढव म्हणजे दुर्गती, अधोगती चा उच्चांकच.. सारांश, या सर्व  बाबी अवलक्षणी असून दरिद्रता, दुर्दशा अधोरेखित करतात.

Shrimala K. G.

Leave a Comment