महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,76,691

तेजस्वीनी, न्यायदेवता आहिल्यादेवी

By Discover Maharashtra Views: 1243 4 Min Read

तेजस्वीनी, न्यायदेवता आहिल्यादेवी –

होळकर घराणे हे होळ या गावाहून होळकर आडनाव पडले खंडेराव पाटिल यांना मल्हारबाबा पुञ 1693 साली जन्मले. रामनवमीस जन्मल्याने खंडेरावास नेहमी वाटत होते की पुञ पराक्रमी निघणार आणि मल्हारराव हे नाव औरंगजेबाच्या कौदेतून सुटून आलेल्या शंभूपुञ शाहूंच्या आगमनानंतर आणि 1708 राज्यरोहनानंतर शाहूकाळात विशेष नावरूपास आले. वाफगावचा सरंजाम यांना शाहूछञपतींकडून चालू होता.(आहिल्यादेवी)

शाहू छञपती यांनी दिल्लीवर मोहीम उघडून चौथाईच्या सनदा आणि मातोश्रींची सुटका करून 1720 नंतर मराठा फौजा उत्तरेत पाठवल्या त्यात पिलाजी जाधवराव, गायकवाड प्रधान बाजीराव मल्हारराव आणि उदाजी पवार , बरीच नावे समोर येतात यांना उत्तरेत धाडले आणि धार उज्जैन माळवा हे प्रांत उदाजीने आणि मल्हारबाबांनी कायम केले.

एक मेंढपाल मामाच्या गावी तळोदे जावून मामांकडून (बारगळ) घोडेसवारी तरबाजी शिक्षण घेऊन आज 1726 साली एक संस्थानिक झाले. खानदेशात कदमबांडे यांच्याकडे बारगळ हे आजोळ मल्हारबाबांचे यांच्या पितृछञ हरपल्यावर गेले तेथेच काही शिक्षण घेऊन उत्तरेत एक झंझावती वादळ बनले.

मल्हारबाबांना गौतमीबाईंपासून खंडेराव नावाचे पुञ झाले. वर्तन काही व्यवस्थित नव्हते मल्हाररावांना नेहमी काळजी लागून राहत होती. बाजीराव व बाबा मोहिमेवरून परतताना चौंडी येथे नदिकाठी तळ टाकला होता. अहिल्या आणि मैञीणी वाळूत खेळत होत्या अहिल्याने शिवपिंड तयार करून नक्षिकाम काढत असताना सैन्यातील घोडा माजून सुसाट सुटला आणि पोरींनी अहिल्ये पळ म्हणून आवाज देत पळाल्या पण अहिल्या न डगमगता शिवपिंडीवर पडली आणि घोडा बाजून सुसाट गेला बाजीराव आणि बाबा धावत येऊन अहिल्यास विचारपूस केली तु बाजूला का झाली नाही?

यावर निडरपणे आहिल्येचं उत्तर आलं …. जे आपण स्वतः तयार करावं त्याचं रक्षण करावंच

यावर बाबांनी मानोजी शिंदेस खंडेरावांना अहिल्या मागितली आणि 8/10 वर्षातच अहिल्या ही बाबांची सुन झाली. परखडपणा हुशारी पाहून तिचे शिक्षण बाबांनी सुरू ठेवले. तेज शौर्य हुशारी निडरपणा हा आहिल्याबाईंना प्राप्त झाला होता. पण कुंभेरीच्या लढाईत खंडेराव पती पडले आणि सती जाण्याची तयारी केली पण बाबांनी सती न जाऊ देता हे राज्य तुझेच तुला संभाळायचे आहे रक्षायचे आहे हे समजावून सती जाऊ दिल्या नाही.   मल्हारबाबांच्या मागे सर्व कारभार याच पाहत होत्या . अहिल्याबाई व  खंडेराव यांना दोन आप्त मालेराव व मुक्ता , मालेराव विशेष कर्तुत्वान नाही निघाले.

राज्यात भिल्लांचा उपद्रव होऊ लागला आणि सरंजामदार ही साथ देऊ लागल्याने त्यावर अहिल्याबाई यांनी केलेली कारवाही अशी ….भिल्ल याञेकरूंवर हल्ला करतात लुटतात आणि तुम्ही साथ देतात जर कोणी साथ देत असल्याचे समोर आले तर सरंजाम बंद करून कठोर शासन केले जाईल .

बाबा नेहमी मोहिमेवर असत राज्यातील भिल्लांचा मोड करण्यासाठी मुक्तेचा विवाह अशा व्यक्तीशी लावू की भिल्लांना मात देईन आणि असे यशवंतराव फणसे समोर आले इथे अशी युक्ती का चालवली तर पुञ हे करू शकत नसल्यामुळे जावा ई तर मुसद्दी हवा यासाठी ही योजना आखली आणि फणसेंबरोबर विवाह लावला गेला.

पानिपत नंतर बाबांचा ही सहारा गेला . मल्हारबाबा म्हणजे मल्हार आया मल्हार आया असे म्हणताच गणिमांचे अवसान गळे अशा बाबांची सुन म्हणून लाभणे हे नशिबच होय . पण बाबांच्या मृत्यूने हाहाकार माजला आश्रूंचा आक्रोश सुरू होता. सर्वांना सावरून सर्व सुञे आपल्या हाती घेऊन कारभार सुरू ठेवला.

प्रधानांकडून मालेरावास सुभेदारी मिळाली पण हक्क सारे अहिल्याबाईच चालवत असतं.

अहिल्याबाईंची वचक आणि प्रशासन चांदवड येथील एका मामलेदाराने बोहर्याचा छळ लावला होता. हि हकिकत अहिल्याबाईस कळताच मामलेदारास कणखर पणे ठणकावून ताकीद पञ पाठवून व्यवस्था कडक केली. एवढेच नाही तर तुकोजी होळकर यांना देखील हिशोबासाठी आहिल्यादेवी वेठिस धरत होत्या .

पञ स्वरूप खालील प्रमाणे

___ चि. तुलाराम होळकर यांस अहिल्याबाईंचा आशिर्वाद.  तुम्ही शेगाव परगाण्यात मनोमानेतल तसा जूलुम करून तसे पैसे वसूल केले याची खबर लागताच हे योग्य नसे. तुम्ही मनोमनेल ते वसूल केलेले पैसे त्याचा खुलासा लवकरच सरकारात करणे. आणि देण्याघेण्याच्या कार्यात जबरदस्ती केली तर तुमचे कार्य अक्षम्य समजले जाईल.

वरील पञावरून समजून येते की न्यायदेवता अहिल्याबाई ह्या आपल्या आप्तवर्गासही क्षमा करत नसतं आणि यामुळेच महेश्वरी अहिल्याबाईंचे राज्य धिरोदत्तपणे टिकाव धरून होते.

गडप्रेमी बाळासाहेब पवार

Leave a comment