नर्मदे पल्याड जाऊन बुरानपुर जिंकणारी मराठ्यांच्या इतिहासातील एकमेव स्त्री मातोश्री तुळसाबाई हणमंतराव नाईक निंबाळकर
सरलष्कर हणमंतराव नाईक निंबाळकर यांचे निधन 1705 मध्ये झाले.यानंतर महाराणी ताराराणी यांनी हनुमंतराव यांचे पुत्र हैबतराव नाईक निंबाळकर यास करके सांगितली व या गंगाखेड खानदेश आणि वराड भागात रसद मारण्यासाठी ठेवले यावेळी औरंगजेबाच्या मृत्यू नंतर थोरले शाहू महाराज सुटून येताना सरदार नेमाजी शिंदे व सरलष्कर हैबतराव नाईक निंबाळकर हे छत्रपती थोरले शाहू महाराजांना जाऊन मिळाले व 1707 मध्ये सातारा येथे थोरले शाहू महाराजांनी आपल्या राज्याभिषेक करून घेतला.तेव्हा हैबतराव निंबाळकर यास पुन्हा सरलष्करकी दिली.त्याबद्दलचा पुरावा व उल्लेख खालील लेखात पुढे येईलच या काळत गंगाथडी प्रदेशात मिरजगाव वास्तव्यास होते.
सन १७०९ मध्ये भरपाईच्या अर्ज विनंत्या करूनही मुगल सुभेदार मीर अहमद खान उत्तर देईना. पंधरा सोळा हजार घोडेस्वार पाठवून अठरा लाख चौथाईची रक्कम वसूल करून द्यावी अशी मागणी केली होती. कारण त्या बदल्यात बऱ्हाणपुर शहर आणि तिथल्या सराईत राहणाऱ्या मुगल अधिकारी लोकांचे रक्षण करण्याचे आश्वासन मराठ्यांनी मोगलांना दिले होते. पण सुभेदाराला वाटले की, एका विधवा बाईने आता काय होईल या विचाराने दुर्लक्ष केले. तिने बऱ्हाणपुरला वेढा दिला. मराठी विधवा बाईने केलेल्या आक्रमणास व मागणीला तोंड देण्यासाठी सुभेदार आणि फौजदार यांनी सैन्यबळाच्या जोरावर त्या शहराकडे आगेकूच केले. मुगल सैन्याच्या आगमनाची वार्ता तुळसीबाईस समजली तिने मराठा सैन्याची दोन गटात विभागणी केली. पाच हजार घोडेस्वारांची एक तुकडी तिने मीर अहमद खान याला बऱ्हाणपुरकडे रोखण्यासाठी पाठवली आणि उरलेल्या सैन्याच्या बळावर तिने शहर लुटण्याची योजना आखली. मराठ्यांची सेना व मीर अहमद खान याच्या नेतृत्वाखाली लढा देणारी मुगल सैन्य यांच्यात चकमकी घडल्या. त्यात मीर अहमद खान जखमी झाला.परंतु त्याला त्याच वेळी मराठा सैन्याने बऱ्हाणपूर लुटले ही बातमी कळली.तेव्हा तो बुऱ्हाणपुरच्या दिशेने निघाला. या चकमकीत जाफरखान हा ही मुघलांच्या बाजूने मराठ्यांविरूध्द लढला. परंतु मराठा सैन्याचा मारा एवढा जबरदस्त होता की त्यापुढे मुगला़ंच्या सैन्याचे व अहमदखानाचे मुलाचे प्रयत्न असफल ठरले आणि मुगल सैन्याने पलायन केले. काही सैनिक जे मराठ्यांच्या हाती लागले ते त्यांनी कैद केले. मीर अहमद खान मात्र जखमी झाला आणि मराठ्यांशी लढतांना घोड्यावरून खाली पडून मरण पावला. बुऱ्हाणपूर मध्ये अडकून पडलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी पैसा देवून सुटका करून घेतली. बेरारच्या सुभेदार सय्यद रूस्तान खान मदतीला मोठे सैन्य घेऊन येत आहेत ही वार्ता कळल्यावर मगच समझोता झाला आणि वेढा उठला.
सरलष्कर हैबतराव निंबाळकर यांच्या इतिहास कामगिरी संक्षिप्त
सन १६९४ सालीं संताजी घोरपडे याचे हाताखालीं, मराठ्यांनीं औरंगजेबाच्या छावणीच्या उत्तरेकडील मुलूख लुटला, व रामचंद्रपंतांनीं पश्चिमेस सोलापुरापर्यंत लढाई चालविली. इ. सन १६९५ त परसोजी भोंसले व हैबतराव निंबाळकर यांना, दिल्लीहून येणा-या बादशहाच्या पलटणींना त्रास देत रहावें ह्मणून व-हाड व गंगथडी या प्रांतांतच सोडून संताजीनें आपण स्वतः कर्नाटकापर्यंत चाल करून वेढा घातलेल्या लोकांवर हल्ला केला आणि त्यांस पिटाळून लाविलें,
छत्रपती थोरले
शाहू महाराज दिल्लीहून येतांना त्यांणीं वऱ्हाड व खानदेशातील दोन सरदार येऊन मिळाले येत हैबतराव निंबाळकर व नेमाजी शिंदा वगैरे सरदार अनुकूल करून एकंदर १५००० फौज जमवून साताऱ्यास येत असतां ताराबाईकडील धनाजी जाधवराव व प्रतिनिधि फौजसुध्दां छत्रपती थोरले शाहू महाराजावर चालून आले. त्यांशी लढाई पुण्यानजीक खेड येथे होताना सेनापती धनाजीराव जाधवराव छत्रपती शाहूमहाराजास मिळाला.
सरलष्कर हैबतराव निंबाळकर यासी सरलष्कर दिले याबद्दल ऐतिहासिक
वाई येथील शेखमिरे ह्यांस आपल्या कडे करून छत्रपती शाहूनें तो किल्ला १७०७ च्या डिसेंबरांत काबीज केला, व पुढें एका महिन्यानें म्हणजे १७०८ च्या जानेवारींत तो राज्याभिषित्त्क झाला. परशराम त्रिंबक कैर्देत असल्यामुळें गदाधर प्रल्हाद यास प्रतिनिधिपद मिळाले; बहिरोपंत पिंगळ्यास पेशवाई मिळाली; सखो विठ्ठलास न्यायाधिशी व होनो अनंत यास सेनाकर्तेपद प्राप्त झालें. धनाजी जाधव यास सेनापतिपद व हैबतराव निंबाळकरास सरलष्करपद मिळालें. सचिव अमात्य वगैरे जे सरदार ताराबाईबरोबर साता-याहून पन्हाळ्याकडे गेले
सरलष्कर हैबतराव निंबाळकर धारातीर्थी पडले यांच्या नोंद
‘तुळसाबाई निंंबाळकर हैबतरावाची मातुश्री यांस हैबतराव चांद्याचे भांडणीं स्वामिकार्यावरी पडल्याबद्दल शाहूनें इनाम गांव दिला, खमस अशर.’ याच संबंधांत ता. ५ मे, स. १७१४ च्या अखबारेंतील मजकूर, ‘हैबतराव निंबाळकर मारला, त्याचा सूड घेण्यासाठीं सुलतानजी, गंगाराम वगैरे सरदार चांद्यावर धावून आले, चांद्याचा दिवाण परशा त्यांजवर चालून गेला. ‘
कान्होजी चांद्याचे बाजूस मोहिमेवर असतां त्याचे मदतीस हैबतराव निंबाळकर गेला, तो लढाईत ठार पडला. यावरून शाहूचा आरंभींचा उद्योग अजमावतां येतो. हैबतराव निंबाळकरास सरलष्कर पद होतें तें त्याचा पुत्र सुलतानजी यास देण्यांत आलें
खालील राजपत्र हे छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारातील असून यामध्ये मातोश्री तुळसाबाई साहेब नाईक निंबाळकर यांचा उल्लेख हैबतराव नाईक निंबाळकर यांच्या मातोश्री म्हणून आला आहे यासाठी सदर पत्र या ठिकाणी देत असून देत आहोत जे मातोश्री तुळसाबाई साहेब कोण होत्या हे सांगण्यास पुरस्कार आहे त्या सरलष्कर हणमंतराव नाईक निंबाळकर यांच्या पत्नी होत्या.
यादी
राजपत्र
तुलसाई हैवतरायाजी आई त्याकडे कृष्णाजी नाईक याचे कर्ज तुम्हाकडे आहे ते देखत पत्र देणे. उर्जूर न करणे. बोभट येऊ न देणे १ भावसिंग टोके यास पत्र. गण-जोसी याचे कर्ज देणे आहे ते देत नाही. तर देखत पत्र बोभाट येऊ न देणे देणे
सुलतानजी निबालकर यास पत्र खंडो मोरेस्त्रर तुमचे निसबतीने पाथर परगणियात आहे. त्याकडे कृष्णाजी नाईक याचे कर्ज आहे. त्यास तुम्ही ताकीद करून देवणे
१ १ खंडो मोरेस्वर यास पत्र. नाई-काचे कर्ज आहे ते देखत पत्र देणे.२
येकून पत्रं च्यार देणें.
खालील पत्र हे मोडीतील असुन सादर पत्रात छत्रपती थोरले शाहू महाराजांनी मातोश्री तुळसाबाई साहेब नाईक निंबाळकर यासी त्यांची पुत्र सरलष्कर हैबतराव नाईक निंबाळकर हे धारातीर्थी पडल्यामुळे इनाम दिला असून यापूर्वी छत्रपती घराण्याकडून या आष्टी, भाळवणी , खर्डा परिसरातली देशमुखी निंबाळकर यांच्याकडे असल्याचेही उल्लेख या पत्रात आलेले आहेत. या देशमुखी संदर्भातील उल्लेखात सेनापती सिदोजीराव नाईक निंबाळकर, सरलस्कर हणमंतराव नाईक निंबाळकर, सरलष्कर हैबतराव नाईक निंबाळकर यांचा उल्लेख आला असून मातोश्री तुळसाबाई साहेब या सरलष्कर हणुमंतराव नाईक निंबाळकर यांच्या पत्नी असून त्या हैबतराव नाईक निंबाळकर यांच्या मातोश्री आहेत याचा उल्लेख वरील राजपत्रात आलेला आहे. तो पहावा तसेच या घराण्याकडे भाळवणी,खर्डा ,आष्टा येथील देशमुख असल्याचे सांगितलं जात होतं पण याबद्दलच ऐतिहासिक कागद आजपर्यंत ती माझ्या वाचण्यात आलेले नव्हतं सदर पत्रामध्ये याबाबत देशमुख असल्याचा खुलासा झाला आहे. यामुळे हे पत्र ऐतिहासिक असून मराठ्यांच्या इतिहासातील एका कर्तबगार स्त्रीच्या पराक्रमाचे व स्वराज्यसाठी दिलेल्या बलिदानाचे छत्रपती कडून केला जाणारा सन्मान या पत्रातून दिसून येतो.
राजमंडल
चिटणीसी
मौजे अष्टे ता। आष्टी तुळसाबाई निंबाळकर या सी पेशनी या-ई नाम आहे तेथे प्र ।।
करार
2 म।।
अश्विन बहुल
ता। आष्टी प्रा.कुड वली येथील देशमु-खिचे वतन पेशजी हैबतराव निंबालकर यासी निमे दिला होता ते स्वामी कार्यावरी पडिले चे हैबुतराव सिदोजी बिन हणमंत निंबाळकर मूजकरीचे वतन निमे देशमुखी करार मौजे अस्विन बहुल
फोटो : मातोश्री तुळसाबाई निंबाळकर समाधी व मोडी पत्र
आपले
मा.श्री. शंतनुराव नाईक निंबाळकर (सरलष्कर सुलतानजीराव नाईक निंबाळकर खर्डेकर वंशज)
मा.श्री . संतोष झिपरे (राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक)
