येसाजी कंक | अपरिचित मावळा

yesaji kank history

अपरिचित मावळा | येसाजी कंक

येसाजी वेलवंड खोर्‍याचे प्रतिष्ठित देशमुख होते.शिवाजीराजें तसेच शंभूराजेंचे जवळचे सहकारी होते.शिवाजीराजेंच्या दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेत ते राजेंसोबत होते.छत्रपतीच्या आदेशानुसार येसाजीने गोवळकोंड्याचा बादशाह अबुलहसन कुतुबशाह याच्या मदमस्त हत्तीला आपल्या अतुल्य पराक्रमाने लोळवले होते.अनेक विजयी मोहिमेचे नेतृत्व येसाजींनी केले होते.शिवाजीराजेंनंतर शंभूराजेंसोबत त्यांनी फोंड्याला पोतुर्गीजाना पाणी पाजले या युध्दाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.गोवा जिंकल्यावर शंभूराजेंनी पोर्तुगीजशी तह केला होता.पण औरंगजेबने,कुडाळच्या सावंतने तसेच वेंगुर्ल्याच्या देसाईने,पोर्तुगीजांना फितवून फोंडा किल्यावर आक्रमण करावयास लावले.त्यावेळी फोंडा किल्याचा किल्लेदार येसाजी कंक हा होता.

पोर्तुगीजांनी जोरदार आक्रमण करून फोंडा किल्यास भगदाड पाडले.यावेळी किल्यात फक्त आठशे मावळे होते.पोर्तुगीजांनी किल्याच्या भगदाडातून आत प्रवेश केल्यानंतर येसाजी त्याचा पुत्र कृ्णाजी व मावळ्यांनी असा पराक्रम केला की पोर्तुगीजांची दाणादाण उडाली.पण पोर्तुगीजांची संख्या मोठी असल्यामुळे मराठ्यांचा टिकाव लागेना.याचवेळी शंभूराजें येसाजीच्या मदतीस एक हजार घोडदळ व तितकेच पायदळ घेऊन आले.त्यामुळे मराठ्यांना अधिक चेव चढला.मराठ्यांपुढे पोर्तुगीजांचा टिकाव लागला नाही त्यांचा पराभव झाला.या युध्दात येसाजी कायमचे जायबंदी झाले तर त्यांचा पुत्र कृष्णाजी युध्दात मारला गेला.या युध्दात पराक्रम गाजविल्याबद्दल शंभूराजेंनी येसाजीस एक हजार होन नेमणूक देऊन त्यांचा सन्मान केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here