वाघ दरवाजा – इतिहासास माहित नसलेला प्रसंग

Vagh Darvaja | वाघ दरवाजा

वाघ दरवाजा | Vagh Darvaja

वाघ दरवाजा – इतिहासास माहित नसलेला प्रसंग ९ फेब्रुवारी १६८९ येसाजी आणि सिदोजी फर्जंद यास कडेलोट केले..११ मार्च
१६८९ औरंगजेबाने युलापुरी संभाजी राजे व कवी कलश यास जीवे मारून शिरच्छेद केला..२५ मार्च १६८९ औरंगजेबाने झुल्फिरखानास पाठवून रायगडास वेढा घातला.. किल्ले रायगड च्या मावळतीकडे मोगली झुल्फिरखानच्या छावणीवर अजून सूर्यकिरण आले नव्हते ..किल्ले रायगडने टकमक टोक व हिरकणी टोक हे आपले दोन सव्य -अपसव्य बाहू पसरवून झुल्फिरखानाची छावणी रोखून धरली होती..कवटाळली होती..

किल्ले रायगडच्या महादरवाजा कराल जबड्यापासून झुल्फिरखान सुदूर छावणी करून होता..झुल्फिरखा­ नाला मावळतीकडील किल्ले रायगडचा एकच महादरवाजा माहित होता आणि तो त्याने रोखून धरला होता ..रायगडवाडी व पाचाड येथील मोघली छावणीतील अंमलदार अजूनही बिछायतीवर दलोळत होते..दस्तुरखुद् झुल्फिरखान सुद्धा पाचाड येथील आऊसाहेबांच्या कोटातील वाड्यात निजलेला होता..

किल्ले रायगडला वेढा घालताना रायगडच्या बेलग कड्याची चहूअंगांनी मन ऊर्ध्वभागी झोकून पाहणी करतना प्रत्येक मोघली अंमलदाराची पागोटी रायगडच्या पायाखालील धुळीत पडून माखली होती गच्च रानातील वन्य
श्वापदांचा भीतीने त्या अंमलदरांनी थातूर मातुर पाहणी केली होती..

रायगडची उंची ,सरळकोट भीषण तासीव कडे आणि सभोवतालचे घनदाट जंगल ध्यानात घेऊनच झुल्फिरखानने किल्ले रायगडची ज्ञात रहदारीची दरवाजाकडील बाजू आपल्या परीने रोखून धरली होती..वाघ दरवाजाबाहेर
एका चिकाच्या टोपल्यास दोरखंड बांधून ठेवलेला होता..वाघदरवाजा बाहेरील डोंगर धारेवर एक मेढ खोलवर पुरलेली होती ..

मेढीच्या बेळक्यात दोरखंड टाकून टोपला डोंगर धारेवर सुरक्षित चार हशमांनी हातातील धरला..हश्मांचा आधार घेत संताजी घोरपडे टोपल्यात बसले..चार हशमांनी हातातील दोरखंड हळू हली ढिला सोडला ..टोपल्याच्या पालन उभ्या कडासी लगट करीत खाली खाली जाऊ लागला ..संताजी घोरपडे खाली उतरले ..घटकभरात रिकामा टोपला पालन वर ओढून घेतला होता ..तद्नानंतर त्या टोपला पाळण्यातून खंडेराव दाभाडे खाली उतरले..

पालन पुन्हा वर येताच राजराम राजे पाळण्यात बसून खाली गेले..त्यानंतर तारारानिसाहेब व राजसबाईसाहेब व अंबिकाबाईसाहेब
एकापाठोपाठ एक टोपलीच्या पाळण्यातून खाली उतरल्या..अनुक्रमे प्रल्हाद निराजी ,खंडो बल्लाळ आणि बाबाजी निलो हेही वाघदरवाजा खाली पाळण्यातून खाली पोहोचले….वाघ दरवाजाखालील त्या किर्र रानात वाघांचे काळीज
असणारीच माणसे उतरू शकली होती.. ..

शिवरायाने दूरदर्शीपणे किल्ले रायगडास निर्मिलेल्या आपत्कालीन दरवाजा खानास ठाऊक नवता आणि म्हणूनच किल्ले रायगड वेढनाऱ्या झुल्फिरखान ह्याची ह्या दिशेला गस्त नावती .हेमराठ्यांच्या हेरांना ठाऊक
होते.. आजही तुम्ही सकाळी- दुपारी-सायंकाळी वाघ दरवाजात एकाकी गेलात तर आसमंतातील निर्व शांत तेच भंग करीत तो वाघ दरवाजा हि कथा सांगण्यास आपला जबडा उघडतो..

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here