महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,19,564

थेऊर गणपती मंदिर

By Discover Maharashtra Views: 3999 1 Min Read

थेऊर गणपती मंदिर | Theur Ganapati Temple

अष्टविनायका मधला पाचवा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी विनायक. थेऊर हे मुळा-मुठेच्या काठावर वसलेलं गाव पुण्यापासून अवघ्या २५ किलोमीटरवर आहे. थेऊरचा गणपती असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान स्थान आहे.

श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.

श्रीमंत माधवराव पेशव्यांनी मंदिरासमोर भव्य मंडप बांधून त्याच्या सौंदर्यात भर टाकली. मंदिरावरील कारागिरी आकर्षक आहे. चिंतामणीच्या मंदिराचा महादरवाजा उत्तराभिमुख असून गाभा-यातली श्रींची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. सभामंडपातील गणेशाची विविध रूपं खरोखरीच लक्ष वेधून घेतात. गणपती मंदिराच्या आवारात विष्णूलक्ष्मी, महादेव मंदिर तसंच हनुमान मंदिर अशी जुनी मंदिरंही आहेत.

भाद्रपद शुद्ध चतुर्थीस व माघ चतुर्थीस श्री चिंतामणीचा मोठा उत्सव असतो. मंदिरात चहूबाजूंनी ओव-या आहेत व गणेशमूर्तीच्या जवळच्या ओवरीतच श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मृतिस्थान आहे.

माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti

Leave a comment