भारत चीन सीमेवर एका सैनिकाचे मंदिर

Temple of a soldier on India-China border

भारत चीन सीमेवर एका सैनिकाचे मंदिर…

Temple of a soldier on India China Border

भारत चीन दरम्यान ३४८८ किमीची सीमा म्यॅकमोहन रेषेने जोडलेली असून या दरम्यान गस्ती चौक्यासाठी हिमाचल, लदाख आणि सिक्कीम याठिकाणी दोन्ही देशाचे सैनिक कार्यरत असतात. सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून ६५ किमी अंतरावर नाथूला येथे एक संरक्षण चौकी आहे. समुद्र सपाटीपासून १४८०० फूट उंचीवर असलेल्या या चौकीवर सतत बर्फ पडत असतो. अशाठिकाणी पंजाब मधील एक युवक २४ पंजाब रेजिमेंटमध्ये भरती होऊन १९६८ साली तो याठिकाणी सेवेत दाखल झाला.

आपली सेवा बजावत असताना एकेदिवशी तो पाय घसरून तो दरीत कोसळला. दोन दिवस प्रयत्न करूनही त्याचे प्रेत सापडले नाही. तेव्हा सहकाऱ्याच्या स्वप्नात येऊन त्याने आपले प्रेत दोन किमी दूर असल्याचे ठिकाण सांगितले. त्यानुसार ते आणून त्याचा अंतविधी करण्यात आला. त्यादिवसापासून हरभजन ड्युटीवर असल्यागत आपल्या सीमेच्या रक्षणासाठी काम करू लागला. झोपेत असण्याऱ्या सैनिकांना जागे करणे, शत्रूच्या हालचाली सांगणे असे भास आपल्या सैनिकांना होऊ लागले. त्यामुळे त्याचे बंकर होते ते सैनिकांना श्रद्धास्थान बनले.

याठिकाणी ऑक्सिजन कमी असल्याने सहजही श्वास घ्यायला त्रास होतो. म्हणून लष्कराच्यावतीने नाथूला चेक पॉइंटच्या खालच्या बाजूला १९८२ ला एक मोठे मंदिर बांधण्यात आले. रात्रंदिवस बाबा गस्त घालून आपल्याला प्रेरणा देतात . या भावनेतून सैनिक आणि लोक त्यांच्या दर्शनाला येतात. तेथे असलेल्या मंदिरात रोज बाबाचे कपडे बूट व इतर साहित्य अगदी सजवून ठेवले जाते. इतर सैनिकांबरोबर चहा, नाश्ता जेवण दिले जाते. पुर्वीतर १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर असे दोन महिने त्यांचे सामान त्यांच्या घरी पाठवून त्यांना सुट्टी दिली जायची. पुरोगामी विचारला हे पटत नाही परंतु हे भारतीय लष्कराच्या वतीने चालू आहे. बाकी काही असो मनाला दिलासा आणि प्रेरणा म्हणून बाबा हरभजन सिंग आपल्या सीमेवर कार्यरत आहे.

माहिती साभार – Dr. Satish Kadam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here