इतिहासमाहिती

मराठ्यांच्या तलवारी

मराठ्यांच्या तलवारी

दीर्घता लघुता चैव स्वरावीस्तीर्णता तथा।
दुर्भेद्यता सुघटता खड्गानां गुण संग्रह: ।।
खर्वता गुरुता चैव मंन्दता तनुता तथा ।
सुभेद्यता दुर्घटता खड्गानां दोषसंग्रह: ।।
यावत्योर्गुणयोर्दैर्घ्ये तदर्घाङ्गुलयो यदा ।
प्रसरेतच्चतुर्थांशमिती वै मानमुत्तमम् ।।

युक्तिकल्पतरु

अर्थ – तलवार लांब असावी, ती हलकी असावी, तिचा आवाज मोठा असावा, ती कशावरही हाणली तरी ती मोडता कामा नये, व मोडली तर लवकर सांधली जावी म्हणजे ही तलवार उत्तम होय. तलवार जितक्या मुठी लांब असेल तितकी अंगुले ती रुंद असावी व तितके यव किंवा रुंदीच्या चतुर्थांश इतकी ती जाड असावी म्हणजे ती तलवार उत्तम होय. हिला *खड्ग* म्हणतात, हे देवीचे आयुध आहे.

शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी थोड्याशा जाड परंतु लांबीला कमी असायच्या .
मराठे उचींने मध्यम आसल्याने तलवारीची लांबी कमी असायची.परंतु जेंव्हा महाराजाचा कालखंड आला तेंव्हा त्याच्या लक्षात आले की मोगलाबरोबर मावळ्यानां दोन हात करवे लागतात. ते उचींने आणी ताकदिने मराठ्यापेक्षा जास्त आहेत .तेव्हा महाराजांनी यावर अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आले की मराठ्यांची शारीरीक ठेवण लहान आणि त्याची तलवारीची लांबी कमी यामुळे मराठा कितीही पराक्रमी असला तरी मुसलमानापुढे हार खावी लागत असे .

महाराजांच्या दुरदर्शी बुद्धीला मराठ्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण दिसु लागले . ते म्हणजे योग्य माणसाकडे योग्य पद्धतीने शस्त्र नसणे.मग त्यावर संशोधन चालू केले .यावर सर्व बाजुनी म्हणजे शस्त्राचा धातु,लांबी,रूंदी,वजन,धार या सर्वांवर विचार करून नविन शस्त्रे बनवायला घेतली.पुर्वी ज्या तलवारी वापरत त्याला उघडी मुठ आसायची.ति महाराजांनी मुठ बंद करून घेतली .एखादा तलवारीचा वार घसरून खाली हातावर आला तरी हात सुरक्षित राहतो यासाठी मुठीला आवरण लावले .त्याच बरोबर तलवार जी थोडी जाड होती ती पातळ करुन एक फुटापर्यतं लांब केली .पाते लांब केले परंतु वजन वाढणार नाही याची काळजीही घेतली .आणी शञुच्या मोठ्यातमोठ्या घावाने त तलवार तुटणार नाही अशी व्यवस्था करून घेतली .त्यासाठी तलवारीला मधुन पन्हाळ ठेवला जाई.त्याचा प्रभाव इतका दिसुन आला की हे हत्यार पायदळासाठी उपलब्ध व्हावे अशी गरज मावळ्यानी व्यक्त केली .आणी अशा तलवारीला जगभरात मराठा तलवार म्हणून सबोंधले जाऊ लागले .

महाराजांनी ही मराठा तलवार लांब केल्याने त्याचे टोकाकडील वजन यांचा तोल सांभाळताना मुठीवर वजन जास्त आल्यासारखे वाटे त्याला पर्याय म्हणून तलवारीच्या मुठीच्या मागे गज लावायला सुरुवात केली .ऎन प्रसंगी हा गजही शञुच्या डोक्यात खिळ्या प्रमाणे ठोकता येई.त्यामुळे तोल साधण्याबरोबर तलवारीच्या मारक क्षेमतेचे आणखी एक वैशिष्ट्य आपोआप भरीला आले.अनेक प्रकारे हि तलवार चालवुन हाताला घाम येईल किंवा मुठ सैल झाल्याने हातातुन गळु नये. पकड एकदम मजबुत रहावी म्हणुन मुठीला आतुन गादीचा अस्तर लावुन घेतला .म्हणुनच मराठे घोडखिंडीत सात तास सलग हत्यार चालवु शकले.

मराठ्यांच्या या विकसित तलवारींना त्यातील वेगवेगळ्या वैशिष्ट्य पुर्ण नावे पडली .जसे-धोप,खांडा,फिंरग,कत्ती,समशेर,इत्यादी.
महाराजांच्या तलवारी हि अशा खास वैशिष्ट्यानी बनवलेल्या आहेत.

फोटो व माहिती साभार मर्दानी खेळ असोसिएशन

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close