महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,76,544

तरवार – तलवार

By Discover Maharashtra Views: 3995 2 Min Read

तरवार – तलवार

तरवार – तलवार – शस्र या शब्दाची थोडक्यात व्याख्या
“एक असे उपकरण की ज्याचा उपयोग शत्रूवर वार करण्यासाठी किंवा त्याला वश करण्यासाठी किंवा आत्मरक्षणासाठी ज्याचा उपयोग होतो.ते शस्र….”
थोडक्यात मनुष्याच्या विकसनशिल बुद्धीने अनुभवाअंती घेतलेला शोध व त्यातून उदात्त झालेली निर्मिती.इ.स.पू.4000 वर्षापूर्वी धातूचा शोध लागला.त्यावेळी उपलब्धतेनुसार मनुष्य शस्राची निर्मिती व प्राणि,पशु,जिव जंतू यांच्यापासून आत्मसंरक्षण करु लागला.पुढे इ.स.पू.1000 वर्षापूर्वी लोखंडाचा शोध लागला व अनेक कल्पकतेने शस्र निर्मिती होऊ लागली.
वेदांनी शस्राचे 4 मुख्य प्रकार सांगितले..
1)अमुक्ता:-
या प्रकारचे शस्र हे फेकता येत नाही.ते हातात ठेवूनच वापरायचे असते.
2)मुक्ता:-
या प्रकारचे शस्र हे फेकून मारता येते.यात दोन प्रकार आहेत.
अ)पाणिमुक्ता-हाताने फेकण्याचे शस्र
ब)यंत्रमुक्ता-यंत्राचा उपयोग करुन फेकायचे शस्र
3)मुक्ता-मुक्त:-
या प्रकारात शस्र फेकताही येते व न फेकताही वापरता येते.
4)मुक्त संनिवृत्ती:-
या प्रकारात शस्र हे फेकून पुन्हा हातात घेता येते.
*शस्राचे प्रमुख तीन लक्षणे :-
1)सुरक्षा
2)वार करण्याची क्षमता
3)गती
शस्राचे प्रमुख पाच गुण :-
1)सुलभता
2)अनुकुलता
3)दृढता
4)विश्वसनियता
5)मजबूती
शस्रांचे अनेक प्रकार आहेत.अनुभव व कल्पकतेच्या सिद्धांताने निर्माण झालेली अनेक प्रकारची हत्यारे आहेत त्यातील एक म्हणजे तरवार.तलवार हा  फारशी शब्द आहे.तो मुळ शब्द ‘तरवार’ असा आहे.पुढे अपभ्रंश होत तो शब्द आपण आज ‘तलवार’ असा वापरतो.शिवरायांना गोवले गावच्या सावंतांनी जी “श्री भवानी तरवार” दिली त्याचा उल्लेख शिवदिग्विजय’ बखरींत उल्लेख पुढील उल्लेख आहे.
“महाराजांची स्वारी श्रीहरिहरेश्वराचे दर्शन घेऊन, गोवल्याच्या मार्गे जाता,सावंताचे घरी धोप-तरवार नामी चांगली आहे,दोनशे होनाच्या किंमतीची.त्यावरुन आख्येची तरवार आपणाजवळ असावी.परंतु सरदार लोकानीं जवळचे राहणार अगर समंतात लौकिकवान पुरुषांजवळ उत्तम वस्तू असल्यास,अभिलाष इच्छा धरु नये…..”
शिवकालीन साधनांत तरवार हाच शब्द प्रामुख्याने अढळतो.

तरवारीचे प्रकार –
कर्नाटकी धोप, खंडा (मराठा), राजस्थानी (राजपुती), समशेर (मोगली), गुर्ज, पट्टा, आरमार तरवार, मानकरी तरवार
तरवारीच्या मुठीवरूनच सुमारे तरवारीचे अनेक उपप्रकार आहेत.मुठी ह्या प्रमुख्याने तांबे, पोलाद, पितळ, हस्तिदंत इत्यादींच्या असतात, तसेच
जमदाड,बागदार,समशेर,शिकारगाह,खडगपत्र,जेनबी,तीग-तेग,दुदुमा,नवटाकी,निमचा,पलारक,गुप्ती,पट्टा,फिरंग,
किरच, , गद्दारा, कत्ती इ. उपप्रकार आहेत.
खंडा, मुल्हेरी, फटका हे मराठा तलवारींचे काही प्रकार .तरवारीचे नखा, खजाना, ठोला, परज, गांज्या, अग्र असे सुमारे २२ भाग दाखवता येतात.
पाते पोलादी असे, वापरण्यात येणारे पोलाद टोलेडो,चंद्रवट ,हात्तीपागी, फारशी, जाव्हारदार प्रकारचे असते.

संदर्भ- श्रीभवानी तरवार-आप्पा परब व विकिपीडिया

संकलन – नवनाथ आहेर

Leave a comment