शृंगार कसा असावा

शृंगार कसा असावा

शृंगार कसा असावा –

असावे दोघेही एकसंग, संगतीत एकमेकांच्या थरथरावे हे अंग, होऊनी वेडे दोघेही दंग, मन उडे जसा आकाशी पतंग. ना घाई, ना वासना, मनी असावी ती आराधना. होय आराधनाच ती!

थरथरत्या ओठांची, गालावरील लालीची, घामाने चिंब होऊ पाहणाऱ्या शरीराची, शरीरातील त्या मनाची, मनातल्या त्या भावनांची, भावनांतल्या निशब्द संयमाची, संयमातील अबोल विरक्तीची. जेव्हा आराधना जमते, तेव्हाच खरा शृंगार होतो, ज्या समक्ष संभोग ही कवडीमोल ठरतो, जो नेहमीच आपल्याकडे सरळसरळ जेता/उपभोक्ता आणि जेय/उपभोग्य असा मानला जातो!!!

मुळात संभोगात लैंगिक असमतोल सरळसरळ जाणवतो कारण विशिष्ट अवयव आहे म्हणुन आणि एक शारिरीक ढाचा घालून स्वतःला पुरुष समजणारे त्यांच्याच तृप्तेतेच्या परिघात वावरून त्यातच आनंद मानून घेतात. वास्तवात, जेव्हा दोन मन मनापासून मनापर्यंत जुळतात, व्हा शरीर जुळण, संभोग करण निव्वळ निरर्थक ठरत … कारण तिथं असतो तो फक्त आणि फक्त शृंगार !!!! एकमेकांस तृप्त करत जो स्वर्गीय आनंद लुटला जातो,तो जरी शरीराच्या मार्गाने होत असला तरी त्याची अनुभुती मनापासून मनापर्यंत केव्हाच झालेली असते..,आणि तोच खरा शृंगार ठरतो….

हक्क, अहंकार, हेवेदावे, वासना ही खरी शृंगारावरील धूळ आहे,ते केव्हातरी बाजूला सारावे अन् शृंगाराचे खरे स्वरूप न्याहाळावे, अनुभवावे.

© Kiran Mengale

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here