शिवराई भाग ९

शिवराई भाग ९

शिवराई भाग ९…

आज सादर आहे ‘सिव’ मजकुर असलेली शिवराई. आपण याआधी सिव असलेली शिवराई पाहीली पण आज सादर सिव वेगळा आहे. नाण्यावरील अक्षरे अगदिच ठळक आणि सुबक आहेत. तसेच नाणे वेगळ्या अक्षरवळनामुळे आकर्षक देखिल वाटते. सादर शिवराई तांब्याची असुन वजन 8.77 ग्राम आहे. आपण वजनातील विविधता पहात आहात, तांबे धातुच्या बदलत्या किंमतीने शिवराई चे वजन कमी झाल्याचे दिसते, सुरुवातीची शिवराई 11 ते 13 ग्राम ची होती तर हि 9 ग्राम च्या जवळ आहे.
नाण्याच्या बॉर्डर बद्दल बोलायचे झाल्यास या नाण्यात खुप बदल आहे. आपण बिंदुमय वर्तुळ पाहिले पण या नाण्याला तसे नाही या नाण्याला लाइन ची बॉर्डर असुन त्यात फुल ओवल्यासारखे वाटतात. नाण्यावर पुढील बाजुवर- श्री/ राजा/ सिव आणि मागील बाजुवर- छत्र/ पति मजकुर आहे. पुढील बाजुवरील ‘जा’ आणि मागील बाजुवरील ‘छ’ चे वळनही वेगेळे आहे. असे आहे हे वगळे अक्षरवळन असलेले ‘सिव’ नाणे !

आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

आपलाच
आशुतोष पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here