शिंद्यांची गढी, जामगाव

शिंद्यांची गढी, जामगाव

शिंद्यांची गढी, जामगाव…

काही ठिकाण आपण पाहतो आणि आणि फक्त आणि फक्त अचंबित होतो. नगर पासुन जवळच 30 किलोमीटर अंतरावर जामगाव ला शिंद्यांची गढी आहे. महादजी शिंद्यांनी ती बांधली . तो राजवाडा म्हणा किंवा गढी पाहून इतके गुंग व्हायला आणि त्या काळच्या इंजिनिअरिंग चे कौतुक वाटल्या शिवाय रहात नाही .

87 एकर परिसर, 3 मुख्य प्रवेशद्वारं., अडीच एकर जागेत असलेला महादजी शिंदे यांचा वाडा 17 व्या शतकात बांधलेला. सागवानी दारे आणि तुळया यांनी बांधलेला अजूनही दिमाखात उभा आहे. 2 चौक आणि 21 जिने, प्रशस्त दालने आहेत. वाड्याची संपूर्ण बांधकाम दगड मातीचा लगदा, चुना ,रुमाली वीट, आणि साग यामध्ये केलेले आहे.

वाड्यात मच्छिमहाल,आंबेमहाल,रंगमहाल,तालीम, खलबतखाना,भुयारी मार्ग असुन 17 व्या शतकातले रंगकाम अजूनही शाबूत आहे. या वाड्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या पूर्ण वाड्यात एकाच दगडी खांब आहे.

त्या गढीच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अर्ध चंद्राकृती बारव पायऱ्या मात्र पूर्ण नाहीश्या झाल्या आहेत पण कदाचीत त्यामुळेच त्याचे पाणी अजूनही शाबूत आहे आणि तिथे सुरू असणाऱ्या कॉलेज ची तहान भागवते आहे.

स्थापत्य शास्राचा उत्कृष्टपणा तिथे पाहायला मिळाला. जामगाव पारनेर तालुक्यात आहे तो भाग पूर्वीपासून पूर्णपणे अवर्षण ग्रस्त, पाऊस अगदी नावालाच. पण तरीही वाड्याच्या दोन्ही चौकात कारंजे. आधुनिक घरांमध्ये POP करतो तेव्हा चे लाकडी POP पाहून थक्क होतं तेही, प्रत्येक खोलीत वेगळी कलाकुसर अशी की कल्पनाशक्ती ला सलाम.  लाकडी छत असल्यामुळे खोलीतले तापमान नियंत्रित राहायला मदत होते. तिथे खोल्यांना चुन्याचे प्लास्टर केलेले आहे पण ते एका विशिष्ट पद्धतीने. मातीच्या आणि दगडाची भिंत प्लास्टर करण्याआधी तिथे झोपडीला असतात तसे काड्याबआणि गवत यांनी शाकारले आणि मग त्यावर चुन्याचे प्लास्टर केले. त्याकाळी पारनेर चा चुना खुप प्रसिद्ध होता. प्लास्टर करतांना फक्त तो भिंतींना थापला नाही तर सुंदर सुंदर गोखले केले थोडी कलाकुसर केली आणि भिंत आकर्षक बनवली या पद्धतीने भिंत केल्यामुळे तापमान संतुलित राहते

इथले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे असणाऱ्या खूप वेगवेगळ्या खिडक्या. लाकडी फ्रेम करून त्यावर चुन्याच्या प्लास्टर च्या डिझाइन अश्या की आपण बघून फक्त स्तब्ध होतो.सोबत काही फोटो देत आहे. भिंतीचे फोटो मात्र काढता आले नाही कारण वाड्याच्या तो भाग बंद केला आहे.

आजूबाजूच्या डोंगरावरून खापरी नळ आणि चाऱ्याच्या खोदून पाणी वाड्यात आणले आणि ते सगळीकडे वापरले. उत्कृष्ट बांधकामाचा नमुना आहे हा वाडा म्हणजे . एकदा भेट द्यावीच असाच.

दिपाली माळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here