अपरिचित इतिहासइतिहासदिनविशेष

९६ कुळातील शिंदे हे क्षत्रिय मराठा घराणे

 ९६ कुळातील शिंदे हे क्षत्रिय मराठा घराणे

९६ कुळातील शिंदे हे क्षत्रिय मराठा घराणे आहे, सेंद्रक या नावापासून शिंदे हे नाव या घरण्यास प्राप्त झाले,शिंद्यांच्या देवकात समुद्रवेल आहे, त्यावरुन सिंधूमधून समुद्रमार्गे ते कोंकणात आले असावेत.
शिंदे हे सूर्यवंशी शेष शाखेतील, तसेच हे शिंदे हे नागवंशी आहेत, नाग या शब्दा बद्दल इतिहासकारांची अनेक मते आहेत
नाग म्हणजे साप होत नाही,नाग वंशी राजे नावा पुढे नाग लावत,यातील पहिला राजा तक्षकनाग उर्फ शेषनाग हा होता,या नंतर या नागवंशी शाखेत, शिशुनाग,अजयनाग असे राजे होऊन गेले,यामुळे यास नागवंशी म्हणत, नाग वंश हा सुर्यवंशाचा पोट भेद आहे,नाग वंशचा अर्थ म्हणजे सर्प योनीतुन जन्मलेचा होत नाही, याचा अर्थ अमरकोशा नुसार हत्ती होतो,म्हणजे हत्ती प्रमाणे बलाढ्य राज्य,आज ही काही शिंदे घराण्याच्या राज चिन्हावर शेषा सोबत हत्तीच सुध्दा चित्र पहायला मिळते,ग्वाल्हेरच शिंदे घराणे हे याच नाग वंशातील..!

तसेच शिंदे यांना नागोरवंशीय देखील म्हणतात,राजस्थान येथे साधारण इसवी ३०० ते ४०० मध्ये नागवंशाच राज्य होऊन गेले,राजस्थान, रणथंब ही शिंद्यांची राजधानी सांगितली जाते तर बदामी सुद्धा सांगितली जाते,चालुक्य काळात पुन्हा हे घराणे भरभराटीस आले,यदवांशी काही काळ लढाया झाले तर कदम-कंदब या राज घराण्याशी प्रारंभा पासून संबंध येत.!
पांडव काळात पट्टणकुडा(पटणा),मगध चा राजा जरसांग,कलीगचा राजा शिशुपाल,मद्रासचा शैल राजा हे नाग वंशीय,याच तक्षक उर्फ शेषनागातील राजे विविध ठिकाणी राज्य करत होते, मद्रास ठिकाणी आज ही नागाची पूजा केली जाते,ते पार्वती देवीचे उपासक आहेत, पुराणात अशी एक कथा सांगितली जाते की शिवा चा एक पुत्र शेष होता,आपली माता जगदंबेचा शोधात तो पाताळात गेला आणि त्याच ठिकाणी आपले राज्य प्रस्थापित केले,व आदिशक्ती कालिके देवीचा उपासक बनलं, तेच नाग वंशीयांची परंपरा सर्वत्र पसरल्या आहेत शिंदे घराणे सुद्धा पार्वती (तुळजा भवानी) चे उपासक आहेत,
आज ही शिंद्यांच्या देव्हार्यात नागाची पूजा अर्चना मोठ्या मनीभावाने केली जाते.! सेंद्रक या नावापासून शिंदे हे नाव प्राप्त झाले. सेंद्रक हे अगदी पूरातन काळापासून व सर्वशृत असे मध्यभारत कालीन घराणे आहे. ते मुळच सिंध पंजाब प्रांताचे राजे होते. पुढे तापीच्या दक्षिणतिरी खानदेशी वसाहती केल्या. सेंद्रक घराण्यातील भिल्लशक्ती व जयशक्ती यांचे पूर्वकालीन ताम्रपट आजतागायत त्यांच्या स्मृती करीत आहेत. शिंध्यांच्या कुळस्वामी कोल्हापूरजवळ ज्योतिबा वाडी येथे असून रत्नागिरीस देऊळ आहे. त्याची प्रत्येक चैत्र्यात जत्रा भरते.सेंद्रक घराण्यात,ताथवडाकर शिंदे, दसपटीचे शिंदे, कुडाळकर शिंदे, तोरगळकर शिंदे,नेसरीकर शिंदे, घेडवाडकर शिंदे,कण्हेरखेडकर शिंदे,म्हैसाळकर शिंदे,मळणगावकर शिंदे,पिंगोरकर शिंदे, धारवाडकर शिंदे सरकार ही घराणी उदयास आली.
कर्नाटकांत सेंद्रक घराण्याचे कुळस्वामी साळुबाई सोमय्या म्हणजे शिव पार्वती भवानी, केदार महालक्ष्मी अशी घराण्याचे कुलदैवत असल्याने इ.स.१७३० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी मुळ देवळाच्या ठिकाणी नवे देऊळ बांधले,
कण्हेरखेडचे पाटील जनकोजी राव शिंदे होते ते राणोजीराव शिंदे यांचे वडील तर शिवशाहीत नेसरीकर घराणे होते,वेडात मराठे वीर दौडले सात या नेसरीतीळ लढाईत प्रतापराव गुजर यांच्यात सोबत विठोजी शिंदे हे सरदार होते,विठोजीराव शिंदे हे शेद्रे बेंद्रे सातारा या गावचे,शाहू छत्रपती यांच्या पहिली पत्नी अंबिकाबाई या शिंदे घराण्यातील,सतराव्या शतकात राणोजीरावांच्या पासून शिंद्यांची जी घोड दोड सुरू झाली ती शेवट 1818 पर्यंत म्हणजे एक शतक चालली,
मराठ्यांच्या प्रत्येक रणसंग्रामत शिंदे घराणे हे अग्रगण्य होते,शिव पूर्व काळात शिंद्यांची घराणी,चालुक्य राष्ट्रकूट,बहामनी, व नंतर आदिलशाही या काळात सुद्धा आपला दरारा कायम राखून होती, रुस्तमराव, झुजारराव,रविराव हे मानाचे किताब या घराण्याकडे होते,सह्याद्रीच्या रांगेतील ताथवडा या किल्ल्याची किल्लेदारी,पुरंदर,धारवाड चंदगड,तोरगल,तिकोना किल्ल्याची किल्लेदारी या घराण्याकडे होती,छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या लढ्यात हे घराणं सक्रिय झाले,यात काळोजी शिंदे ताथवडा,फुलाजी शिंदे तिकोना,विठोजी,यमाजी,महिमाजी शिंदे,बाजीराव शिंदे तानाजीराव शिंदे असे अनेक शूर सेनानी होऊन गेले.
संदर्भ-क्षत्रिय घराण्याचा इतिहास, के बी देशमुख,९६ कुळी मराठा,कदम,
शिंदे घराण्याचा इतिहास,शिंदे घराण्याची साधने
शेखर शिंदे सरकार

Discover Maharashtra Team

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close