महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,20,035

शिलाहार

By Discover Maharashtra Views: 4060 6 Min Read

शिलाहार

हे शिल्प सातारा जिल्ह्यातील, किकली या गावातील भैरवनाथ मंदिराच्या एका खांबावर कोरलेले हे शिल्प आहे. “संबंद्धीत भैरवनाथ मंदिर शिलाहार कालिन आहे”. त्यांची बांधनी ८ व्या शतकातील आहे. असे बोलले जाते पण याचा ठोस पुरावा समोर येत नाही. यात अजुन काही गोष्टी समोर येत आहेत. या किकली गावातील भैरवनाथ मंदिरावर यादवकालिल शैलीचा प्रभाव आहे. त्या बरोबर इतिहास अंभ्यासकांच्या म्हणण्या नुसार शिलाहार राजा हे ९ ते १० शतकातील त्या ठीकाणी आहेत. तसेच काही ठीकाणी असे ही वाचनात येते की शिलाहार राजा भोज चा पराभव करून यादव राजा सिंघणदेव ने हा भाग १२१० मध्ये घेतला. काहींच्या मते असे ही आहे की याचा इतिहास ८ व्या शतकातील शिलाहार राजवटितील आहे. व मंदिर ही तेव्हाचे आहे. याला पुरावे समोर येत नाहीत. म्हणुन यावर शिक्का मोर्तब करणे बरोबर नाही.

सर्व प्रथम आपण या शिल्पाचे वाचन करूयात. या शिल्पा मधे आपण पाहीले तर डाव्या बाजुला आपनास गो माता  गाई  दिलेस तीच्याच बाजुला एक छोटस पाडस(वासरू) दिसेल. मंध्यभागी आपनास एक योद्धा दिसत आहे युद्ध करत असणारा. उजव्या बाजूला शरभ दिसत आहे. त्या योद्ध्याच्या हातामधे काठी किंवा एखाद शस्ञ दिसत आहे. हे झाले शिल्पाचे वाचण.

आता पापण या शिल्पा संबंद्धी कोन कोनते संदर्भ सापडत आहेत हे पाहुन पाहुयात.

या शिल्पासंबंधी पुराण, इतिहास असे मीळुन चार संदर्भ सापडतात. त्यातील एक संदर्भ म्हणुन दक्षिणेकडील रामायणात. त्याच बरोबर दुसरा संदर्भ “शिवपुराण मधे पान क्रमांक ४१६ वर शिवाचा व्याघ्रवध”असा संदर्भ आडळत आहे. *पण शील्पा मधे डाव्या बाजूला असलेला प्राणि हा “शरभ” आहे यावर शिक्कामोर्तब करण्यास हरकत नाही.
तर चौथा संदर्भ हा स्थानिक पातळीवर एका वीराने केलेली व्याघ्रापासून गायची रक्षा.
त्यामुळे या चारी संदर्भांपैकी कोणता संदर्भ आहे हे सांगणे कठिण ! पण आपण शिवपुराणात काय सांगीतले गेले आहे ते पाहुयात.

दुन्दुभिनार्ह्राद नामक दैत्य व्याघ्र रूप घेऊन, शिवभक्तावर आक्रमण करण्याचा विचार व शिवद्वारा त्या व्याग्राचा वध.

(मराठी अनुवाद)

दुन्दभिनार्ह्राद हा दैत्य देवांचा विरोध करनारा होता. त्यास हे ज्ञात होते की देवतांना संपवायचे असेल तर ब्राह्मण संपवावा लागेल कारण देवी देवतांना खाद्य हे यज्ञातुनच प्राप्त होते व यज्ञ हे ब्राह्मण करतात म्हणुन तो दैत्य त्याना मारत होता. असेच एका शिवभक्ताला मारण्यास तो दैत्य आला पण तो शिवभक्त शिवभक्ती मधे ध्यानस्थ झाला होता की त्यावर त्या दैत्याला आघात करणे शक्य झाले नाही. म्हणुन त्या दुन्दभिनार्ह्राद याने व्याघ्राचे रूप घेतले व त्या भक्ताच्या गाईवर हल्ला केला पण तेव्हा तेथे भगवान शंकर प्रकट झाले व त्यांनी त्या व्याघ्रास आपल्या बगलेत पकडले व त्याच्या शिरावर ‘मुष्ठीचा (बुक्कीचा) आघात केला व त्या व्याघ्राचा वध केला.

पण या शिल्पा मधे त्या योद्ध्याच्या हातात शस्ञ आहे. व तो त्या शस्ञाने आघात करत आहे. इथे हे बोलणे योग्य आहे का सदर चे शिल्प हे शिवपुरानातील आहे. हे अस ही असु शकते या शिल्पाशी नीघडीत अजुन शिल्प त्या भैरवनाथ मंदिरात असाव कारण तीथे एक पुर्ण शिल्पांच्या रूपातुन काळ कोरलेला आहे कींवा आजच्या भाषेत बोलले तर एक मालीका कोरलेली आहे.

तसेच अजुन काही पुरावे तपासून पाहुयात.

शिलाहार उत्पदी काळ ९ व्या शतका पासुन आढळतो. आणि किकली किंवा सातारा कडील उत्कर्ष काळ हा ११ व्या ते १२ व्या शतकातील आढळतो. संदर्भ:- सातार चा किल्ला अजिंक्यतारा शिलाहार वंशीय दुसरा राजा भोज याने बांधला. शिलाहार हे सुरवातीला जैन धर्माला आशय देनारे होते. नंतर त्यांनी शैव परंपरेकडे आपले लक्ष केंद्रीत केले, असे काही अंभ्यास कांचे मत आहे. व काही ठीकाणी उल्लेख ही आढळतो. सातारा जिल्ह्यातील किकली मधील भैरवनाथ मंदिर बांधनी चे ठोस पुरावे सापडत नाहीत. पण मंदिराच्या पायरीवर एक पाली भाषेतील शीला लेख आपनास पहायला मीळतो. तो सद्ध्या जरा पुसट आहे कारण पायरीवरून एता जाता तो घर्षनाने. जेव्हा त्या शीला लेखाचे वाचन होईल तेव्हा आपनास ठोस पुरावे मीळण्याची शक्यता आहे. तो लेख स्थानिक इतिहास प्रेमींनी वाचनासाठी दिला आहे असे ही समोर येते.

तसेच या मंदिरावर यादव शैलीचा बराचसा प्रभाव आहे. तो ११ व्या १२ शतकातील प्रभाव आहे असे दिसुन येते.तसेच या शिल्पा मधे असलेला शरभ हा प्राणि अस्थीत्वात नसलेला काल्पनिक प्राणि आहे.पौराणिक कथेत भगवान शंकराने दैत्यांचा विनाश करण्यासाठी एका अक्राळ विक्राळ पशुचे रूप धारण केले होते ते राक्षसांचा वध करण्यासाठी. या मधे आपण एका गोष्टीवर शिक्कामोर्तब करत आहोत कि या शिल्पा मधे दिसणारा उजव्या बाजुचा प्राणि हा “शरभ” आहे. या शरभ प्राण्याचे अक्राळ विक्राळ शिल्प हे सातार चा किल्ला अजिंक्यतारा वरती आहे. यावरील शरभाने आपल्या पायाखाली हत्ती चीरडले आहेत तसेच तोंडात ही हत्ती चीरडले आहेत.सातार्‍याचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसर्‍या भोजराजाने इ.स. ११९० मध्ये बांधला.

पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे गेला. तसेच किल्ले रायगड वर ही आहे, सातारा जिल्ह्यातील देवाची पाली मधील खंडोबाच्या मंदिरावर शरभ दिसुन येतो पण तो साधा शरभ आहे. तसेच प्रतापगडावर ही दिसुन येतो. त्याच बरोबर कोल्हापुर मधील वाडी रत्नागिरी मधील जोतीबाच्या मंदिरावर ही काही शील्पे दिसुन एतात. शरभ हे शक्तीचे प्रतीक आहे. त्याला खुप महत्व आहे.

लेखन व माहिती संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे
अध्यक्ष:-हिंदवी स्वरांज्य गडकोट समीती.
८१०८३३५९२५
Leave a comment