शेषशायी विष्णु मंदिर, संगम माहूली

शेषशायी विष्णु मंदिर, संगम माहूली

शेषशायी विष्णु मंदिर, संगम माहूली, सातारा.

शेषशायी विष्णचे हे रुप काळावर लक्ष ठेवण्याच कार्य करत. शेषवर असल्याने विष्णुला ग्रह नक्षत्र तारे यावर नियंत्रण ॥ठेवायला सोपे जाते. हे सर्व ग्रह , तारे शेषच्या कुंडलीत बांधले गेले आहेत. शेष हा विष्णुच्या उर्जाचे प्रतीक आहे. शास्त्रा नुसार विष्णुला ‘शांन्ताकारं भुजंगशयनं’ असे संबोधतले जाते. अशा शेषशायी विष्णुच मंदिर कृष्णा व वेण्णा नदीच्या संगमावर संगम माहूली येथे आहे.शेषशायी विष्णु मंदिर.

उपलब्ध माहिती नुसार मंदिर इ.स १६९५ सालचे असून सदर मंदिर घमांडाचार्य यांना (घमंडे घराण ) यांना संस्थानीकांनी दान म्हणून हे मंदिर दिल आहे.

मंदिरातील मुर्ती वैशि वैशिष्ट्यंपुर्ण असून विष्णु हे पाच फण्याच्या शेषावर शयन करीत अाहे. हातात शंख चक्र सपत्रकमळ  असून नाभीतून निघालेल्या कमळावर ब्रम्हदेव विराजमान आहेत. पायाशी लक्ष्मी देवी व तळाशी गरुड वाहन आहे.

संपुर्ण मूर्ती व प्रभावळ एकाच पाषाणात कोरली आहे. किर्तीमुखाच्या खाली शेषशायी विष्णुची मूर्ती आहे. गाभाराच्या प्रवेशद्वारावर गणपती असून गाभा-याच्या दोन्ही बाजूला अोव-या असून ह्या अोव-यांना कोणताही खांब नसून दगड एकमेकात अडकवून  छत उभ आहे .हे या मंदिराच्या बांधकामाच वैशिष्ट आहे.

२०१७ मध्ये मंदिराच जिर्णोध्दार केल आहे. घमेंड कुटूंबीय व मनोज व दिपक पाटील यांच्या सहकार्याने मंदिराचा नवीन कळस अरोहन झाला आहे. पत्की गुरुजी हे येथे पुजआर्चा करतात.२०१७ मध्ये मंदिराच जिर्णोध्दार केल आहे. घमेंड कुटूंबीय व मनोज व दिपक पाटील यांच्या सहकार्याने मंदिराचा नवीन कळस अरोहन झाला आहे. पत्की गुरुजी हे येथे पुजआर्चा करतात.

संतोष मु चंदने, चिंचवड, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here