महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. आपली छोटीशी मदत आम्हाला मोलाची ठरेल. 👉Donation/देणगी साठी क्लिक करा.👈 Website Views: 91,65,297

शंभूसिंग धनसिंग जाधवराव वाडा, माळेगाव

Views: 2932
3 Min Read

शंभूसिंग धनसिंग जाधवराव वाडा, माळेगाव, ता. बारामती पुणे –

बारामतीपासून जवळील माळेगाव खुर्द येथे ‘श्री. शंभुसिंग महाराज हायस्कूल’ आपल्याला श्रीमंत शंभूसिंहांची आठवण करुन देतो. हा शंभूसिंग धनसिंग जाधवराव वाडा शंभूसिंग धनसिंग जाधवराव यांच्या कारकिर्दीत इ.स. १७३० साली बांधण्यात आला. माळेगावला पूर्वाभिमुख वेस आहे. येथेच महादेव मंदिरासमोर जाधवराव घराणातील समाध्या आहेत. यातच धनसिंग जाधवराव यांची समाधी आहे.

अमर बागेतील वाडा-

ब्रिटिश अमदानीत झालेल्या संस्थानाधिपतींनी माळेगाव येथे अमर बागेत दोन नवीन पद्धतीच्या इमारती बांधल्या. तेथूनच संस्थानचा कारभार चालत असे. दोन्ही इमारती पूर्ण दगडी असून देखण्या आहेत. वाड्याला प्रवेशद्वार असून नगारखाना देखील आहे. एकंदर माळेगाव संस्थानातील वरील दोन्ही वाडे बारामती तालुक्याला भूषणावह आहे.

वास्तू ऐतिहासिक रंग-

सिंदखेडकर जाधवराव घराण्यातील धनाजीराव यांचा पराक्रम हे मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णपान आहे. धनाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा मुलगा शंभूसिंग याला इ.स. १७१० मध्ये मोठे बंधू चंद्रसेन यांच्या हाताखाली मुतालिकी मिळाली. चंद्रसेन  धनाजीराव जाधवांनंतर शाहू महाराजांचे सेनापती होते. चंद्रसेन यांनी ताराराणींचा पक्ष स्विकारला व शाहू महाराजांनी शंभूसिंगला सेनापतीपद दिले. त्यांनी ते नाकारले व त्यांचा सावत्र भाऊ संताजी मांडवे याने ते स्वीकारले. तो विशेष पराक्रमी नव्हता. त्याच्या विलासीपणामुळे हे पद काढून घेतले. पुढे मानसिंग मोरे व नंतर खंडेराव दाभाडे सेनापती झाले.

माळेगाव शाखेत पुत्रसंतान न झाल्याने मूल दत्तक घेतले गेले. त्यांपैकीच दुसरे शंभूसिंग प्रसिद्धीस पावले. पहिल्या शंभूसिंग यांनी शाहू-संभाजी गृहकलह मिटवण्यात विशेष प्रयत्न केला. वारणेच्या तहात मध्यस्ताची भुमिका केली. १७३१ मधील जंजिरेकर सिद्दीविरुद्ध त्यांची नियुक्ती झाली होती. मोहिमेवर कामगिरीबद्दल शाहूमहाराजांनी केलेल्या कौतुकाच्या नोंदी कागदपत्रात आढळतात. त्यांना सरंजाम मिळाल्याच्या सनदा प्रसिध्द झाल्या आहेत. कर्नाटकात, वसई मोहिमेत तसेच सिरोंजा येथील लढाईत ते होते. त्रिचनापल्लीचा किल्ला घेताना त्यांनी विशेष प्रयत्न केला. इ. स. १७६१ मध्ये शंभूसिंगाचा मृत्यू झाला. शाहूमहाराजांची त्यांच्यावर विशेष मर्जी होती.

त्याच्यानंतर त्यांचे पुत्र अमरसिंग हे शाहूमहाराजांच्या पदरी लष्करी सेवेत दाखल झाले. पानिपतात त्यांनी पराक्रम गाजवला. १७९० मध्ये त्यांनी आपल्या वाड्याचे बांधकाम पूर्ण करुन घेतले. त्यांनी काशीयात्रा केली. महादेवाचे मंदिर बांधले शिवरात्री उत्सव सुरु केला. पेशव्यांबरोबर टिपूविरुद्धच्या मोहिमेत त्यांनी भाग घेतला. त्यांना पुत्र झाला.  इ.स.१८१७ मध्ये अमरसिंह जाधवराव यांचे देहावसान झाले. पुढे ब्रिटिशांचे राज्य आले व माळेगाव हे संस्थान झाले.

शंभूसिंग धनसिंग जाधवराव वाडा, माळेगाव, ता. बारामती, पुणे.

Vikas Chaudhari
Leave a Comment