सरदार पानसे, मल्हार गड, सोनोरी

सरदार पानसे, मल्हार गड, सोनोरी

सरदार पानसे, मल्हार गड, सोनोरी –

महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला  ‘मल्हारगड’ पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी त्याची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला ‘सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार भीमराव पानसे यांनी केली. भीमराव सरदार पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे.

पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीर आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक बांधिव टाके लागते. टाक्यांच्या जवळच ध्वजस्तंभ असून त्यावर सदैव भगवा विराजमान आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे टाके तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. ते टाके गडावर संवर्धन करणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवाराने गेले 2 वर्षांत साफ करून त्यातील गाळ काढून ते टाके साफ करून घेतले व यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य मात्र नाही. असेच पुढे किल्ल्याच्या टोकावर असणाऱ्या बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. या विहिरीतही पाणी नाही. या बुरुजाच्या खाली एक बुजलेला दरवाजा होता, किल्ल्यावर दुर्ग संवर्धन करणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवाराने त्यातील पूर्ण माती काढून तो ये-जा करण्यासाठी उघडा केला आहे.

७ पायऱ्या आहेत. तसेच या संस्थेने अजून एक केलेले महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे किल्ल्याच्या बरोबर आतील बाजूस आपल्याला मातीच्या ढिगा खाली कित्येक वर्ष बुजलेला शिवकालीन मोठा चौथरा आपल्याला तिथं दिसून येईल व आपले लक्ष वेधून घेऊल, याचे उजवीकडे पुढे गेल्यावर आपल्याला आणखी एक अतिशय लहान दरवाजा दिसतो. झेंडेवाडीकडून आल्यास आपण या दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश करतो. बालेकिल्ल्यात दोन मंदिरे आहेत. यातील लहान देऊळ खंडोबाचे आणि दुसरे जरा मोठे देऊळ महादेवाचे आहे. खंडोबा आणि महादेव मंदिरामुळे गडाला श्री क्षेत्र जेजुरी आणि श्री क्षेत्र कडेपठारचे स्वरूप आले आहे. फक्त मल्हारगडवरच खंडोबा आणि महादेवाचे एकत्र मंदिर आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे. किल्ल्यावरून कऱ्हा नदी, जेजुरीचा डोंगर, कडेपठार, वगैरे दिसतात.

किल्यावर जाण्यासाठी सोनोरी गावाचा उत्तम पर्याय आहे. सोनोरी गावातून गेल्यावर सरदार पानसे यांचा वाडा पाहण्या सारखा आहे. या वाड्याच्या बाजूला असणारे ६ बुरुजांचा वाडा पाहण्यासारखा आहे. तसेच लक्ष्मी-नारायण मूर्ती असलेले मंदिर पाहण्या सारखे आहे.  अखंड संगमरवरी मध्ये घडवलेली ही नारायणाची मूर्ती लक्ष वेधून घेते.  सरदार पानसे यांचे पुरातन गणपती मंदिर मन मोहून टाकते.

Vivek Panse

2 COMMENTS

  1. mala panse sardar yanchi vanshaval havi ahe , karan amchya yethe pan ek panse yanchya junya vdyache avshesh ahet tari mala tyacha sndarbh milava,
    sawardari, post-vasuli ,taluka -khed ,dist-pune 410501

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here