सप्त शिवपुरी ट्रेक (जावळीचे खोरे)

सप्त शिवपुरी ट्रेक (जावळीचे खोरे)

सप्त शिवपुरी ट्रेक (जावळीचे खोरे) –

जावळी च्या किर्र्रर्र जंगलातली ही महादेवाची सप्तशिवायले (सप्त शिवपुरी ट्रेक) पुढीलप्रमाणे –

१. पर्वत – जोम मालिकार्जून
२. चकदेव – शैल्य चौकेश्वर
३. घोणसपूर – मालिकार्जून
४. तळदेव – तळेश्वर
५. धारदेव – धारेश्वर
६. गाळदेव – गाळेश्वर
७. कुसुमबीमोरा जवळ – मोळेश्वर

अष्टशिवायलमध्ये रायरेश्वर चा समावेश होतो.वासोटा पलीकडचे रेडेघाट जवळील मालदेव सप्त शिवालयात पकडत नाहीत. संपूर्ण मार्ग या प्रकारे

महाबळेश्वर > दुधगाव > घोणसपूर > मधू मकरंदगड > कोळंबाचा दांड उतरून > दाभेबंद > हिरडीचा दार चढून > झाडाणी > नेचंपाचं दार उतरून > कांदाट > निरपजी > उचाट > गावडाई देवी व झोलाई देवीचे दर्शन > नागल्याच दार चढून > पर्वत > वाळवण > चकदेव > शिंदी > आरव > मोरणी > मोरणी चे पाण्याखाली गेलेले मंदिर > उचाट > लामज > दरे > तापोळे > ताळदेव > महाबळेश्वर > धारेश्वर > गाळदेव > मोळेश्वर

सप्त शिवपुरी ट्रेक (जावळीचे खोरे) सप्त शिवपुरी ट्रेक (जावळीचे खोरे)

यातील पहिली तीन मंदिरे पायी करावी लागतात, जावळीच्या खोऱ्यात, घनदाट जंगलात, वर खाली अश्या तीन डोंगररांगा ओलांडाव्या लागतात, घोणसपूरचे मंदिर तर अगदी मधू मकरंद गडाच्या वाटेवरच आहे, गावकऱ्यांच्या मते मधुमकरंदची जी खांबटाकी आहेत ते खरे मंदिर आहे आणि त्या टाक्याच्या पाण्याला तीर्थ म्हटले जाते, असो.

महाबळेश्वर ते दुधगाव ST ने किंवा गाडी ने जाता येते, पुढे घोणसपूर साठी जरी रस्ता असला तरी पण मोठी गाडी असेल तरच जावे अन्यथा सरळ चालत गडाच्या माथ्यावर जावे, गडाच्या माथ्यावरचे गाव म्हणजे घोणसपूर. इथून पर्वत साठी चालत ५ तासाची वाट आहे, त्यात आपण संपूर्ण मधू मकरंदगड उतरतो आणि दाभेबंद इथून पुन्हा तितकेच उंच चढून पुढे झाडाणीपाशी पोहचतो. पुन्हा खाली उतरले कि कांदाट खोऱ्यात निरपजी पाशी आपण पोहचतो, निरपजी करायचे नसल्यास थेट साळोशी मार्गे उचाट करत पहिल्याच दिवशी आपण पर्वत ला काळोख होईपर्यंत पोहचू शकतो, निरपजी केले, तर मात्र २ तास जास्त जातात, मग उचाट मध्ये मुक्काम करावा. उचाट ते पर्वत माथा जवळपास २ ते २.५ तास चढण आहे आणि तिथून दुसऱ्या बाजूस पायथ्याला वाळवणसाठी पुन्हा २ तासांचा उतार आहे. वाळवण ते चकदेव जवळपास दीड तास चढण आहे आणि पुढे शिंदी साठी जवळपास २ तास चालत उतरण आहे.

हा ट्रेक करताना आपण मधू मकरंद गडावर जातो, समोर प्रतापगड स्पस्ट दिसतो, चकदेव उतरताना अगदी समोर महिमंडनगड दिसत असतो, मागे नागेश्वर आणि वासोटा किल्ले सुद्धा दिसतात. पर्वत वरून समोर सुमार रसाळ महीपत दिसतात. संपूर्ण ट्रेक मध्ये सह्याद्रीचे रौद्र’रूप पाहायला मिळते, हातलोट घाट, तेलसारी, कोंडनाळ, अंगठेसरी आणि अगदी पलीकडे निगडा घाट या सर्व घाटवाटांचे दर्शन होत असते.

शेवटची चार शिवालये करण्यासाठी मात्र गाडी ची व्यवस्था लागते, वाटेत मोरणी गावात नदीखाले गेलेले मंदिर आता उन्हाळ्यात पाहायला मिळाले.

समर्थांच्या चार घळी आणि अकरा मारुती आणि सप्त शिवालये करणे मनात होते, या वर्षी सप्त शिवालये करण्याचा योग् आला आता पुढे समर्थांच्या चार घळी .

Kiran Khamkar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here