महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,75,237

सपिंड्या महादेव मंदिर | Sapindya Mahadev Temple

By Discover Maharashtra Views: 1314 2 Min Read

सपिंड्या महादेव मंदिर | Sapindya Mahadev Temple –

शनिवारवाड्या समोरच्या काकासाहेब गाडगीळ पुतळ्याकडून जुन्या बाजाराकडे जाताना उजव्या हाताला कसबा पेठ अग्निशामक केंद्र लागते. त्याच्या शेजारी एक जमिनीत गाडले गेलेले प्राचीन शिवमंदिर आहे. सपिंड्या महादेव मंदिर या नावाने ते ओळखले जाते. (Spindya Mahadev Temple)

एकेकाळी पुण्याचे स्मशान आणि दशक्रिया विधी करण्याची जागा कसबे पुण्याच्या मुठा नदीकाठी श्री पुण्येश्वर (धाकटा शेखसल्ला) आणि श्री नारायणेश्वर (थोरला शेखसल्ला) यांच्या दरम्यान असणाऱ्या एका शिव मंदिराजवळ म्हणजेच सपिंड्या महादेव मंदिराजवळ होती. पुढे इ.स. १७४० च्या सुमारास ओंकारेश्वराची निर्मिती झाल्यावर स्मशान व दशक्रियाविधीची जागा त्या परिसरात हलली. त्यामुळे सपिंड्या महादेवाचा हा परिसर दुर्लक्षित झाला. इ.स. १९६८-७०च्या आसपास नदीकाठाने शिवाजी पूल ते संगम पूल असा नवीन प्रशस्त नदीपात्रापेक्षा जवळजवळ चाळीस फूट उंच रस्ता करण्यात आला. त्यासाठी जुन्या कोटाच्या उत्तरेच्या भक्कम तटाचे अवशेष पाडून टाकावे लागले आणि  तो भाग समतल करताना त्यासाठी टाकलेल्या भरावात सपिंड्या महादेवाचे मंदिर पूर्णतः गाडले गेले. डिसेंबर २००३ मध्ये केलेल्या खोदकामामध्ये या मंदिराचा कळस आढळला. आजूबाजूचा आणखी भाग खोदल्यावर, सुस्थितीतील सपिंड्या महादेव मंदिर पुन्हा उघडकीस आले.

मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या उतरून खाली जमिनीत जावे लागते. मंदिर छोटेसे आणि सुंदर आहे. मंदिरासमोरच्या कोनाड्यामध्ये छोटीशी नंदीची मूर्ती आहे. मुख्य मंदिरामध्ये गाभाऱ्यात शिवलिंग आहे. मागच्या भिंतीवर कोनाड्यामध्ये डाव्या हाताला शेंदुरचर्चीत गणपती, मध्यभागी कालभैरव आणि जोगेश्वरी आणि उजव्या हाताला देवीची मूर्ती आहे.

ह्या मंदिराचा रस्ता एका खाजगी मठातून आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा तो बंद असतो.

संदर्भ:
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोवनी
मुठेकाठचे पुणे – प्र. के. घाणेकर

पत्ता : https://goo.gl/maps/dJaiuBDQHPNUvJZx7

Varsa Prasarak Mandali – वारसा प्रसारक मंडळी  & आठवणी_इतिहासाच्या

Leave a comment