बटाट्या मारुती, पुणे

बटाट्या मारुती, पुणे

बटाट्या मारुती, पुणे –

सुमारे १००० /१२०० वर्षापूर्वी सध्या जिथे पुणे वसलेले आहे तिथे एक लहानशी वाडी होती. त्यात मारुती, बहिरोबा (रोकडोबा ), पुण्येश्वर आणि नारायणेश्वर अशी देवळे होती. त्या मारुतीला एक छोटी घुमटी होती. कालौघात पुण्याचा विस्तार वाढला. पुण्याची वस्ती वाढू लागली. पेशव्यांनी शनिवार वाडा बांधला. ती मारुतीची छोटी घुमटी शनिवारवाड्यासमोर आली. ती कसबा पेठेची पश्चिमेची आणि शनिवार पेठेची पूर्वेची हद्द समजली जायची. शनिवार वाडा ते या घुमटीपर्यंतची जागा मोकळी होती.(बटाट्या मारुती, पुणे)

मंडई बांधण्यापूर्वी शनिवार वाड्यासमोरच्या पटांगणात भाजी बाजार भरत असे. त्या बाजारात असलेल्या मारुती मंदिराजवळ बटाटे विकणारे बसत असत. म्हणून या मारुतीला बटाट्या मारुती असे नाव पडले. पण त्या नावाला कागदोपत्री काही पुरावा नाही. तसेच त्या मारुतीचे जुने नावही सापडत नाही.

सध्या असलेले मंदिर शिवाजी पुलाचे बांधकाम ज्यांनी केले त्या रावबहाद्दूर गणपत महादेव केंजळे यांनी केले.  या मारुतीचे वैशिष्ट्य असे की तो बसलेला आहे. अशी मारुती मूर्ती दुर्मिळ असते. मारुतीच्या एका हातात गदा आहे  तर दुसरा हात गुढघ्यावर ठेवलेला आहे. मारुतीच्या मूर्ती शेजारी दोन्ही बाजूला एक एक गणपतीची मूर्ती आहे.

संदर्भ:
मंदार लवाटे
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी
पुणे वर्णन – ना.वि. जोशी
पुणे शहरातील मंदिर – डॉ. शां.ग. महाजन


The Shaniwar Palace, Pune. This picture depicts a gateway to the Shanwar Palace in Pune seen from the square, where a vegetable market is being held. This scene includes a small shrine under a tree in the foreground.
By William Carpenter, William © Victoria and Albert Museum, London

पत्ता : https://goo.gl/maps/5PSdTGMQvr2rkCBk9

आठवणी इतिहासाच्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here