धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९१

By Discover Maharashtra Views: 2392 10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९१ –

“जगदंब! जगदंब!” सिंहासनाच्या नुसत्या दर्शनानेच राजांचा हात छातीशी गेला. सिंहासनाच्या वाघमुखी हातबैठकी बघताना संभाजीराजांना राजांचे बोल आठवले –

“आपण प्रथम भोसले आहोत, मग शिकारी! वाघ हे जगदंबेच्या बैठकीचं जनावर आहे.”

राजे-सोयराबाई, संभाजीराजे चंदनी पाटावर बसले. गागाभट्रांनी अथर्वशीर्षातील गणेशस्तोत्राचा उद्गोष केला, “ गं गणपतये नम:। त्वमेव कर्ता, त्वमेव….”

गणेश आणि सिंहासन पूजन झाले. मानाचे बकरे पडले. कोदंडाची पूजा झाली. सुवर्णफुलांची उधळण झाली

“आईणए। सिंहासनको हस्तस्पर्श दीजिए।” गागाभरट्टांनी राजमंडळाला विनंती केली. राजे-सोयराबाई पुढे झाले. रामराजे ते सारे बघत बगलेला उभे होते

“र्‍या बैठकीस हात देऊ या.” संभाजीराजांनी मायेने रामराजांचा हात आपल्या हाती घेत त्यांना सिंहासनाजवळ घेतले. “बोला हर हर हर महादेव!” भोवतीच्या मावळ नरड्यांच्या घाटी फुटल्या. राजमंडळाने सिंहासनाला मानाचा हस्तस्पर्श दिला. हंबीरराव, आनंदराव, मोरोपंत, अण्णाजी, रामचंद्रपंत, येसाजी सारे पुढे झाले.

“जय भवानी” गर्जत त्यांनी शूचिर्भूत झालेले सुवर्णसिंहासन फुलांच्या माळांनी सजलेल्या रथासारख्या गाड्यावर चढविले. त्या गाड्याला सजलेले पाच पांढरेशुभ्र घोडे जोडण्यात आले होते. राजांनी झुकून गणेशाची सुवर्णमूर्ती उचलली आणि छातीजवळ कवबड्यांच्या माळेवर धरली. संभाजीराजांनी कोदंड उचलला.

रणहलग्यांच्या रोमांचक काठ्या तडतडल्या. लेझीम तोड्यांनी लय पकडली “छूळळ खण खण छळळ” उखळी, बंदुकांचे बार दणाणले. शिस्त धरलेल्या हुजराती फौजेच्या धारकऱ्यांच्या हातांतील पाती उन्हात झगमगू लागली. गुलालाच्या मुठी उधळल्या. फुलांच्या ओंजळी उसळल्या. शिंगे ललकारली. चालले. मानाचे सिंहासन मराठ्यांच्या मसनदीकडे मरातबाने रत्नशाळेकडून दरबारीचौकाकडे चालले. जिजाऊंनी मनी जागविलेले तुळजाई स्वप्न जिवंत होऊन चालू लागले! जंगमैदानावर घाईगर्दी करून धारातीर्थी देह ठेवताना – “राजास्री आमचा जुहार

दंडवत सांगा” म्हणणाऱ्या कैक आकाशवीरांचे सार्थक चालले! समर्थांचे “आनंदवनभुवन चालले! असंख्य मायमाउलींचे कुंकबळ चालले! हिंदूंच्या शतकानुशतके गाडल्या गेलेल्या आशांचे ऐरावती बळ चालले! ‘श्रीं’चे कल्याणकारी राज्य चालले!

सिंहासनाच्या गाड्याची पिछाडी धरून गणेशमूर्ती हाती घेतलेले राजे, पंचारती घेतलेल्या सोयराबाई, समर्थांचा कोदंड घेतलेले संभाजीराजे आणि त्यांचे बोट हातात धरलेले रामराजे, असे सारे त्या सिंहासनाशी रक्ताने बांधील असलेले राजमंडळ चालले. वाजत-गाजत नगारखान्याच्या दरवाजाने दरबारचौकात आला. सिंहासनाच्या चौथऱ्याची सारी मखरे सुवर्णात घडली होती. अष्टखांब, मेघडंबरी, मत्स्यमोर्चेल, न्यायतुला असा देखणा साज झळकत होता. त्या चौथऱ्याची मधली जागा या खाशा सिंहासनासाठी मोकळी राखण्यात आली होती. राजांनी गणेशमूर्ती संभाजीराजांच्या हाती दिली.

रथगाडा चौथऱ्याजवळ आला. गागाभट्ट राजमंडळासह चौथऱ्यावर चढले. हत्तीच्या पायाखालच्या शुभ मृत्तिकेने भरलेले तबक घेऊन प्रभाकरभट चौथरा चढले. सुवर्णी खिळा ठेवलेला तबक घेऊन रामजी दत्तो चौथरा चढले. चौथऱ्यावर शिडी चढविण्यात आली. रामजींच्या हातातील तबकातून गागाभट्टांनी सुवर्णी खिळा उचलला. मंत्रोज्चार करीत त्यांनी तो निरखला आणि राजांच्या हाती दिला.

राजे खिळा घेऊन शिडीजवळ आले. हंबीरराव, येसाजी, आनंदराव यांनी शिडी तोलून धरली. कोढता आणि खिळा घेतलेले राजे शिडीच्या पायऱ्या मागे टाकीत मेघडंबरीच्या थेट छताला भिडले. साऱ्या माना “वर’ उचलल्या गेल्या!

हातीचा सुवर्णी खिळा राजांनी मेघडंबरीच्या छताला रोखलेल्या छिद्रात ठोकला. “सुवर्णमेख’ बसली. राजे खाली आले. शिडी हटली. सिंहासनाखाली ‘हस्तिमृत्तिका’ प्रदान करण्याचा विधी सुरू झाला. मंत्राचा घोष उठू लागला. गागाभट्टांनी प्रभाकरभटांच्या हातातील हत्तीच्या पायाखालच्या मृत्तिकेने भरलेले तबक आपल्या हाती घेतले. मुठीने त्यातील माती राजांच्या ओंजळीत सोडली.

चौथऱ्यावर मोकळ्या राखलेल्या, सिंहासनाखाली येणाऱ्या चौकात ती शिवरून टाकण्याची इशारत केली. राजांनी मृत्तिकेची ओंजळ चौकात शिवरली. सोयराबाई पुढे झाल्या. त्यांच्या हाती गागाभटांनी व तन त्तिका दिली. त्यांनी आपली सवाष्ण ओंजळ चौकात सोडली. सं गजांनी गणेशमूती वब कोदंड प्रभाकरभटांच्या हाती दिला. पुढे होत आचार्यांनी दिलेली मृत्तिका चौकात सोडून ते मागे झाले. गागाभट्ट तबक ठेवण्यासाठी म्हणून वळू लागले. एवढ्यात आपल्या शेजारी असलेल्या रामराजांची ओंजळ आपल्या हातांनी जोडून सोयराबाईंनी ती आचार्यांच्या समोर धरली! आचार्य क्षणभर घोटाळले. मग त्यांनी मृत्तिका रामराजांच्या ओंजळीत ठेवली. त्यांचे हात तसेच चौकाकडे नेत सोयराबाई म्हणाल्या – “हां, सोडा ओंजळ चौकात!” हत्तीच्या पायांखाली रगडलेली माती पडू लागली – सिंहासन चौथऱ्याच्या बैठक-चौकात!

अभिपषेकपूर्व विधींना सुरुवात करण्यापूर्वी सोयराबाई आणि संभाजीराजांना घेऊन राजे जिजाऊंच्या महाली आले. फलाहार आणि दुग्धपान असे व्रत पाळल्यामुळे त्या तिघांच्याही डोळ्यांत तेज उतरले होते. आपल्या महाली मध्यभागी गिर्द्यालोडांची बैठक टाकून जिजाऊसाहेब बसल्या होत्या. गेले पंधरा दिवस त्या तकवा नव्हता, तरी आल्या-गेल्या माणसांची आस्थेनं विचारपूस करीत अशाच बसल्या होत्या. राजे-संभाजीराजांना बघून त्या बैठकीवरून उठण्याच्या खटपटीला पडल्या. ते बघून पुढे झेपावलेल्या संभाजीराजांनी त्यांना बळेच बसते केले.

राजे-युवराज जोडीने त्यांना नमस्कार करण्यासाठी वाकले. बसल्या बैठकीवरून जिजाऊंनी त्या दोघांचे मुखडे छातीशी बिलगते घेतले. त्यांचे शब्द थकले होते. सुरकुतले होते. म्हातारे झाले होते. ते घशातच अडकले.

“हे बघायला आमची स्वारी आज असायला पाहिजे होती!”

शहाजीराजांच्या नुसत्या आठवणींबरोबर जिजाऊंचे डोळे भरून आले सुरकुत्यांच्या पाटांतून आत्म्याचे पाणी वाहू लागले. एवढे दृष्ट लागण्यासारखे विधी गडावर होताहेत पण – पण त्यांतील एकही आम्हास बघता येत नाही. येणार नाही! कपाळ उजाडल्यामुळे! पोटी तहानेचा जाळ असता – समुद्रात पाण्याने वेढलेले असूनही पिण्यासाठी एक थेंबही हाताशी येऊ नये, तशीच ही गत आहे! आम्ही साऱ्यात आहोत आणि कशातही नाही! “जगदंब, जगदंब!’ आपल्या भरून येणाऱ्या मनावर जिजाऊंनी तुळशीपत्र ठेवले. आणि म्हटले, “औक्षवंत व्हा!”

जिजाऊंनी राजे-संभाजीराजांना शिगभरल्या जबानीने आशीर्वाद दिला. “सौभाग्यवंत व्हा!” थरथरत्या हाताने सोयराबाईना आशीर्वाद दिला. “मासाहेब, आता माणसांचा राबता तोडा. आराम घ्या.” राजे काळीजपिळाने म्हणाले.

“राबता तुटणार कसा? आम्ही राजमाता होणार आहोत. आता तर राबता वाढीला पडेल. आम्हीहून लोकांचा राबता कधीच तोडणार नाही राजे!” निग्रही जिजाऊ आग्रहाने म्हणाल्या. “येतो आम्ही.” संभाजीराजे आणि सोयराबाई यांच्यासह राजे त्या “थोरल्या माये’च्या महालाबाहेर पडले.

जगदीश्वरावर दुग्धाभिषेक करून ते तिघेही दरबारचौकातील प्रशस्त महावेदीवर आले. प्रमुख विधींना सुरुवात झाली. गागाभट्ट, बाळंभट, अनंतभट आणि तीर्थोतीर्थीचे विख्यात शास्त्रवेत्ते त्यांना विधिकर्मे सांगू लागले. स्वस्तिवाचन, क्रत्विजपूजन, वसोद्धारपूजन, मातृकापूजन, दुर्गपूजन, नांदीश्राद्ध, नारायणपूजन, आज्यहोम – एकेका विधीचा तर्पशिलांनिशी सांगता होऊ लागली. राजे, युवराज आणि सोयराबाई यांच्या राजहस्तांनी निरनिराळ्या होमकुंडांत बेल, बट, औदुंबर, पिंपळ, आम्न यांच्या समिधा पडू लागल्या. दूध, तूप, दही, मध यांचे हवन होऊ लागले. या विधींतील सर्वांत मौजेचा विधी आला राजांच्या मौंजीबंधनाचा! त्यासाठी राजे चंदनी पाटावर वैतेदार न्हाव्यासमोर बसले – डुईवर संजाब कोरून घेण्यासाठी! बलदंड राजे ‘बटु’ झाले. राणीवसा, कन्यावसा असताना, फर्जद-सूनबाई असताना राजांचे सविध मौंजीबंधन झाले! छातीवर यज्ञोपवीत चढले. अवघ्या मुलखाला नवा जन्म देणारे राजे “द्रिज’ झाले!

मौंजीबंधनाने रद्दबातल झालेले राजांचे पूर्वील विवाह शास्त्रसंमत करून घेण्यासाठी त्यांचे पुन्हा सोयराबाई, सकवारबाई, पुतळाबाई आदी राण्यांशी समंत्रक विवाह झाले. राजांनी गागाभट्टांना मनची एक इच्छा बोलून दाखविली – “आम्ही सूर्यवंशी करिता आम्हास सवित्‌ मंत्राचे पुरश्चरण द्यावे.” गागाभट्टांना ती पटली. सवितृहोमासाठी यज्ञकुंड सज्ज करण्यात आला. हा होम स्त्रियांना लाभत नसल्याने या विधीतून सोयराबाईंना वगळण्यात आले.

उगवतीला पुढा करून राजे आणि संभाजीराजे यज्ञकुंडा जवळ बसले त्यांच्या भोसलाई हातांनी त्यांचे आदिदैवत सूर्यनारायणाच्या नावे कुंडात चंपक, चंदन, बिल्वकाष्ठांच्या समिधा पडू लागल्या. हवन उरकून ते दोघेही सूर्यवंशी पितापुत्र उभे ठाकले. गंगा, सिंधू, जमुना आदी ससनद्या जल त्यांच्या ओंजळीतून अर्घ्य म्हणून मावळी सूर्याला अर्पण होऊ लागले. मिटल्या डोळ्यांनी सवितृ-मंत्राचा उद्घोष ते गायत्री छंदात करू लागले – “

भूर्भुव: स्व: तत्‌सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्‌!”

“भूलोकाला आणि स्वर्लोकाला उजळणारे ते सूर्याचे दिव्य तेज आम्ही सदैव चिंतितो. ते दिव्य तेज आमची बुद्धी उजळून टाको.” शांतिहोमांच्या पवित्र मंत्रघोषांनी बालेकिल्ल्याची तटबंदी चौथडी भरून वाहू लागली. विनायक, नक्षत्र, इंद्र, ग्रह पुरंदर या होमांचे यज्ञकुंड धडधडले. हवनासाठी जाळून घेणाऱ्या दूध, तुपाच्या पौष्टिक वासाने महावेदी दाटून गेली.

महावेदीच्या मध्यभागी थोराड, रूपेरी पारड्यांची पुष्पमालांनी सजलेली तुला एका भक्कम खांबाला उभी करण्यात आली होती. तिचे पूजन झाले.

राजांच्या तुलादानविधीला प्रारंभ झाला. उजव्या बाजूच्या पारड्यात उजवा पाय प्रथम ठेवून राजांनी वीरबैठक घेतली. गागाभट्ट, बाळभट, अनंतभट ओंजळी- ओजळींनी तबकातील झळझळीत सोनमोहरा तुलेच्या डाव्या पारड्यात सोडू लागले. भोसलाई सोनसूर्य वर घेण्यासाठी सोने झटू लागले. रोखल्या नजरेने संभाजीराजे पारड्याकडे बघत होते. “या उभ्या रायगडाला सोनरूप देऊन तो डाव्या पारड्यात उचलून ठेवला, तरी आबासाहेबांचं पारडं फरसबंदी सोडून उठू नये!’ असे त्यांना वाटत होते. राजांनी बीरासनी बैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडून उचलले गेले.

राजांची सुवर्णतुला झाली. मंत्रांचा घोषच घोष उठला. सतरा हजार तोलल्या मोहरा तबकात उतरून त्यावर गागाभट्टांनी मंत्रित फुले ठेवली. चांदी, तांबे, कापूर, शिसे, फळे, मध, मसाले, साखर अशा राजांच्या आणखी पंधरा तुला राजबैठकीत जोखण्यात आल्या.

“युवराज, आइये। पुष्प चढाइये तुलादेवतापर।” गागांनी संभाजीराजांच्या हाती फुलांची ओंजळ ठेवली. फुले वाहून संभाजीराजांनी तुलेवर हळदीकुंकू सोडून तिला वंदन करीत उजवा पाय उजव्या पारड्यात ठेवून वीरबैठक घेतली. मंत्रांचे घोष उठू लागले. गागाभट्ट, बाळंभट, प्रभाकरभट सोनमोहरांच्या ओंजळी डाव्या पारड्यात सोडू लागले. त्यातून खणखणात पारड्यात उतरणाऱ्या मोहरा बघताना विचाराची एक ओंजळ कुठूनतरी संभाजीराजांच्या मनाच्या पारड्यात सोडली गेली –

“आमच्या मासाहेब इथं येतील आणि “शंभूबाळ’ म्हणत शिवलिंगाला नेहमी वाहतात त्यांतील एकच बिल्वपान या पारड्यात सोडून आमच्याकडं बघतील तर आमचं पारडं हां-हां म्हणता आभाळाला जाऊन थडकेल!!’

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९१ –

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment