धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४५

संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४५

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४५…

राजगडावरून निघालेली संभाजीराजांची स्वारी दिवस कलंडायला आला असताना मिर्झा राजाच्या तळाजवळ आली. भले मोठे पाण्याचे टाके तांबडया कमळांनी फुलून जावे, तसे उभे कऱ्हेपठार केशरी राहुट्यांनी भरून गेले होते. तळापासून हाकेच्या टप्प्यावर संभाजीराजांची ठाण करून किरतसिंगाने आपल्या राणाजींना वर्दी पाठवली.

मिर्झा राजाचा पसरलेला प्रचंड तळ, हत्ती, उंटाचे चीत्कार, तोफगाड्यांचे खडखडाट या कशाकडेच संभाजीराजांचे लक्ष नव्हते. ते रोखल्या नजरेने समोर दिसणाऱ्या

तोफमाऱ्याने काळवंडलेल्या पुरंदराकडे बघत होते. ते त्यांचं जन्मस्थळ होतं. कसलीतरी न कळणारी सळसळ त्यांच्या उदरात दाटली होती. मिर्झा राजाचा मुन्शी उदयराज, इंद्रमण बुंदेला आणि काही धारकरी संभाजीराजांच्या आगवानीसाठी सामोरे पेश आले. तळावर शहाजणे वाजू लागली. नेताजींच्या सोबतीने संभाजीराजे मिर्झाच्या सर्वात उंच उठून दिसणाऱ्या शामियान्याकडे चालले.

उभ्या हयातीत एवढ्या पोरवयाच्या पराक्रमाचे स्वागत करण्याचा प्रसंग कधी मिर्झा राजावर आला नव्हता. त्याला ‘कँवर’बद्दल कुतूहल होते.

मिर्झाच्या तळावरील रजपूत, पठाण, बहलिया धारकरी धावत येत दाटीने “सेवा का बच्चा’ बघत होते. नेताजींच्या पाठोपाठ संभाजीराजे मिर्झाच्या शामियान्यात प्रवेशले.

संभाजीराजांना बघताना मिर्झाच्या पातळ ओठांतून अस्पष्ट शब्द निसटले, “ओ ह सरण चंडी! बेहतरीन!” आपल्या कपाळावरच्या केशरी टिळ्याची घडी करून टाकत,

भुवया चढवून मिर्झा राजे जयसिंग समोर बघतच राहिला. आकाशात लकलकणाऱ्या तेजवान विजेचा एक तरतरीत कोवळा कोंभ त्याला आपल्या शामियान्याच्या दारात उभा

ठाकलेला दिसत होता! उग्रसेन कछवाहकडून हे शिवाजीराजांचे ‘असली कुंबर’च आहेत, याची शहानिशा करून घेण्याचे भान काही मिर्झा राजाला राहिले नाही!

“आडये कुंवर शंभूराजे!” म्हणत मिर्झा राजे हसत दोन-चार कदम पुढे झाले. पुढे होत “आम्ही मुजरा करतो आहोत, दादाजी,” म्हणत संभाजीराजांनी मिर्झा राजांच्या पायाला आपले हात भिडवले. ते काय करताहेत हे पटकन न उमगलेला मिर्झा थोडे मागे हटत म्हणाला, “ये -ये-क्या कर रहे हो, कुंवर?” त्यांच्याकडे निर्भय डोळ्यांनी बघत संभाजीराजे खणखणीत आवाजात म्हणाले,

“गड सोडताना आमच्या महाराजसाहेबांनी आम्हास बजावलं आहे की, आपल्याला आम्ही “दादाजी” म्हणावं. त्यांच्या ठिकाणी आपल्याला मानावं. आम्ही त्यांची आज्ञा पाळावी.” गंगाधरपंतांनी पुढे होत, त्याच्या उत्तरी तर्जुमा सांगितला. शिवाजीराजांनी आपल्यावर केवढी जिम्मेदारी टाकली आहे, हे संभाजीराजांच्या तोंडून मिर्झा राजाला आता अचूक कळून चुकत होते! राजांचा “विश्वास टाकून माणूस बांधील करण्याचा बेत’ संभाजीराजांच्या पहिल्या भेटीतच अचूक साधला गेला.

संभाजीराजांचा हात हातात घेत मिर्झा राजाने त्यांना अलिशान बैठकीवर नेऊन बसविले. शामियान्यात असलेला उग्रसेन, मिर्झा राजाची नजर त्याच्यावर जाताच मिर्झा

राजाच्या जवळ आला. तसलीम करून म्हणाला, “राणाजी, एक बात….”

▶ “बोलो उग्रभान, क्‍या है?” मिर्झाने विचारले.

झटकन मिर्झा राजाच्या कानांजवळ आपले तोंड नेत उग्रसेन हळूच त्याच्या कानात राजपुतानीत पुटपुटला, “ये कवर संभूही है! खुद राजासाबने अपने कुलदेवीकी माला इसके गेलेमें चढाई हे!” आणि हे सारे तो गळ्याभोवती हात फिरवून मिर्झा राजांना अभिनयाने पटवून देऊ लागला.

ते ऐकून मिर्झा राजे मान टाकीत एकदम मोठ्याने हसले. सरकारी ढंगात बोलून गेले, “बेवकूफ हो उग्रभान! जाओ अपने डेरेमें!” उग्रसेनाच्या त्या हालचालीमुळे संभाजीराजे आणि नेताजी थोडे बिचकले! एकमेकांना त्यांनी सावध नजर दिली. नेताजींची भरीव बोटे नकळत कमरेच्या हत्याराच्या मुठीवर गपकन रुतली. शामियान्याच्या दरवाजाकडे रोखल्या नजरेने बघताना नेताजींच्या ताणल्या छातीवरचा बाराबंदीचा एक बंद तटकन तुटला! त्यांना ‘दग्याची’ शंका आली. पण हे सारे उग्रसेनाच्या गैर हालचालीमुळे झाले होते.

मिर्झा राजाने आपल्या चलाख डोळ्यांनी नेताजी आणि संभाजीराजे कसल्या गैरसमजात आले आहेत, हे हेरले. तो गडबडीने म्हणाला, “गलतफहमी न करना कवर! ये

उग्रसेन तुम्हारे गलेकी मालाकी निशानी बनाकर तुमही राजासाब के असली कुंवर हो और कोई नहीं ये बता रहा था!”

🔊 ते ऐकताना कोंडल्या श्वासाचा दमदार नि:श्वास टाकून हत्यारावरची मूठ ढिली टाकत नेताजी म्हणाले, “चटका लागल्याबिगर कळत न्हाई ‘इंगळ’ कनचा अन्‌ ‘कोळसा’

कनचा!” मिर्झा राजाला मात्र नेताजींची मावळबोली काही कळली नाही!

सगळ्या तळाभोवती पावसाळी सांज दाटून आली होती. पाखरांचे थवे आपल्या कोटरांच्या निवाऱ्याकडे परतून स्थिरावले होते. तळावरच्या रसोईखान्याच्या आगळ्या

धुराचे लोळ फेकीत शिलगत होत्या. मिर्झा राजाच्या शामियान्याच्या दारात उभे असलेले संभाजीराजे नजर जोडून, पावसाळी ढगांनी वेढलेल्या धुरकट पुरंदरच्या माथ्याकडे बघण्यात स्वत:ला हरवून गेले होते. शामियान्याची कनात धरून नेताजींच्या निवडक धारकऱ्यांचे पथक हातांत नंगी हत्यारे पेलून सावध अंगाने खडे होते. त्यात स्वत: नेताजी संभाजीराजांच्यावर नजर ठेवून उभे होते. सुरक्षितता आणि इतमाम म्हणून मिर्झा राजाने संभाजीराजांच्या मुक्कामाची सोय खुद्द आपल्या शामियान्यातच केली होती. त्यावर किरतसिंग आणि आपले खास विश्वासू रजपूत लढवय्ये जोडून दिले होते. शामियान्याच्या अंतःपुरात मिर्झा राजा रणचंडीची संध्यापूजा करण्यात गुंतला होता. कितीतरी वेळ संभाजीराजे पुरंदरचा धुरकटला माथा एकटक निरखीत राहिले. आता चांगलेच अंधेरून यायला लागले होते.

एकसारखी चुळबुळ करणारे नेताजी पुढे झाले. संभाजीराजांना मुजरा करून म्हणाले, “किन्नाटीचं आता बाळराजांनी आत चलावं! भाईर हुबं ऱ्हाऊ नये.”

कसलीतरी साखळी तुटल्यासारखे संभाजीराजे भानावर आले. नेताजींच्या थोराड पगडीकडे बघत म्हणाले, “नेताजीकाका, हा गड आम्हास जणू साद घालतोय!

त्याच्यावरची नजर काढू नये असंच वाटतंय. छातीत खळबळ माजतेय.”

पगडी डोलवीत नेताजी म्हणाले, “बराबर हाय बाळधनी. मानूस जिथं उपाजतं ती जागा त्येला सादच घालती! तुमी या गडावं उपजला. म्याच किल्लेदार हुतो त्या बक्ताला. मासायबांनी लई गर्दी उडवली हुती तुमचं पयलं बाळरडं ऐकून! आता ह्यो गड पठाणाच्या कब्जात हाय, न्हाईतर दावला असता थोरल्या रानीसायबांचा म्हाल तुमास्री

एकडाव!” ते तगडे रांगडे मन हे बोलताना दाटले होते.

सगळी कोडी सुटल्यासारखे संभाजीराजांना क्षणभर वाटले. पण अशी कोडी कधीच सुटत नसतात! गुंतवा झालेल्या धाग्याच्या भेंडोळ्यातून नेमका शेव हाताशी येत नाही. संभाजीराजांचे मन आपल्या “’आऊसाहेबांचा’ विचार करू लागले. किल्ले पुरंदर बरून कसा दिसत असेल, अशी उत्सुकता त्यांच्या मनात येऊन गेली. ते दरवाजातून वळले.

संथपणे शामियान्यातील तलम रुजामे तुडवीत गेले.

संभाजीराजांसह रात्रीचा खाना एका पंक्तीने उरकून शामियान्याच्या ख्वाबगारात मिर्झा राजे आपल्या मंचकावरच्या मऊ बिछायतीवर लेटले होते. मावळतीच्या बाजूला एका शिसवी मंचकाच्या बिछायतीवर संभाजीराजे पडून होते. त्यांच्या अंगावरची शाल दूर हटून पायगतीला गोळामोळा होऊन पडली होती. आतली हिंदोस्थानी शमादाने मंद तेवत होती. ख्वाबगाराला लागून असलेल्या अंतःपुरात मिर्झा राजाने पुजलेल्या रणचंडीच्या मूर्तीसमोर तेवत होत्या

शामियान्याच्या सगळ्या घेराभोवती मावळे धारकरी आणि रजपूत हशम यांचा छबिन्याचा जोड पहारा नागव्या तलवारी पेलून जागत्या डोळ्यांनी फिरत होता. आपल्या जाड मावळी पायताणांची कुरकुर उठवीत, हातात नंगी तेग धरून खासे नेताजी त्या पहाऱ्यावर नजर ठेवीत फिरत होते. तळावर जागजागी आगट्या पेटल्या होत्या. मधूनच

त्यातील बाभळीच्या गाठी पेटता-पेटता फाटकन फुटत होत्या. त्यामुळे फबारलेल्या ठिणग्यांचा आगटीभोवती सडाच पडत होता.

समोर टाकलेल्या गवताच्या पेंढ्या सोंडेने झटकून नीट मुंगीरहित करून मगच घशात सोडताना हत्तींच्या गळ्यांतील घंटाचे उठणारे घुमारे नाद तळावर पसरत होते.

बैठक घेतलेले उंट माना ठेवून मिटल्या डोळ्यांनी रवंथ करीत होते. त्यांच्या ओठाळीतून फेसाच्या तारा तरंगत होत्या. लीद टाकलेली घोडी अखंड शेपट्या चाळवीत उभ्या-उभ्या जिंगत होती. तळावर शांत रात्र उतरली होती.

आपल्या बिछायतीवर संभाजीराजे मात्र तळमळत होते. एकसारखी कूस पालटत होते. थोरल्या मासाहेबांचा मायेचा हात पाठीवर घेऊन बिनघोर झोपण्याची सवय असलेले संभाजीराजे बैचैन होते. लेटल्या-लेटल्या त्यांची घालमेल निरखणारा मिर्झा राजे आपल्या मंचकावरून उठला. किमॉश उतरून ठेवल्यामुळे त्याचे रूपेरी केस शमादानांच्या प्रकाशात लकलकले. संभाजीराजांच्या मंचकाजवळ येत त्याने आपला हिरेजडित अंगठया असलेला हात

संभाजीराजांच्या पाठीवर ठेवला. त्या स्पर्शाने शंभूराजे दचकून उठले. मिर्झा राजाच्या पांढऱ्या सफेद केसांकडे बघू लागले.

▶ “कुंवर, तुम्हे नींद नहीं आती! जगह बदल गयी कि नींद हजम होती है! आवो हमारे बिस्तरपर लेट जावो! डरो मत.” मिर्झा राजाने त्यांचा हात धरून त्यांना मंचकावरून उतरते केले. हळुवारपणे आपल्या मंचकाजवळ आणले. संभाजीराजे मिर्झा राजांच्या मंचकावर बसले. समोर उभ्या असलेल्या धिप्पाड; पण शांत मुद्रेच्या मिर्झा राजाकडे त्यांनी पाहिले. मिर्झाच्या छातीवर त्याच्या आलमपन्हा

औरंगजेबाने त्याला बहाल केलेले हिरव्याकंच पाचूचे मोतीलगात गुंफलेले पदक चमकत होते. त्या पदकाकडे बघत संभाजीराजे क्षणभर गप्प झाले. मग मान उडवून त्यांनी विचारले, “दादाजी, आम्ही एक विचारू?”

“बेशक पूछो कबर संभू।” मिर्झा शांतपणे म्हणाला.

“आमचे आबासाहेब म्हणाले की, तुम्ही रजपूत आहात आणि आम्हीही रजपूत आहोत. मग-मग तुमच्या गळ्यात भवानीच्या कवड्यांची माळ का नाही?”

त्या प्रश्नाने मिर्झा राजा हा दिल्ली दरबारचा थोर राजकारणी चरकला. त्याच्या डोळ्यांत एक दुखरी छटा तरळून गेली. आपल्या छातीवरच्या हिरव्या पदकावरून कसातरीच हात फिरवीत तो म्हणाला, “बहोत रात उतर आयी. सो जावो कुंवर।”

संभाजीराजांना लेटते करून मिर्झा राजाने त्यांच्या अंगावर शालनामा पांघरला. स्वत: मिर्झा राजा त्यांच्या शेजारी कलंडला. “चंडी चंडी” असे पुटपुटत आपल्या हयातीच्या चुकलेल्या, मार खाल्लेल्या वाटा आठवू लागला. कुसवे होऊन मिर्झा राजाने संभाजीराजांच्यावर नजर टाकली. त्यांचा श्वास बिनघोर लयीत लागला होता!

शामियान्यासमोरच्या पैस जागेत शाही इतमामात बैठकीच्या चौथरा सजला होता. त्यावर राजपुती वाणाच्या तलम बिछायती अंथरल्या होत्या – जरीबतूची नकसदार

कलाकुसर असलेल्या खोळी घातलेल्या गिर्च्या, लोड मांडले होते.

क्रमशः-  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४५…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here