छत्रपती शिवरायांचं अज्ञात समकालीन चित्र उजेडात

छत्रपती शिवरायांचं अज्ञात समकालीन चित्र उजेडात

छत्रपती शिवरायांचं एक समकालीन अज्ञात चित्र उजेडात –

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी निगडित अज्ञात समकालीन संदर्भ साधनं कालागणिक उजेडात दिसून येत आहे. छत्रपती शिवरायांची आतापर्यंत समकालीन आणि उत्तरकालीन अशी मिळून जवळजवळ २८ – ३० चित्र आजघडीला प्रकाशित आहे, अगदी २ , ४ दिवसांपूर्वी शिवरायांची ३ समकालीन चित्रे उजेडात आली, प्रत्येक चित्राची काही न काही तरी खासियत असते, वैविध्य असतं, तर याच निमित्ताने छत्रपती शिवरायांचं अजून एक अज्ञात समकालीन चित्र उजेडात आलं असून त्यामूळे इतिहासाचा चिकिसात्मक दृष्टीने अभ्यास करणं सोपं होईल. अनेक नवे पैलू उजेडात येतील.छत्रपती शिवरायांचं अज्ञात समकालीन चित्र.

छत्रपती शिवाजी महाराजांचं एक नवीन समकालीन चित्र उजेडात आलं आहे, त्या आधी त्या चित्रांशी काहीप्रमाणात साम्य असलेले दोन चित्र येथे देतो. उपरोक्त दोन चित्रांशी जरी याचं साम्य जुळत असलं तरी ही वेगवेगळी चित्र असून बारकाईने निरीक्षण केल्यास त्यांच्या ठेवणीत, आणि वेशभूषेतही खूप वैविध्य आढळल्याचं दिसून येतं.

तर हे चित्र Dr. Robert J del bonta यांनी शोधलं असून मध्ये सॅन फ्रान्सिस्को च्या Art passage मधील OF LOVE, EPICS AND KINGSHIP मॅगझीन मध्ये indian paintings and decorative objects या सदराखाली छापून आलेलं होतं पण ते अद्याप कुणाच्या नजरेत आलेलं नाही.

छत्रपती शिवरायांचं अज्ञात समकालीन चित्र उजेडात

**मॅगझीन मध्ये म्हटल्या प्रमाणे महाराजांचे हे चित्र लंडन येथील चित्राशी जुळणारे आहे. परंतु हे चूक आहे. शिवरायांची इतर चित्र जर नीट अभ्यासली तर बिबिलिओथिक नॅशनल फ्रांस, व गिमे संग्रहालयातील चित्र या चित्राशी तंतोतंत जुळतात. अनेक वैविध्यपूर्ण बाबी आपणांस आढळून येतात, त्यापैकी चेहरेपट्टी आणि कल्ल्यांची (कानाच्या बाजूला असलेले केस) ठेवण ही तंतोतंत जुळते,

शिवाय अंगरख्याचा हाताच्या बाजूला असणारा जो भाग आहे तो घट्ट शिवण असून पातळ आहे. डोक्यावरील मंदिलाची ठेवण सुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीची असून खालील बाजूस झुकलेली दिसते, डोक्याच्या मंदिलाला काळा शिरपेच, तुरा नसून शुभ्र मोत्यांच्या माळा खाली हेलकावे घेत मानेकडे रुळताना दिसत आहेत.

आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हातात दांडपट्टा घेतलेला आहे जो इतर चित्रांपेक्षा खूपच वैविध्यपूर्ण असा आहे, म्हणजे दांडपट्टा हा इतर चित्रांत मुख्यत्वेकरून हातात परिधान करून शस्त्रसज्ज असा पवित्रा घेतलेला दांडपट्टा आढळून येतो पण या चित्रात दांडपट्टा विशिष्ट पद्धतीने मुठीखालील बाजूस हातात पकडला आहे. आणि इतर चित्रात दाखवल्या प्रमाणे तलवार किंवा कट्यार या चित्रात नसून उजव्या हातात फुल आहे.

हे अतिशय सुंदर आणि दुर्मिळ असं छायाचित्र एका आखीव रेखीव चौकटीत बसवलंय, ज्यामध्ये लाल रंगाच्या मोठ्या चौकटीत सुवर्णफुलांची सुबक मांडणी आहे, त्याच्या मधोमध एक कलाकुसर असलेली चौकट असून त्यात गर्द निळ्या चौकटीत एक वर्तुळ आखून त्यात ते चित्र रत्नखचित कोंदणाप्रमाणे जडवलंय.

शिवाय चित्राच्या दर्शनी भागावर फारसी मध्ये शिवा/ सीवा असं देखील लिहलेलं आहे.

चित्राच्या मागील बाजूसही अशीच आखीव मांडणी असून त्यात देखील सुबक चौकटीत एक वाक्य लिहून ठेवलंय, हे वाक्य मुहंमद बकीर याने लिहल आहे, जो कुतुबशहा च्या दरबारात होता, ते वाक्य फारसी भाषेत असून त्याला वळणदार शैलीत सजवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो, त्या वाक्याच लिप्यंतर आणि त्या वाक्याचा अनुवाद खाली देत आहे,

मगू बादाह दर शीशाह पन्हान शूदा
के जानिस्त दर कालब ए जान शुदा
अज़ इन शीशे पैदाई पनाह बबीन
ब-नेह ऐनक ओ सुरत जान बबीन

चषकात मद्य आहे असं न म्हणता
देहात प्राण आहेत असे म्हणा
या चषकात पहा तुम्हाला त्यात काय दडलंय ते दिसेल
चष्मा लाऊन पहा तो तुमचाच प्राण आहे !

इ.स. १६८० सालचं असलेलं हे चित्र समकालीन असल्याने याला विशेष असं महत्व प्राप्त झालं आहे.

प्रथमेश खामकर पाटील
संकेत पगार पाटील
रोहित पेरे पाटील

© इतिहास अभ्यासक मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here