महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,29,487

पिलाजी जाधवराव

By Discover Maharashtra Views: 6868 2 Min Read

पिलाजी जाधवराव

पिलाजी जाधवराव यांच्या वडिलांचे नाव चांगोजी तर आईचे नाव हंसाई होते.
चांगोजी यांच्या कडे वाघोलीच्या पाटीलकीचे वतन चालत आले होते. पिलाजी बाजीराव व चिमाजी आप्पा यांचे युध्दशास्त्रातील गुरु होते.
शाहू महाराजांच्या काळात मराठे उत्तर हिंदुस्थानात खूप सक्रिय होते. तेथे जवळजवळ प्रत्येक वर्षी स्वारी करून मुलूख आणि खंडणी प्राप्त करून घेत असत. पिलाजी जाधवराव हे या हालचालीं मधील एक अग्रणी #सरदार होते. त्यांनी अनेक स्वार्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
1722 मध्ये बाजीराव व पिलाजी उत्तरेत माळव्यात गेले होते. बुंदेलखंड पर्यंत दोघांनी मजल मारली होती. 1726 मध्ये ही राणोजी भोसले, रघुजी भोसले, अंबाजी त्रिंबक, आनंदराव पवार यांच्या सह पिलाजी जाधवराव यांनी माळव्यात मोठी स्वारी केली व दयाबहाद्दराशी युद्ध केले होते. त्यानंतर पालखेडच्या युध्दानंतर सरलष्कर दावलजी सोमवंशीचा हुकूमत बसवून देत पिलाजी व बाजीराव पेशवे देवगड चांदा मार्गाने पुन्हा माळव्याकडे गेले. बंगशाशीयुध्द करून छत्रसालास मदत केली. बंगश छत्रसालावर चालून आला होता. छत्रसालाने या वेळी पेशव्याकडे दुर्गादास ह्या आपल्या विश्वासु माणसाह.पाठवून मदत मागितली होती. तेव्हा या.प्रकरणात पिलाजी जाधवराव यांच्या मार्फत बोलणी झाली. कारण पेशव्यांचा त्यांच्या वर भरोसा होता. त्याप्रमाणे छत्रसालाच्या मदतीला पेशवे बुंदेलखंडाय निघाले. त्यांच्या बरोबर पिलाजी जाधवरावहेही होते. महंमद बंगश आपल्या वीस हजार फौजेनिशी पिलाजी जाधवराव यांच्या वर चालून आला. पिलाजींनी त्याला जेरीस आणले. बंगशाची कोंडी केल्याने शत्रू सैन्यात अन्नाचा दुष्काळ पडला. बंगशास मराठे गढामंडळ देवगडच्या जंगलातून येतील असे वाटले नव्हते. मराठ्यांनी बंगशाची रसद सामग्री बंद केली. बंगशाचे व त्याच्या सैन्याचे खूप हाल झाले. शेवटी 30 मार्च रोजी जैतापूर चा किल्ला पिलाजींनी जिंकला. बंगश शरण आला. बंगश व मराठ्यांच्या मध्ये तह झाला. छत्रसालावर परत चढाई करणार नाही असे ठरवून बंगश बुंदेलखंड सोडून गेला.

पिलाजींना सागर प्रांती चार खेड्यासह ( बधाई, परडीया, खुजनेरखेडा, हथना ) मोकलमाऊ, चौका, खामखेडा, खमरीया, गढामंडळ वगैरे मुलुख छत्रसाल राजाने जहागिर दिला.
पिलाजींनी भदावर, माळवा, कमरगा, नरवरा, शिप्री, ग्वाल्हेर, भोपाळ, सिरोंज, दतिया, ओर्छा, दिल्ली स्वारी, इत्यादी लढायांत भाग घेतला होता.
त्यांनी उत्तरेकडील रतनगड चा किल्ला जिंकून घेतला होता.
निजामाने पिलाजी जाधवराव यांचा जलादत्त इंतिवाह ( रणशुर , शौर्यकर्माचे मर्मज्ञ ) अशा शब्दांत गौरव केला होता.
#उत्तरेतील_मराठयांचा_दरारा
#आम्हीच_ते_वेडे_ज्यांना_आस_इतिहासाची

माहिती साभार : Dharmraj Khedekar
Leave a comment