पेशवाईतील वन्यजीव रक्षण व जंगलतोड बंदी

पेशवाईतील वन्यजीव रक्षण व जंगलतोड बंदी

पेशवाईतील वन्यजीव रक्षण व जंगलतोड बंदी –

पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य तीर्थशेत्र श्रीभीमाशंकर येथील होणारी वृक्षतोड व जंगली प्राण्यांची शिकार यावर बंदी घालावी याकरिता महादजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना २६-०९-१७५९ रोजी पत्रे लिहून यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी केली. जंगल व वन्यप्राणी यांचे संवर्धन याविषयी असलेली जागरूकता याविषयीचे महत्व विषद करणारी हि पत्रे म्हणजे तत्कालीन निसर्गाविषयी असलेली काळजी दर्शविते.पेशवाईतील वन्यजीव रक्षण.

पेशवे दफ्तर खंड २३ पत्र ९९ –

श्रीभीमाशंकर क्षेत्राच्या आजूबाजूस तीर्थक्षेत्र व वनराई असून त्यात विविध प्रकारचे प्राणी व पक्षी वास्तव्यास असतात. त्या ठिकाणी झाडांची तोड केली जाते. त्यासंबंधी ताकीद देण्यात यावी . तीर्थक्षेत्राच्या परिसरातील वृक्षतोड न करता तीर्थक्षेत्राच्या राईबाहेरील झाडांची तोड करावी. महादाजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना विनंती केली की, रामचंद्र कृष्णराव तसेच मुकादम आणि देशमुखांना भीमाशंकरच्या आसपासच्या प्रांतात झाडे न तोडण्याचे आदेश जारी करावेत.

पेशवे दफ्तर खंड २३ पत्र १०० –

श्रीभीमाशंकर क्षेत्रात निरुपद्रवी सांबर व अन्य वन्यजीव आश्रयास असतात. भोवर गावातील गावकरी व कोकण प्रांतातील लोक वन्य प्राण्यांची शिकार करतात. तीर्थक्षेत्राच्या तीन कोस परीसरात शिकार करण्यास मनाई करण्यात यावी . शिकार करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी. महादाजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना विनंती केली की, यासंबंधी ताकीद देणारी पत्रे जारी करावीत. महादाजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना विनंती केली की, यासंबंधी ताकीद देणारी पत्रे जारी करावीत .

इतिहास अभ्यासक मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here