महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 8,381,166

पांढ-या महादेव, मोरगाव

By Discover Maharashtra Views: 1216 2 Min Read

पांढ-या महादेव, मोरगाव –

एखाद गाव वसताना त्या भागाची भौगोलिक परिस्थती नुसार  जमिनीची विभागणी केली जाते त्यात प्रामुख्याने माती वरून काळी आणि पांढरी अशी केली जाते. काळी कसण्यासाठी आणि पांढरी वसण्यासाठी अशी समजूत पूर्वापार चालत आलेली आहे. असच एक क-हा नदीकाठी वसलेले गाव म्हणजे मोरगाव.(पांढ-या महादेव, मोरगाव)

मोरगावची क-हा म्हणजे ब्रम्हाच्या कमंडलूतून निर्माण झालेली नदी. मोरगावातील कमंडलू तिर्थ प्रसिध्द आहे. तेथे असणारी मुबलक काळी जमीन , प‍ाणी व  तेथेच सापडणाऱ्या पांढऱ्या मातीवर गाव वसत गेले.

गाव वसताना तेथे संस्कृतीपण नांदते. गावा वसताना तेथे मंदिर , ग्रामदैवत व इतर देवदेवतांची पण स्थापना केली जाते. कालांतराने नैर्सगीक किवा परकिय अक्रमाणाने गाव ऊठली जातात किवा नष्ट होतात किवा दुसरीकडे सुरक्षीत जागी गाव वसली जातात. अशावेळी जी वस्ती आसते ति नैर्सगिक आपत्तीने किवा काही कारणाने तेथील घर नष्ट होउन त्यांची माती होते .क‍ालांतराने ही माती प‍ांढरी होउन त्या पांढरीशी एक होऊन जाते. आशा जुन्या वसलेल्या गावाला गावची पांढरी म्हंटले जाते.

मोरगाव मधील हे महादेवाच मंदिर गावच्या पांढरीवर तसच राहील त्या मुळे हा महादेव पांढ-या महादेव म्हणून अोळखला जातो. महादेवाचा नंदी व परिस्थती  पाहता ही पांढरी किती जुनी असेल य‍ाचा अंदाज येतो.

मंदिर परिसरात भरपूर वीरगळ असून अभ्यासकांसाठी चांगली जागा आहे. पांढ-या महादेव मंदिरा जवळ. रोडच्या बाजूला ग्रामदैवताच मंदिर च्या जवळ आणखी एक मंदिर पाहायला मिळते त्यात देखील एक मूर्ती पाहायला मिळते. तसेच गावात अस्ताव्यस्त व दुर्लक्षित घाणे आहेत. “कोलू घाणे” च्या अगोदरचे  हे घाणे आहेत. या घाण्यात साचलेले तेल कापडाने पिळून काढले जाते. फार अगोदरचा प्रकारातील हे तीन घाणे आहेत. दुसरा चुन्याचा घाण्याच चाक. जमिनीत गाडला गेला आहे. ह्या सर्व ठेवी अनमोल असून चांगल्या कंडीशन मध्ये आहेत. संर्वधनाची गरज नाहीतर नष्ट होण्यास वेळ नाही लागणार.

संतोष मु चंदने , चिंचवड, पुणे.

Leave a comment