महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

शिवाजी महाराजांचे आरमार भाग १०

By Discover Maharashtra Views: 3729 4 Min Read

!! शिवाजी महाराजांचे आरमार !!

भाग:-१०
(क्रमश्यः)

शिवाजी महाराजांचे आरमारी आज्ञापत्राप्राणे:- “गुराबा थोर ना बहुत लहाण यैस्या मध्यम रितीने सजाव्या तैसीच गलबत करावी. थोर ——– फरगात जे वारियावीण प्रयोजनाचेच नव्हेत यैसे करावयाचे प्रयोजन नाही ” असे म्हटले आहे. आज्ञापत्रातील काही गोष्टी शिवाजी महाराजांच्या आरमारी धोरणाचा भाग म्हणून नोंद घेण्यासारखे आहे.

१} आरमारावर मर्द मानसे, भांडी (तोफा), जंबुरे, बंदुखा, दारुगोळा ठेवावा. होके (होकायंत्र) असावे.

२} प्रत्येक सुभ्यास ५ गुलाबा व १५ गलबते असावीत.

३} आरमारास तनखा मुलखातुन नेमून द्यावी. पैदास्तीवरी नेमनुक सहसा न करावी. पैदास्तीचे नेमनुकीमुळे सावकारास उपद्रव होऊन सावकारी बुडते. बंधरे राहीली पाहिजेत—— सावकारी वाढवावी.

४} आरमार सजीत सजीत असावे. आरमारकरी यांनी हमेशा दर्यात फिरुन गनिम राखावा.

५} जंजिरे याचे सामान व दारु वरचेवर पावित जावी ———- सर्वकाळ दर्यावदी खबरीत राहुन गनिमाचे मुलुख मारावा.

६} दर्यात कौली सावकारी तरांडी यांची आमदारफक्ती करावी.

७} विदेशीची गैर कौली सावकारी तरांडी येता जाता आली तर त्यास सर्व साहित्य द्यावे. अल्पस्वल्प जकात घेऊन त्यास जाऊ द्यावे. युद्धप्रसंगी, “सर्वांनी कस्त करुन येक जमावे. गनिम दमानी घालुन जुंझावे. वारीयाचे बले गनिम दमानी न येता आपन दमानी पडलो, आपले गलबत वारीयावरी न चले यैसे जाहले, तरी कैसेही आपले बल असो, तर्ही गनिमास न घालता पाठ तोडीत तोडीत आपले जंजिरेयाची आश्रयास यावे. तरांडीयास व लोकांस सर्वथा दगा होऊ देऊ नये. आपनास राखून गनिम घ्यावा. गनिम दमानी पडोन हरीस आला, जेर झाला तरी येका येक उडी न घालो नये. दुरुन चौकीर्द घेरुन भांडियाचा मारा देत असावे.” गनिम दगाबाज असेल तर विश्वास न ठेवता त्याचे जहाज फोडुन टाकावे.

युद्धाच्या वेळच्या या धोरणाबरोबर आरमाराचे तळ निरनिराळ्या ठिकाणी करण्याबद्दल योग्य सुचना दिल्या आहेत. आरमारी छावनी दर्यात तुफान येण्यापुर्वी करावी. ती जर वर्षि एकाच जंजिर्यावरी किंवा उघड्यावर करु नये. कारण गनिम बेभरवशाचा असतो आणि दर्यावर्दी स्वभावतः उन्मत्त असतात.

“आरमारास तक्ते, सोट, डोलकाठ्या आदिकरुन थोर लाकुड असावे लागते ते आपले राज्यात आरंण्यात सागवाणी वृक्ष आहेत त्याचे जे अनकूल पडेल ते हुजूर लेहून हुजूरचे परवानगी ने तोडुन न्यावे. या विरहित जे लागेल ते घरमुलकिहून खरेदी करुन आनवित जावे. आंबा फनस हेही आरमाराच्या उपयोगीचे असल्याने त्याचे ही जतन करावे. ती वाढविण्यास कष्ट पडतात, म्हणून त्याच्या मालकास मोल देऊन ती घ्यावीत. त्यांना दुख्ख होईल यैसे काही करु नये.” या विवेंचनावलुन शिवाजी महाराजांचे आरमाराविषयक धोरण किती सर्वंकष होते याची कल्पना येते. तसेच शिवाजी महाराजांचे आरमार किती सशक्त होते हे ही दिसुन येते.

संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमारी आज्ञापत्र
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला

शिवाजी महाराजांचे आरमार या विषयावर लिखाण करताना मि सर्व प्रकारच्या साधनांचा वापर केला आहे. कृष्णाजी अनंत सभासद बखर, चिटनीस बखर, पोर्तुगीज कालीन साधने व पत्र व्यवहार, इंग्रज कालीन प्रत व्यवहार, शिवाजी महाराजांचे आरमारी आज्ञापत्र, तसेच समकालीन पत्र व्यवहार अस्या साधनांचा आधार घेतला आहे. तसेच भा.कृ.आपटे यांच्या लिखीत साधनांचा प्रामुख्याने वापर केला आहे. सदर विषयावर माहीती संकलन करते वेळी शिवाजी महाराजांची युद्धनिती, सतर्कता, रयतेवरील प्रेम या सर्व गोष्टी नजरे समोर आल्या. खरे तर शिवाजी महाराजांचे आरमार या विषयावर लिखाण करताना विस्तृत असे लिखाण जेवढे करेल तेवढे कमीच आहे. मि जेवढे भाग लिखान करुन व माहीती संकलन करुन आपल्याला वाचनासाठी सादर केले व त्याला आपन चांगला प्रतिसाद दिला त्या बद्दल सर्व वाचकांचे खुप खुप धंन्यवाद.

माहीती संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे
कार्याध्यक्ष:- हिंदवी स्वराज्य फाऊंडेशन
अध्यक्ष:- हिंदवी स्वराज्य गडकोट समिती
Leave a comment