मराठा आरमार ⚓ | Maratha Navy –
मराठ्यांच्या जहाजबांधणी कारागीरांच्या कौशल्याबद्दल पल्लेबो द सेंट लुबीन हा कट्टर फ्रेंच राष्ट्रभावनेने भारलेला फ्रेंच परराष्ट्रीय वकील नमूद करतो ते पुढील प्रमाणे —
“मराठ्यांचे जहाजबांधणी कारागीर हे अतिशय कुशल आहेत. फ्रेंच कारागीरांपेक्षाही त्यांची हातोटी उत्तम आहे. ते हळुवारपणे काम करतात; पण कारागीरी इतकी उत्तम आहे की, जहाजास ३० – ४० वर्षेतरी नुकसान पोहचत नाही.”
जसा छत्रपति शिवाजी महाराजांनी आरमाराच्या युद्धपद्धतीचा अभ्यास केला होता तसाच आरमारास लागणाऱ्या जहाजांचा सुद्धा बारीक अभ्यास केला होता , त्यातले महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे –
1)मराठी जहाजांना नेहमी किनाऱ्याजवळ वावरायचे आहे खोल समुद्रात दीर्घकाळच्या लांब समुद्रसफरीवर जायची आवश्यकता नाही म्हणून खोल बुडाची व्ही आकाराची इंग्रजी फिरंगी जहाजे न बांधता राजांनी सपाट बुडाची उथळ पाण्यात चालणारी जहाजे बांधली
2)फिरंग्याकडे तंत्रज्ञान आहे तर आपल्याकडे मनुष्यबळ आहे हे जाणून व्हल्लवत नेता येणारी व वारा पडला तरी नावाड्यांच्या सहाय्याने व्हल्लवत वेगात जाणारी जहाजे तयार केली
3) छोटी व मध्यम जहाजे जसे की पाल, मचवे ,शिबाड,गलबत जास्त बांधून घेतली व फरगात गुराबा अशी मोठी जहाजे कमी ठेवली
4)कल्याण ते तेरेखोल पर्यंत किनारी दुर्गांची साखळी उभारली त्याजोडीला समुद्रातील बेटांवर जलदुर्ग बांधले अवघ्या हिंदुस्तानात असे करणारा हा एकमेव देशी राज्यकर्ता होता
5) किल्ल्यांच्या आश्रयाने आरमारी जहाजे समुद्रात गस्त घालून व्यापाऱ्यांना संरक्षण देऊ लागली ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की ह्यात कसलीही कमतरता मराठा आरमारात जळपती शिवाजी महाराजांनी केली नाही. उलट कोकण किनारपट्टी ही किती मजबूत होईल ह्यावर महाराजांनी जास्त लक्ष दिले.
पाल युद्ध नौका , मराठा आरमार ( Paal , Maratha Navy Battle Ship )
