सरलष्कर सेनापती म्हालोजी घोरपडे

unknown hero | कावजी कोंढाळकर

सरलष्कर सेनापती म्हालोजी घोरपडे…

संभाजी राजांना कानोकान खबरं न्हवती, आपण औरंगजेबाच्या गहऱ्या चालीत फसत निघालोय. औरंगजेबाची चाल यशस्वी झाली होती. संभाजींना रायगडाबाहेरं काढण्यात यश आलं होतं. आता संभाजी गेले होते पन्हाळ्यावरं, पन्हाळ्यावरं होते सरलष्करं सेनापती “मह्लोजी घोरपडा” वयं वर्ष ६०, शरीरं थकलं असेलं पण! मनगटातली रग आणि छातीतली धग विझली न्हवती. आल्या आल्या संभाजी राजांनी विचारलं…”मालोजी काका मुकर्रब खानाची कोण हालचाल?” आणि कडाडला मालोजी गावराण बोलीत…
“राजं..! त्यो काय इतूयं,
आम्ही हाय न्हवं,
रेटतू की त्याला…!”
आणि संभाजी म्हणाले…”मालोजी तुमच्या खांद्यावरं तरं सुरक्षित आहे स्वराज्यं”…पण! त्याचं वेळी हेर धावत आला, संभाजींना सांगता झाला…”राजं ! .. राजं ! रायगडला यातीगात खानाचा घेरा पडलाय” आणि काळजाचा ठोका चुकला “रायगड” म्हणजे “राजधानी”, महाराणी तिथं आहेत, बाळंराजे तिथं आहेत आणि “स्वराज्यं सिंहासन” तिथं आहे…कुणी डावेनं डाव मांडला? आणि संभाजी राजे निघाले. मह्लोजींना सांगितलं…”लागली गरजं तरं हाकं मारू, लगोलग येउन मिळा आम्हांस!” आणि संभाजी अवघ्या “शंभर” भालायतांसोबत निघाले रायगडाकडं.
पण! तत्पुर्वीचा औरंगजेबाचा खलिता मुकर्रब खानाकडं आलाय…”तो संभाजी रायरीचा जहागीरंदार शिर्केंशी भांडण केलंय म्हणून तिकडं आलाय, आता नामी संधी आहे”. आणि ती बातमी घेऊनच मुकर्रब खानानं रायगडला जाणाऱ्या सगळ्या वाटा आधीच जेरबंद करून ठेवल्या. संभाजी राजांनी वाटा शोधल्या पण! वाटा सगळ्याच गिरफ़्तारं, जेरबंद मुकर्रबच्या तावडीत. एक वाट होती शिल्लकं, गर्दबिकटं, वहिवाट असलेली, निबिड, काट्या-कुट्याची, किर्र झाडांची, भयाण कडेकपाऱ्यांची, दऱ्या-खोऱ्यांची बिकट..संभाजी राजांनी तिचं वाट निवडली…”” संगमेश्वराची “”
बघता बघता मुकर्रब खान हाजीरं झाला संगमेश्वरंला आणि मराठ्यांचा पाचशे माणूसमेळं पहिला आणि कडाडला…”यल्गारं…!!!”
……”हर हर महादेव”ची आरोळी घुमली आणि बघता बघता तलवारी खणानू लागल्या. झाडा-पानांवरची पाखरं…फड..फड..फड करत उडाली. अरे! काळोखं थरारला, रात्रं थरारली आणि बघता बघता आक्रोश किंकाळ्यांनी परीसरं दुमदुमून गेला.
शौर्याची लाट!..लाट!..लाट! अवघं तुफान..तुफान झालं. अरे! एक-एक मावळा झुंजत होता शर्तीनं लढतं होता…बस्सं!!! मोघलांचा काताकुट करत होता.
शिवाजीराजे सांगायचे “माझा एक मावळा शंभराला भारी आहे”. इथं एक मावळा पाचाशेला भारी पडतं होता.
मोघलांना..बस्सं!!! कापत होता…सपासप्प्प्प!!!…मुकर्रब बघत होता पण! मराठ्यांच्या शौर्यापुढं काही..काही चालत नाही. आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी इथंला एक-एक गडकोटासारखा झुंजत होता. अरे! स्वतः साठ वर्षाचा “मालोजी” दोन्ही हातात समशेरं घेऊन लढतोय अफाट!..अफाट! ताकदीनं…येईल त्याला सरळं कापतोय. रक्ताच्या चिळकांड्या,,,मांसाचे लद्दे……अरे! खचं प्रेतांचा…! आणि मुकर्रबनं ते शौर्य बघितलं आणि कडाडला…”इस बूढें को पहलें लगाम डालों” तसं सगळं यौवनी सैन्यं महलोजी बाबांच्या भोवती गोळा झालं. अभिमन्यू चक्रव्यूव्हात अडकवा तसा मह्लोजी अडकला, दोन्ही हातात समशेरी. याच समयी मोघलांचे एकाचंवेळी वारं झाले, हातातल्या दोन्ही तलवारींनी ते पेलंले. मह्लोजी खाली बसला, साठं वर्षाचं रगदारं शरीरं…रक्तं उफाळल…वीज लखंलखंली सप्प्प्प्प्प..!!! रक्ताच्या चिळकांड्या उडवीत पहिली फरी गारं झाली,,,दुसरी फरी,,,तिसरी फरी…अरे! तो जोश वेगळा, तो आवेश वेगळा…ते शौर्य बघितलं आणि मग! मुकर्रबला कळलं “”वाघ”” कसा असतो.
मह्लोजी बाबांचं अफाट!…अफाट!…अफाट! शौर्य पाहून त्याचवेळी मुकर्रब खानानं चालं खेळली. कमानमारं ला बोलावलं, हा मह्लोजी असा आवरणारं नाही आणि तिसऱ्या बाजूकडं लढत्या मालोजीवर नेम धरंला, तीरं सुटला…उजव्या दंडात घुसला हातातली तलवारं निखळंली…दुसरा तीरं कंठात…दुसरी तलवारं निखळंली…! निशस्त्र झाला मह्लोजी आणि गुळाच्या ढेपेला मुंग्या ढसाव्या असं यौवनी सैन्यं मह्लोजीला ढसलं.
अरे! शरीरावरं जागा शिल्लखं राहिली नाही जिथं वारं झाला नाही. रक्ताळंला मह्लोजी मातीत पडला. अखेरंचा श्वास फुलंला…डोळे लवले…ओठं हलले. त्या श्वासानं माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला मह्लोजी सांगता झाला…”सांगा माझ्या राजाला, हा मह्लोजी गेला..मातीत मेला, पण! मातीत नाही मेला…”मातीसाठी मेला”……अरे! मातीत मारणारे कैक असतात, पण! “मातीसाठी मारणारे फक्तं मराठे असतात” हे सांगत गेला.
आणि मह्लोजी नावाचा बुरुंज ढासळला.
माहिती साभार – शिवकालीन इतिहास (https://itihasbynikhilaghade.blogspot.com)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here