महाराष्ट्रातील भाषा

By Discover Maharashtra Views: 7015 3 Min Read

महाराष्ट्रातील भाषा…

भारत देशात मराठी बोलणारी माणसे जवळपास सगळ्या राज्यांत विखुरलेली आहेत.

जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची बोलीभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत रहाते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो.

पिढ्या न्‌ पिढ्या विशिष्ट राज्यात स्थायिक झाल्यामुळे मराठी भाषकांच्या यांच्या मूळ मराठी बोलीवर त्या राज्याच्या स्थानिक भाषेचा ठसा सुस्पष्टपणे उमटलेला दिसतो. त्यामुळे ‘ मी मराठी बोलतो’ असे कुणी विधान केले तर ‘ कुठली मराठी बोलता?’ असा प्रश्न आपोआपच उपस्थित होतो. कारण मूळ मराठी भाषेचे व्याकरण जरी एकच असले तरी स्थानमाहात्म्यानुसार मराठी बोलीचे ‘ कोंकणी मराठी ‘, कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी, असे अनेकविध प्रकार कानांवर पडत असतात. ह्या प्रत्येक प्रकारात त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकजीवनातले अनेक शब्द आलेले दिसतात, जे लहान शब्दकोषात सापडतीलच असे नाही.भौगोलिक परिसरा नुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलींचे आणखी उपप्रकार होतात.

आदिवासी बोलीभाषा
महाराष्ट्रात गोंड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया आदी बोलीभाषा प्रमुख आहेत. या बोलीभाषा महत्त्वाच्या असल्या, तरी यापैकी गोंडी व भिल्ली या बोलीभाषा अतिप्राचीन आहेत. गोंडी बोलीभाषा महाराष्ट्रात प्राधान्याने आणि मध्य भारतातील मोठ्या विस्तृत पट्ट्यात बोलली जाते. चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात व आंध्र प्रदेशाच्या सीमेलगतही गोंडी बोली बोलली जाते. महाराष्ट्रातील आदिवासी बोलींमध्ये गोंडी बोली सर्वाधिक बोलली जाते. गोंडी बोलीला लिपी असल्याचे पुरावेही अलीकडचे काही संशोधक देत आहेत. गोंडी बोलीभाषेचा बारकाईने अभ्यास करणारा जर्मन भाषातज्ञ जूल ब्लाॅच याने गोंडी बोलीची आंतरराष्ट्रीयता शोधून काढण्याचा प्रयत्न केला होता. द्राविडी भाषासमूहातील कोणत्याही भाषेची अभिन्न वैशिष्ट्ये धारण करणारी गोंडी ही एकमेव प्राचीन बोलीभाषा आहे असे मत काॅल्डवेलने गोंडी भाषेच्या सात वैय्याकरणीय कसोट्या लावून मांडले होते.

भिल्ली बोलीभाषा गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये बोलली जाते. या बोलीवर त्या त्या राज्यांच्या प्रमाण भाषेचा प्रभाव असल्याने महाराष्ट्रात ती मराठीची बोलीभाषा म्हणून गणली जाते.

समूहानुसार होणारे उपप्रकार
नंदीवाले, नाथपंथी देवरी, नॉ लिंग-मुरूड-कोलाई-रायगड,पांचाळविश्वकर्मा, गामीत, ह(ल/ळ)बी, माडिया, मल्हार कोळी, मांगेली, मांगगारुडी, मठवाडी, मावची, टकाडी, ठा(क/कु)री, ‘आरे मराठी’, जिप्सी बोली(बंजारा), कोलाम/मी, यवतमाळी (दखनी), मिरज (दख्खनी), जव्हार, पोवारी, पावरा, भिल्ली, धामी, छत्तीसगडी, भिल्ली (नासिक), बागलाणी, भिल्ली (खानदेश), भिल्ली (सातपुडा), देहवाळी, कोटली, भिल्ली (निमार),कोहळी, कातकरी, कोकणा, कोरकू, परधानी, भिलालांची निमाडी, मथवाडी, मल्हार कोळी, माडिया, वारली, हलबी, कुचकोरवी, कोल्हाटी, गोल्ला, गोसावी, ढोर-कोळी/टोकरे कोळी (खानदेश)घिसाडी, चितोडिया, छप्परबंद, डोंबारी, नाथपंथी डवरी, पारोशी मांग, बेलदार, वडारी, वैदू, दखनी उर्दू, महाराष्ट्रीय सिंधी, मेहाली, सिद्दी, बाणकोटी,चित्पावनी, वाघ्ररी / वाघरी, पारधी, गोंडी,गोरमाठी,लेवा,डांगी,वाडवळ / वडवली/ळी, कैकाडी,अहिराणी, कदोडी / सामवेदी, तावडी, आगरी, देहवाली, जुदाव, महाराऊ, भिलाऊ, लाड सिक्की, लेवापातीदार, गुजरी, वगैरे.

मराठवाडी –
मालवणी –
झाडीबोली –
नागपुरी –
अहिराणी –
तावडी –
आगरी –
चंदगडी –
वऱ्हाडी –
देहवाली –
कोल्हापुरी –
बेळगावी –
वाडवळी –

सविस्तर माहिती लवकरच…

Credit – Wikipedia

Leave a comment