महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. आपली छोटीशी मदत आम्हाला मोलाची ठरेल. 👉Donation/देणगी साठी क्लिक करा.👈 Website Views: 91,66,538

लज्जागौरी

Views: 1652
2 Min Read

लज्जागौरी –

लज्जागौरी ही स्त्रीच्या प्रजनन शक्तीचे प्रतिक. लज्जागौरीम्हणजेच अदिती, आद्यशक्ती, मातंगी, रेणुका.

ही देवी सर्व देवतांची माता म्हणूनच ओळखली जाते, तर काहीं ग्रामीण भागात  प्रजननदेवी म्हणुन ओळखली जाते. काही अभ्यासक लज्जागौरीचा उल्लेख उत्तनपाद जो कि आसनाला निर्देशित करतो वैदिक कालखंडाच्याही अगोदरपासून अशा मूर्ती प्रचलित होत्या. वैदिक कालखंडात ह्या प्रकारच्या मूर्ती तंत्रमार्गात समाविष्ट झाल्या. लज्जागौरी च्या मस्तकाऐवजी कमळ दर्शविले जाते, कमळ हे भौतिक तसेच अध्यात्मिक कल्याणाचे प्रतीक मानले जाते; तर काही वेळा तिला मस्तकासहीत  दाखवतात. ती नग्न अवस्थेत दाखवतात.

लज्जागौरी ही आदिशक्ती मातृदेवता आहे , या मूर्तीचं स्वरुप हे स्त्री च्या गळ्या पासूनचा खालील भाग पूर्ण पणे नग्न स्वरुपात असून,योनीला उत्फुलता येण्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून बाजूला घेतले असल्याचे दर्शवतात. या देवीची योनी पूजा ही विश्वाचे गर्भगृह आणि सुप्त शक्तीचे केंद्र बिंन्दू या भावनेने केली जाते.

लज्जागौरी शिल्प कसेही असो, त्याचा मूळ गाभारा जो आहे तो म्हणजे मातृत्व, सर्जनशीलता, विश्‍वनिर्मिती, जीवन देणारी एक नैसर्गिक शक्ती, जी बिनधास्त, धीट आणि पवित्र अश्या स्वरूपात स्त्री चे स्त्रीत्व दाखवून देते.

ह्या मूर्तींच्या अशा स्वरूपामुळेच ह्यांचे नष्टचर्य ओढवले. परकिय आक्रमकांबरोबरच स्वकीयांनीही ह्यांना नष्ट केले. मूळात प्रस्तुत शिल्प काही  लोकांना कदाचित पटण्यासारखे मूळीच नव्हते. कदाचित त्यामुळेच ते स्वकीयांनी च मोठ्या प्रमाणात नष्ट केले. मात्र या शिल्पास पौराणिक कथेचा ही आधार आहे ही बाब नजरेआड करण्यासारखी मूळीच नाही.. शिल्पकार कायम शिल्पशास्त्राच्या  आधारानेच चालतो, त्यामुळे कोणतेही शिल्प अश्लील वाटण्याचे कारण नाही, ज्यांना तस वाटत, त्यांची ओंजळ अज्ञानाने काठोकाठ भरलेली असावी अस समजून घ्याव

सदर शिल्प हे राष्ट्रकूट भवन,बहाद्दरपूरा येथील आहे.

Kiran Hanumant Mengale

Leave a Comment