कुरुंदवाड संस्थान | बखर संस्थानांची

कुरुंदवाड संस्थान | बखर संस्थानांची

कुरुंदवाड संस्थान | बखर संस्थानांची –

कुरुंदवाड संस्थान बेळगाव विजापूर, सातारा यात तुटक तुटक पसरला होता. कुरुंदवाड संस्थान दक्षिण महाराष्ट्रात पेशवाईमध्ये प्रसिद्धीस आलेल्या पटवर्धन घराण्याच्या मिरज, सांगली, तासगाव, जमखंडी, मिरजमळा, बुधगाव इ. ज्या शाखा कालक्रमाने उत्पन्न झाल्या त्यांतीलच कुरुंदवाड ही एक शाखा होती. या घराण्याचा मूळ पुरुष हरिभट्ट. यांचा मुलगा त्र्यंबकपंत. त्याचे दोन्ही मुलगे नीलकंठराव व कोन्हेरराव यांनी अनुक्रमे घोडनदी (१७६२), मोती तलाव (१७७१) आणि सावशी या लढ्यात मोठा पराक्रम केला व ते दोघेही शेवटच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यानंतरच्या त्यांच्या वंशजांनी मोठा पराक्रम केल्याचे कोठे आढळत नाही. कालक्रमाने (१८५५ मध्ये) या घराण्याच्या थोरली व धाकटी अशा दोन पात्या झाल्या.

या वाटण्यात मोठ्या मुलाला आलेली वाटणी ही थोरली पाती तर तीन भावांची वाटणी ही धाकटी पाती म्हणून आोळखली जाते. या दोन्ही पातीस ब्रिटीश सरकारची मान्यता होती.

थोरल्या पातीकडे सु. ४६४ चौ. किमी. व धाकट्या पातीकडे सु. २९४ चौ. किमी. चा प्रदेश होता. थोरल्या पातीत ३७ आणि धाकट्या पातीत ४१ खेडी होती. कुरुंदवाडच्या थोरल्या पातीची लोकसंख्या सु. ५०,००० व उत्पन्न अडीच लाख असून धाकट्या पातीची लोकसंख्या सु. ४२,००० होती आणि उत्पन्न सु. दोन लाख होते. दोन्ही पातींनी आपापल्या पुरत्या प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि दवाखाने चालविले होते. या दोन पात्यांची राजधानीची गावे अनुक्रमे कुरुंदवाड (कोल्हापूर जिल्हा) व माधवपूर-वडगाव (बेळगाव जिल्हा) ही होती. महाराष्ट्रातील इतर संस्थानांच्या विलीनीकरणाबरोबर हे संस्थान त्यावेळी स्वतंत्र भारताता विलीन करण्यात आले.

पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरभट पटवर्धन ह्यांचे तृतीय पुत्र त्रिंबक हरी पटवर्धन तथा अप्पासाहेब हे कुरुंदवाड संस्थानाचे संस्थापक समजले जातात. मराठा सरदार राणोजी घोरपडे ह्याने अप्पासाहेबांकडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड म्हणून् घोरपड्यांनी कुरुंदवाड हे आपले गाव अप्पाला बहाल केले होते.

कुरुंदवाड मधील विष्णु मंदिर व जवळील नरसोबाची वाडी प्रसिध्द आहे. हे घराण गणेशभक्त असल्याने मिरज सांगली संस्थाना प्रमाणे यांच्या स्टँप पेपर व कोर्ट फी वरही गणपती आहे.

संतोष चंदने, चिंचवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here