महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

काळे वाडा | नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान

By Discover Maharashtra Views: 1327 2 Min Read

काळे वाडा | नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान –

श्रीनृसिंह सरस्वतींनी दत्तोपासनेला संजीवन देण्याच कार्य केल. तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या प्रवाहात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० (इ.स. १३७८ ते १४५८) असा आहे. श्री नृसिंह सरस्वती यांच श्री गुरूचरित्रात अध्याय ११ ते ५१ या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे. श्री नृसिंह सरस्वती संन्यासधर्माचे सर्वोत्तम आदर्श होते.(काळे वाडा | नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान)

लहानपणातील त्यांच नाव नरहरी होते. काशीला दिक्षा घेतल्यनंतर त्यांनी गुरूच्या नावाने नृसिंह सरस्वती नाव धारण केले. दत्त उपासनेत व दत्तसंप्रदयात त्यांना श्री दत्ताचा दुसरा अवतार मानल गेलय. अशा या नृसिंह महाराजांचा जन्म कारंज लाडच जि. वाशिम येथे झाला.त्यांचा जन्म झाला ती जागा काळेवाडा म्हणून अोळखली जाते . वाडा ७००वर्षा पैक्षा जूना आहे. चौसपी वाडा असून खालच्या चौकात त्यांच्या आई वडलांच्या  (अंबाभवानी व माधव काळे) हातून बांधलेल वृंदावन आहे. बाजूला आड आहे.

श्रीनरहरींची गंधाची भिंत आज घुडे यांच्या वाड्यात आहे. श्री नृसिंहाच्या काळे कुटुंबाकडून घुडे यांनी हा वाडा विकत घेतला होता. हा भव्य व प्रेक्षणीय वाडा चार मजली असून जमिनीखाली तीन भुयारी मजले आहेत. भिंती किल्ल्याप्रमाणे सहा फूट रूंदीच्या असल्याने साडेपाचशे वर्ष होऊनही वाडा सुस्थितीत आहे. पहिल्या माळ्यावर मोठ्या ओसऱ्या, माजघरे, वृंदावन, विहीर, फवारा, हौद असून वाड्यातील लाकडी खांबावर सुंदर कोरीव काम केलेले आढळते.

नक्षीकामाची ही वेलबुट्टी इतकी अप्रतिम आहे की ओतीव साच्यातून काढल्यासारखीच वाटतात. दुसऱ्या माळ्यावर महाराजांची गंधाची भिंत, पादुका आणि जन्माची खोली आहे. ह्या दालनाच्या छतावरील लाकडी शिल्पही अप्रतिम आहे. चौथा माळा भिंतीवरील सज्जाचा बनला असून येथून कारंजा नगरीचे विहंगम दृश्य दिसते. वाड्यातील भूमिगत तीन मजले चुन्यात बांधलेले असून आजही चांगल्या अवस्थेत आहेत. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे महाराज) ह्यांनी पाचशे-साडेपाचशे वर्षांपूवीर्चे हे अज्ञात ठिकाण शोधून काढले होते.

हा वाड्यात दुर-या मजल्यावर जेथे जन्म झाला तेथे वृंदावनावर पादुका आसून पहिल्या खोलीत त्यांचा फोटो असून तेथे बसून ध्यान करता येते. वाडा सकाळी ६ ते सायंकाळी ५  वाजेपर्यत पाहता येतो. प्रत्यक्ष ब्रम्हांडनायकाचा  जेथे जन्म जेथे झाला तो वाडा पाहताना व गंधाची भिंत पाहताना तुम्हाला अनुभूती आल्या शिवाय राहत नाही.

संतोष मुरलीधर चंदने, चिंचवड, पुणे.

Leave a comment