जय विलास पॅलेस, जव्हार

जय विलास पॅलेस, जव्हार

जय विलास पॅलेस, जव्हार –

जव्हार संस्थान इसवी सन १३१६ पासून १० जून १९४८ पर्यंत अस्तित्वात होते. मुकणे गावातील जयबारा हे कोळी समाजाचे राजे होते.. जयबा जमीनदार होते त्यांचे उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे, बुद्धिचातुर्याने आणि पराक्रमामुळे त्यांनी २१ लहान किल्ले जिंकले वर भूपतग हा मोठा किल्लाही जिंकला. अल्लाउद्दीन खिलजी, मुहंमद तुघलक या मोगलांच्या स्वारींनी देवगिरीच्या साम्राज्याची वाताहत केली. अशा वेळी इ.स. १३१६ मध्ये जव्हार संस्थानाला आकार येत होता जयबा राजांना धुळबा आणि होळकरराव ही दोन अपत्ये होती जयबा हे शिवशंकराचे भक्त होते पूर्वी काळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातला जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर नम असे नामकरण केले या जयहरापासून जव्हार असे नाव रूढ झाले.(जय विलास पॅलेस)

इसवी सन १३४१ ते १७५८ सालापर्यंत जव्हारच्या राजाकडे दमण नदीपर्यंतचा, सह्याद्रीपर्यंतचा आणि भिंवडीपर्यंतचा भूप्रदेश ताब्यात होता त्यावेळी राजाकडे साडेतीन लाख रुपयापर्यंत महसूल गोळा व्हायचा. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पौष शुद्ध द्वितीया, १ डिसेंबर १६६१ ला जव्हारचे पहिले विक्रमशहाराजे यांना भेटावयास आले होते विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला ज्या ठिकाणी छत्रपतींना शिरपेच दिला त्या ठिकाणाला शिरपामाळ असे नाव पडले..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.. सुरतेच्या या छाप्यानंतर दिल्लीच्या मोगलांमध्ये आणि जव्हारच्या संबंधांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती. सुरतेच्या स्वारीदरम्यान शिवाजीराजे वाडा तालुक्यातील कोहज गडावर मुक्कामी होते. विक्रमशहाराजे यांच्या पश्चात जव्हार संस्थानच्या गादीवर बसायचे कोणी, या कारणावरून वारसदारांमध्ये वादंग निर्माण झाले होते.

या वादात इंग्रजांनी हस्तक्षेप करून राणी सगुणाबाईंच्या अज्ञान पतंगशहा नावाच्या अज्ञान मुलाला गादीवर बसविले मुलाच्या अधिपत्याखाली राणी सगुणाबाई याच राज्यकारभार चालवत असत.

धुळबा राजाचा नातू देवबा याचे मुस्लीम धर्मांतरामुळे आणि राजघराण्यातील गादीच्या वादामुळे जुना राजवाडा १८२० साली आगीत जळाला यात राजवाड्यातील ऐतिहासिक कागदपत्रे जळून खाक झाली हा राजवाडा कृष्णराजाने बांधला होता जुन्या राजवाड्याचा परिसर २१ हजार चौरस मीटर होता…

फोटोग्राफी : Chinmayi Nayan Parab
माहिती साभार : सचिन पोखरकर

1 COMMENT

  1. नवीन राजवाडा (जय विलास पॅलेस ) ची काहीच माहिती सांगितलं नाही. हा पॅलेस 1940 ते 44 दरम्यान बांधण्यात आला. ते जव्हार राजे यशवंतराव मुकणे या काळात दुसऱ्या महायुद्ध मध्ये होते. त्यांनी नवीन राजवाडा बांधायचे ठरवले होते. राजे युद्धात असताना राणी प्रियवंदा यांनी दिवाण यांच्या मदतीने कारभार चालवला होता. त्यांनीच राजवाडा बांधून घेतला. राजांनी पॅलेस बनवायला राजस्थान हून कारागीर मागीवले होते. पॅलेस चे दगड हे जवळ च्या परिसरातील मधून घेतले होते. राजे यशवंतराव मुकणे हे 6 वर्ष इंग्लंड ला राहिले होते आणि त्यांनी युरोप दौरा देखील मोठया प्रमाणात केला होता. त्यांना वास्तूशास्त्र ची पूर्ण माहिती होती. म्हूणन जय विलास पॅलेस वर राजस्थानी, ब्रिटिशी आणि इटालियन असा एकत्रित प्रभाव दिसतो. 1945 ला राजे युद्धातून परतल्यावर कारभार येथूनच पाहू लागले. जयविलास पॅलेस चे स्थान उंच टेकडीवर आहे. येथून निसर्गाचे आणि शहराचे नयनरम्य दृश्य दिसते. या पॅलेस मध्ये 80 खोल्या आहेत. हा पॅलेस बांधताना सुमारे 3 लाख खर्च आला होता. आता हा राजवाडा राजांचे वंशज महेंद्रसिंह मुकणे यांची खासगी मालमत्ता आहे. ते सध्या पुण्याला राहतात पण 1-2 महिन्यांनी ते नेहमी जव्हारला येत असतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here