महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

जव्हार संस्थान | बखर संस्थानांची

By Discover Maharashtra Views: 2775 4 Min Read

जव्हार संस्थान | बखर संस्थानांची –

श्रीमंत सरकार मुकणे – (इ.स. १३४३ – इ.स. १९४८)  जयबा राजांना दोन अपत्ये होती. जयबा हे शिवशंकराचे भक्त होते. त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी काळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातला जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर नम असे नामकरण केले. पुढे या जयहरापासून जव्हार असे नाव झाले.या संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे होते. जव्हार संस्थान ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील महाराष्ट्रात असणारे एक जुने संस्थान. ठाणे जिल्ह्यात असलेले जव्हार संस्थान असून तो आत्ता पालघर जिल्ह्यात येत आहे.

जयाबा उर्फ जयदेवराव मुकणे यांनी कोळी राज्याची स्थापना केली (१३१६). जयाबानंतर त्यांचा मुलगा धुळबाराजे उर्फ नीमशाह हे पराक्रमी शासक झाले. नीमशाहांनी सैन्य उभे करून नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांतील  प्रदेश घेऊन सु. २२ किल्ल्यांवर नियंत्रण ठेवले. १३४३ मध्ये दिल्लीच्या तुघलकांनी नीमशहांना राजा ही पदवी दिली होती.जव्हार येथील (भूपतगड) किल्ला या कोळी साम्राज्याची राजधानी होती.

नीमशाहांनंतर  काळातील इतिहास अज्ञात आहे. नंतर च्या कालखंडात पोर्तुगीजांशी युद्धे करून कोळी राजांनी वसई ते डहाणूवर अंमल बसवला होता. जव्हार हे उत्तर कोकणात असल्यामुळे त्यांचा इतर साम्राज्यांशी संबंध येत असे. त्यांत प्रामुख्याने मोगल, पोर्तुगीज, मराठे, इंग्रज यांचा समावेश होता. . छत्रपती शिवाजी महाराजांनी जानेवारी १६६४ मध्ये सुरत लुटण्यासाठी जव्हारच्या मार्ग  उपयोग केला. यावेळी जव्हारवर राजे विक्रमशाह मुकणे प्रथम यांचे राज्य होते.

१६६५ मध्ये मिर्झाराजे जयसिंगच्या मोहिमेत विक्रमशाहचा भाऊ मराठ्यांच्या विरुध्य सामील झाला होता. व येथून येथील राजे व मराठे यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली.

शिवाजी महाराजांनी आपले प्रधान मोरोपंत पिंगळे यांनी येथे स्वारी करुन  मोरोपंतांनी  विक्रमशाहांचा पराभव केला . या स्वारीत मराठ्यांना जव्हारचा सु. १७ लक्ष रुपयांचा खजिना मिळाला. मराठ्यांनी जव्हारवर १,००० रु. खंडणी बसवली. पुढे १६७८  विक्रमशाहांना वीरगती मिळाली. पुढे १६८८ मध्ये विक्रम पतंगराव यांनी मराठ्यांकडून कोहोज किल्ला जिंकून घेतला.

१७५८ ते १७६१ या काळात येथे  सत्ता होती. जव्हारच्या राज्यात अनेकांनी बंड केले होते.हे बंड मोडण्यासाठी जव्हारच्या दरवर्षी खंडणी म्हणून नजराणा द्यावा लागत असे. मराठ्यांनी टकमक, तांदुळवाडी, काळदुर्ग हे किल्ले जिंकले, तेव्हा याकामी त्यांना कोळी राजांची मदत झाली .दुसरे पतंगशाह १७९८ मध्ये मृत्यू पावले. पेशव्यांच्या आज्ञेवरून पतंगशाह यांचा मुलगा विक्रमशाह तिसरे यांस गादीवर बसविले; परंतु पेशव्यांना त्यांनी ३,००० रु. नजराणा देणे व त्र्यंबकच्या मामलेदाराच्या साहाय्याने राज्यकारभार केला जाईल, असे लेखी कबूल केले. विक्रमशाह तिसरे यांच्या मृत्यूनंतर (१८२१) त्यांचा मुलगा पतंगशाह तिसरे लहान असल्याने विक्रमशाहांच्या दोन्ही भावांत भांडणे सुरू झाली. यावेळी राणी सगुणाबाई यांनी इंग्रजांच्या मदतीने पतंगशाह तिसरे यांस गादीवर बसविले.

१८९० मध्ये संस्थानला दत्तकाचा अधिकार मिळाला. राजाला खूनखटल्यांचा अधिकार होता. स्व:ताचे स्टँप पेपर छापायचा अधिकार  होता. त्यांनी जव्हार हीच राजधानी बनवली होती व संस्थानात १०८ खेडी होती.. स्वातंत्र्योत्तर काळात संस्थान प्रथम मुंबई प्रांतातील ठाणे जिल्हा आणि नंतर महाराष्ट्र राज्य यांत समाविष्ट करण्यात आले.या संस्थानचे स्वताचे राष्ट्रगीत होते. या संस्थालाला नऊ व खाजगी तीन अशा तोफेंच्या सलामीचा मान होता.

यांच्या स्टँप पेपरवर  धनुष्यबाण हे राजचिन्ह पाहायला मिळते. तसेच ह्या  पेपर लिहलेल्या मजकुरवर ‘दस्तावैज नोंद’ ह्याचा ही शिक्का मारला यायचा तो इतर संस्थानात पाहलयला मिळत नाही. स्टँप पेपर वर water mark असून  तो British manufacture असे लिहलेले दिसते.

श्रीमंत सरकार संस्थान जव्हार.

संतोष मु चंदने, चिंचवड, पुणे.

Leave a comment