अपरिचित इतिहासइतिहासघराण्याचा इतिहास

सरदार देवकाते घराण्याचा इतिहास भाग १

सरदार देवकाते घराण्याचा इतिहास भाग १

अतिप्राचीन काळापासून हट्टी लोकांमध्ये अग्निवंशी (अग्नीउपासक) यांची परंपरा आहे. अश्या हाटकर अग्निवंशी योध्यांनी महाराष्ट्रामध्ये मोठा पराक्रम गाजवलेला दिसून येतो. त्यामध्ये आतापर्यंत धायगुडे, पांढरे, बंडगर, शेळके, रूपनवर, खताळ आणि देवकाते इत्यादी सरदारांचे उल्लेख मिळाले आहेत. देवकाते घराणे हे अग्निवंशी असून चाहमान/चौहान या अतिप्राचीन टोळीसंघ/कुळातील आहे. देवकाते या शब्दाची व्युत्पत्ती (देव+खत्त/खाते) अश्या दोन शब्दांवरून झाली असे मला वाटते.

प्रस्तुत माहिती हि श्री. संतोषराव पिंगळे यांच्याकडून प्राप्त झालेली आहे.
सरदार जिवाजी राजे देवकाते (सुभेदार बळवंतराव)- बळवंतराव हे विजापूर दरबारातील एक मातब्बर सरदार. विजापूरच्या पातशाहाकडून वंशपरंपरेने जहागीर, मनसब, इनामे व वतने घेऊन सेवाचाकरी करत होता. पहिल्या शाहूने देवकाते यांना दिलेल्या वतनपञातील नोंदीनुसार विजापूरकरांकडून कर्यात बारामती प्रांत सुपे येथील २२ गावांची सरपाटीलकी तर ६ गावांची पाटीलकी त्यास वंशपरंपरेने मिळाली होती. तसेच मौजे कन्हेरी हा गाव वंशपरंपरेने इनाम देण्यात आला तर मौजे सोनगाव या गावी एक चावर (६० एकर) जमिन इनाम देण्यात आली होती अशी नोंद सापडते.

छञपती शिवाजी राजांनी रयतेचं राज्य उभे केल्यानंतर स्वताच्या जहागिरीला व वतनाला लाथ मारत देवकाते स्वराज्यात सामील झाले. अफजलखान मोहिमेतही शिवाजी राजांकडून देवकाते लढल्याच्या नोंदी मिळतात. इ.स.वी सन १६७४ च्या शिवछञपतींच्या राज्याभिषेकाला उपस्थित असलेल्या सरदारांच्या यादीमध्ये देवकाते घराण्यातील “भवानराव” व “बळवंतराव” यांचा उल्लेख येतो.

“भवानराव” व “बळवंतराव” ही केवळ नावे नसून ते किताब असल्याचं शाहू व पेशवे कालीन कागदपञांवरून सिद्ध होतं. प्रत्यक्ष शिवछञपतींने दिलेले हे किताब देवकाते सरदारांनी स्वराज्यासाठी दिलेलं महत्वपूर्ण योगदानच अधोरेखित करतात. शिवछञपतींनी बळवंतराव यांना मौजे सोनगाव या गावी सवा चावर(७५ एकर)जमिन इनाम दिली असल्याची नोंद ही या कागदपञांमध्ये सापडते. आजही या गावातील देवकाते मंडळींची निवासीवस्ती इनामपट्टा म्हणूणच ओळखली जाते.

माहिती सौजन्य- श्री. संतोषराव पिंगळे
संदर्भ: शाहू व पेशवा दफ्तर पुराभिलेखागार पुणे.

 

सरदार देवकाते घराण्याचा इतिहास भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Discover Maharashtra Team

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

One Comment

  1. पांढरे सरदार यांचा काही इतिहास माहिती असेल तर पोस्ट करावा. पुण्यात कसबा पेठेत वाडा आहे पांढरे सरदारांचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close