ग्वाल्हेर संस्थान | बखर संस्थानांची | महाराष्ट्रा बाहेरील महाराष्ट्र

ग्वाल्हेर संस्थान | बखर संस्थानांची | महाराष्ट्रा बाहेरील महाराष्ट्र

ग्वाल्हेर संस्थान | बखर संस्थानांची | महाराष्ट्रा बाहेरील महाराष्ट्र –

ग्वाल्हेरचे संस्थान हे मराठा साम्राज्यातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान होते. पहिल्या बाजीराव पेशव्याचा निष्ठावंत सेवक राणोजी शिंदे हा ग्वाल्हेर संस्थान या संस्थानाचा संस्थापक पुरुष होता. या संस्थानाची राजधानी पूर्वी उज्जैन होती, पण नंतर ग्वाल्हेर हेच राजधानीचे ठिकाण झाले

राजधानी  : ग्वाल्हेर.
पहिला राजा: राणोजी राव सिंधिया(शिंदे) (इ.स. १७२७-१७४५)
अंतिम राजा: जॉर्ज जिवाजी राव सिंधिया (इ.स. १९१६-१९४८ )
मध्य प्रदेशात असलेले ग्वाल्हेर ब्रिटीशराज मध्ये  महत्वाचे संस्थान होते.

ग्वाल्हेर चे संस्थापक राणोजी शिंदे साता-या जवळील कान्हेरखेड गावचे.बाजीराव पेशव्यांच्या मराठ फौजेसे  सेनाधिकारी. माळव्यातील मोहीमेत त्यांनी तलवार गाजवली.त्यामुळे त्यांना माळव्याची सरदेशमुखी व  चौथाई  वसूल करण्याचा  अधिकार मिळाला. १७३६ मध्ये सुभेदारी मिळाली. १७४५ ल‍ा राणोजींचा मृत्यु झाला. नंतर जयप्पाराव गादीवर आला ( १७४५-१७५५) नंतर मुलगा जनकोजी गादीवर आला .तो पानिपतच्या लढाईत मारला गेला. नंतर मानाजीराव (१७६४-१७६८)

नंतर राजे पदावर आलेले महादजी शिंदे  होय.(१७६८ – १७९४). मराठ्याच्या इतिहासात महादजी शिंदेयांच नाव महान सेनानी म्हणून घेतले जाते. मराठा साम्राज्याचा फार विस्तार झाला.

ब्रिटीश लोक महादाजींचा उल्लेख  ‘ द ग्रेट मराठ ‘ असे करत. पुण्यात वानवडी जवळ १७९४ ला निधन झाल.नंतर दौलतराव शिंदे गादीवर आले. ( १७९४ – १८२७).
डिसेंबर १८१८ मध्ये  कंपनी सरकार बरोबर करार करुन त्यांनी तैनाती फौज राखली.तिथ पासून ग्वाल्हेर ब्रिटीश अंकित संस्थान बनले. त्यांनी शिदे आडनाव बदलून सिंदिया केले.
त्या नंतर गादीवर जानकोजी द्वितीय हे आले. (१८२७ -१८४३).
नंतर जयाजीराव( १८४३- १८८६).
माधवराव (इ.स. १८८६-१९२५)
जिवाजीराव (इ.स. १९२५-१९४८).

माधवराव शिंदे व ज्योतिरादित्य शिंदे हे भारतीय प्रजासत्ताकातील राजकारणी याच घराण्यातील आहेत. ग्वाल्हेर संस्थानाचे अखेरचे संस्थानिक जिवाजीराव हे माधवराव शिंद्यांचे वडील होते. मुलगा ज्योतीराजे सिंदीया.
२१ तोफांच्या सलामीचा मान या संस्थानाला होता.

(या संस्थान चे स्टँप पेपर व कोर्ट फी. माझ्या संग्रहातून )

संतोष चंदने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here