महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,20,017

गणेशासोबत नृत्यमग्न अर्धमनुष्य-अर्धपक्षी

By Discover Maharashtra Views: 2445 1 Min Read

गणेशासोबत नृत्यमग्न अर्धमनुष्य-अर्धपक्षी-

गणेशाच्या विविध मोहक शिल्पकृती मंदिरांवर आढळून येतात. यातील नृत्यगणेश तर खुपच सुंदर आहेत. घोटण (ता. शेवगाव जि. नगर) येथील खांबांवर पशु पक्षांची शिल्पे ठळकपणे आढळून येतात. छायाचित्रातील शिल्पाने मला चकितच केले. शिल्पात नृत्य करणारा गणेश आहे. पण त्याच्या सोबत कोण आहे? तर दोन उंदीर दिसत आहेत.

कमरेखाली उंदीर आणि वर मनुष्य. यातही परत डाव्या बाजूला आहे ती स्त्री तर उजव्या बाजूला पुरूष. उंदरी नाचत आहे तर उंदीर झांज वाजवत आहे. या मंदिरातील पशुपक्षांची शिल्पे संख्येन जास्त आणि ठळक आहेत. या शिल्पात गणपतीचे वाहन म्हणून छोटासा उंदिर न दाखवता त्याच्या सोबत नृत्य करणारी तेवढ्याच आकाराची ही उंदिर नवरा बायकोची जोडी. या कलाकाराच्या कल्पकतेला सलाम.
(बरेचदा किन्नर अर्धमनुष्य-अर्धपक्षी ह्या स्वरूपात कोरलेले असतात. ह्या शिल्पातदेखील पाय आणि शेपूट/पिसारा पक्ष्याचा दिसत आहे. या आकृती किन्नरांच्या आहेत असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यावर इतर अभ्यासकांनी प्रकाश टाकावा.)

छायाचित्र – Vincent Pasmo
– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

Leave a comment