छत्रपती चौथे शिवाजी महाराज

छत्रपती चौथे शिवाजी महाराज | चौथे छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती चौथे शिवाजी महाराज

सावर्डेकर भोसले घराण्यातून दत्तक घेतलेले छत्रपती चौथे शिवाजी महाराज कोल्हापूर गादीवर आले. शिवाजी महाराज अल्पवयीन असल्यामुळे राज्याचा सगळा कारभार दिवाण महादेव बर्वे आणि त्याचा इंग्रज साथीदार पॉलिटिकल एजंट स्नायडर पाहत होते.
दिवाण महादेव बर्वे आणि एजंट स्नायडर याने राज्य खालसा करण्यासाठी षडयंत्र सुरू केले. यानुसार अल्पवयीन चौथे शिवाजी महाराजांना अहमदनगर येथील किल्ल्यात कैदेत टाकले. त्यांचे मानसिक संतुलन बिघडाव म्हणून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला.
एके दिवशी जेवण घेऊन गेलेला जेल अधिकारी कॅप्टन प्रायव्हेट ग्रीन याने दररोजच्या सवयी प्रमाणे शिवाजी महाराजांना बेदम मारहाण केली.
त्याने महाराजांच्या पोटात बुटाने लाथा घातल्या बुटाच्या माराने पोटातील प्लिहा फुटून शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला.
छत्रपती चौथे शिवाजी महाराजयांचा मृत्यू झाला ती तारीख होती -25 डिसेंबर 1883.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here