महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्टa>👈 Website Views: 92,65,958

छत्रपती चौथे शिवाजी महाराज

Views: 4254
1 Min Read

छत्रपती चौथे शिवाजी महाराज

सावर्डेकर भोसले घराण्यातून दत्तक घेतलेले छत्रपती चौथे शिवाजी महाराज कोल्हापूर गादीवर आले. शिवाजी महाराज अल्पवयीन असल्यामुळे राज्याचा सगळा कारभार दिवाण महादेव बर्वे आणि त्याचा इंग्रज साथीदार पॉलिटिकल एजंट स्नायडर पाहत होते.
दिवाण महादेव बर्वे आणि एजंट स्नायडर याने राज्य खालसा करण्यासाठी षडयंत्र सुरू केले. यानुसार अल्पवयीन चौथे शिवाजी महाराजांना अहमदनगर येथील किल्ल्यात कैदेत टाकले. त्यांचे मानसिक संतुलन बिघडाव म्हणून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला.
एके दिवशी जेवण घेऊन गेलेला जेल अधिकारी कॅप्टन प्रायव्हेट ग्रीन याने दररोजच्या सवयी प्रमाणे शिवाजी महाराजांना बेदम मारहाण केली.
त्याने महाराजांच्या पोटात बुटाने लाथा घातल्या बुटाच्या माराने पोटातील प्लिहा फुटून शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला.
छत्रपती चौथे शिवाजी महाराजयांचा मृत्यू झाला ती तारीख होती -25 डिसेंबर 1883.
Leave a Comment