महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

श्रीमंत महाराज दत्ताजीराव शिंदे | भाग २

By Discover Maharashtra Views: 3853 5 Min Read

श्रीमंत महाराज दत्ताजीराव शिंदे

निजामावरील,वसईच्या मोहिमांत राणोजीराव शिंदे यांची निष्ठा व शौर्य हे गुण पाहून बाजीरावाने त्यास माळव्यातील कामगिर्या सोपविल्या,तिकड़े पराक्रम करून शिंदे घराणे उत्तर हिंदुस्तानात मराठा साम्राज्याचा प्रस्थ स्थापन केला, राणोजीराव हे स्पष्टवक्ता व स्वामिनिष्ठ सेवक होते.(श्रीमंत महाराज दत्ताजीराव)

श्रीमंत महाराज राणोजीराव शिंदे सरकार यांनी दोन विवाह केले यांची पहिली पत्नी मीनाबाई आणि दुसरे पत्नी चिमाबाई असे होते. श्रीमंत महाराज राणोजीराव शिंदे यांना पाच (5) पुत्र होते

राणोजी शिंदे यांना पाच पुत्र होती
1 जयाप्पाजीराव शिंदे
2 दत्ताजीराव शिंदे
3 जोतिबाराव शिंदे
4 तुकोजीराव शिंदे
5 महादजी शिंदे

असे पाच पुत्र होती. हे सर्व पाचीच्या-पाची शूर आणि महापराक्रमी होतो.प्रत्येक सरदाराने आपल्या आपल्या काळात रणांगणात तलवार गाजविली. मराठा साम्राज्य विस्तार मध्ये मोलाचा वाटा उचलला.

श्रीमंत सरदार दत्ताजीराव शिंदे(सिंधिया)

श्रीमंत सरदार दत्ताजीराव शिंदे यांचे वर्णन
अंगाखांद्याने मजबूत शरीर रुबाबदार चेहरा त्या चेहऱ्यावर पिळदार मिश्या.बाणेदार नजर.जबरदस्त आणि भरदस्तआवाज. डोक्यावर शिंदे घराण्याची रुबाबदार पगडी. असे यांचे वर्णन.

दत्ताजी शिंदे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेड गावामध्ये झाला असावा. मूळ शिंदे घराण्यातील जन्म घेतले असल्यामुळे त्यांच्या सर्व बालपण लढाईचे प्रशिक्षण मैदानामध्ये गेले असावे. तलवारबाजी, दानपट्टा घोडेस्वार( हिंदीमध्ये घुडसवारी) हे यांनी लहानपणीच वडिलांकडून आणि मोठ भाऊ बंधू कडून शिकून घेतले असावे. पुढे जाऊन आपल्या वडिलांचा आणि भावाच्या पावलावर पाऊल टाकत मराठा सैन्यामध्ये सामील झाले.

दत्ताजी शिंदे यांचा पहिला पराक्रम दिसून आला तो कुडकी च्या लढाईत ही लढाई आळेफाटा पासून जाणारी नदी या नदीकाठी झालेली लढाई होती. या कुडकीच्या लढाईमध्ये दत्ताजी शिंदे यांनी निजाम सैन्यामधील शाही हत्ती व त्यावरील शाही अंबारी हे रणमैदानात पाडू सगळ्यांना आपला पराक्रम दाखवून दाखवला. तेथे हे दत्ताची राव शिंदे.
याच्यात काही काळानंतर कर्नाटक भागामध्ये निजामाचे सैन्य व निजाम उपद्रव माजु लागला. त्याच्या बंदोबस्तासाठी पुण्याहून पेशव्यांनी आणि दत्ताजी शिंदे यांना सेनापती नियुक्त केले. यांनी निजाम यांचा बंदोबस्त करण्यासाठी रवाना केले. दत्ताजी शिंदे यांनी पराक्रमाची शर्थ करत शिंदखेड याठिकाणी निजाम सैन्य निर्णायक पराभव करून आपली तलवार गाजली. आणि पंचवीस लाख लूट आणि मुलुख व नळदुर्ग चा भुईकोट किल्ला मराठा अंमलाखाली आणला आणि या किल्ल्यावर भगवा ध्वज फडकू लागला. इथून दत्ताजी शिंदे हे शूर सरदार दत्ताजी शिंदे नावलौकिक झाले.

पुढे राजस्थान आणि गुजरात मध्ये मारवाड प्रांत बंदोबस्तासाठी दत्ताजीराव यांचे मोठे बंधू जयाप्पाराव शिंदे. हे दोन्ही बंधू हे मल्हारराव होळकर यांच्या सोबत मारवाड प्रांतवर मोहीम काढली पुढे काही काळात मारवाड राजा बिजेसिंग यांनी छळ-कपट यांनी जयाप्पाराव शिंदे यांची हत्या केली. ही वार्ता कळल्यानंतर आपले वडील बंधू मारले गेलेत हे दुःख त्यांना सहन होत नव्हतं.तेव्हा त्यांना एक सरदार( मल्हाराव होळकर असावेत? मी नक्की नाही सांगू शकत पण त्या वेळी मल्हाराव होळकर हेच दत्ताजी शिंदे यांना सावरून घेतले.कारण त्याच्या येवढा मोठा मातब्बर सरदार दुसरा कोणी न्हवता.त्या मुळे ही शक्यता आहे.) यांनी उदगारून काही वाक्य बोलले

” वैरी युद्धास आला आणि तू राडेसारखी रडतोस ? हे क्षत्रिय धर्मास उचित की काय ? आता मजला काही होत नाही. तुम्ही शत्रूपराभव करावा.”

असे वाक्य उदगारले नंतर दत्ताजीराव शिंदे यांनी दुःख बाजूला करून.मारवाड राजा बिजेसिंग युद्ध पुकारून त्याला धूळ चारून मारवाड राजा बिजेसिंग बरोबर तह करून अर्धा मुलूख त्याबात घेऊन उज्जैन कडे रवाना झाले. या मोहिमेमुळे मराठा साम्राज्याला 5 कोटी पेक्षा जास्त खंडणी मिळाली त्यामुळे मराठा साम्राज्याचा खजिना अधिक श्रीमंत होत गेला. यामुळे पुण्याचे नानासाहेब पेशवे यांचा विश्वास दत्ताजी शिंदे अधिक वाढला.

पुढे काही काळात महाराज दुर्जनसाल हे मरण पावले आणि त्याची राजकन्या या पण निपुत्रिक मरण पावल्या. त्या निपुत्रिक वारल्यामुळे त्यांच्या राज्यगादी वरून भांडण सुरुवात झाली. राणी दुर्गावती यांनी आपल्या चुलत घराण्यातील अजितसिह यांना दत्तक घेतले. त्यांना राज्यगादी बसण्यासाठी राणी दुर्गावती यांनी दत्ताजीराव शिंदे यांची मदत घेतली. आणि राणी दुर्गावती यांनी त्याना 40 (चाळीस लाख) रुपये दिले होते.

संदर्भ:
1.निजाम-पेशवे संबंध.
2.राजवाडे खंड 3.
3.पानिपत बखर.
4.भाऊसाहेबची बखर.
5. Net आणि विकिपीडिया

काही चूक झाली असेल तर कृपया माझ्या चुक मला दाखवून द्यावे आणि योग्य ते मार्गदर्शन करावे.

मोहित पांचाळ

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a comment