महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

दत्ताजी शिंदे व मल्हारबा समज गैरसमज

By Discover Maharashtra Views: 1249 2 Min Read

दत्ताजी शिंदे व मल्हारबा समज गैरसमज –

“आथ:पर या प्रांती कोठे एक क्षण न गुंतता मोठाल्या मजली करून गिलच्याचे पारिपत्यास जात असो.”

आजपर्यंतच्या इतिहास लेखक व कादंबरीकारानी शुक्रताल येथे झालेल्या दत्ताजी शिंदे यांच्या मुर्त्यु ला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मल्हारबांना दोषी धरले होते. परंतु त्या काळात अस्सल  साधने पुरेसे  उपलब्ध नसल्याने तसेच उत्तरकालीन लिहलेल्या बखरकारांवर जास्त विसंबून राहिल्याने असा गोंधळ झाल्याचा आपणांस दिसतो. परंतु नंतरच्या काळात अनेक अस्सल कागदपत्रे प्रकाशित झाल्याने ह्या जुन्या समजुतीना खो मिळाला आहे मात्र तरीही अनेक पानिपतकार कादंबरीवीर तीच री पुन्हा ओढत असल्याच स्पष्ट दिसून येते.दत्ताजी शिंदे व मल्हारबा समज गैरसमज. प्रत्यक्षात त्या वेळी घडलेली हकीकत सांगणारे  खुद्द मल्हारराव होळकर यांचेच पत्र प्रकाशित असून ते खालील प्रमाणे.

दि 1 जानेवारी 1760 मध्ये लिहलेल्या पत्रानुसार दत्ताजी शिंदे यांचे पत्र मिळाल्यावर ताबडतोब मल्हारराव आपल्या हातातील मोहिमा टाकून दत्ताजी यांची भेट घेण्यास निघाले असल्याचे दिसून येते. दत्ताजी शिंदे यांची  अब्दालीने निर्घृण हत्या 10 जानेवारी 1760 रोजी केली आणि दोन दिवसात म्हणजे 12 जानेवारी 1760 रोजी मल्हारबांनी जणकोजी शिंदे यांची भेट घेतली. या ठिकाणी शिंदे मंडळींच्या मदतीसाठी जाण्याचा आटोकाट प्रयत्न मल्हारबांकडून झालेला दिसतो. मल्हारबा आपल्या पत्रात म्हणतात ,

“आथ:पर या प्रांती कोठे एक क्षण न गुंतता मोठाल्या मजली करून गिलच्याचे पारिपत्यास जात असो.”

संदर्भ :
1) पेशवे दफ्तरतील निवडक कागद खंड 2 लेखांक 113
2) यशोधन य खु देशपांडे

संकलन – मधुकर हाक्के
मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ

Leave a comment