महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,76,645

चौगुला, चौगुले आडनाव नाही शिवकालीन पदवी!

By Discover Maharashtra Views: 6554 3 Min Read

चौगुला, चौगुले आडनाव नाही शिवकालीन पदवी!

छत्रपती शिवाजी महाराज च्या राजव्यवहार कोशात त्यांना” ग्रामणी ” असे म्हटले आहे . मुळ शब्द ” चौकुला ” म्हणजे चार कुळ बाळगणारा असा होते. चौगुले गावकीच्या काळातील पाटील चा साहाय्यक पाटलांचे अधिकृत प्रवक्ता ..सारावसुलीच्या कामात पाटलाला भरपुर साहाय्य करणार चौगुले होय. एखादा आदिलशाही व मघुलकडुन हल्ला नंतर परागंदा झालेल्या रयतेचा गावात परत आणण्याची कामगिरी व जबाबदारी चौगुले कडे असे.गोतसभेत त्यांना पाटलाला नंतरचे स्थान होते. शिवकालीन काही पत्रात देश चौगुला असे शब्द येते .चौगुले हे परगण्याचा अधिकारी. देश चौगुल्याला गावात मोठा मानचा असे.याचे निशाणी नांगर व “काठी” देखील आहे. यावरून जमिनीच्या क्षेत्रमापनाशीही त्याचा संबंध आहे . गावचा वसूल परगण्याच्या मुख्य कचेरीच्या पोत्यात अथवा खजिन्यात नेऊन भरण्याची जबाबदार चौगुले करीत असे .गावची कोठारे , अथवा खाजगी गुदामे, धान्याचे पेव यांची व्यवस्था ठेवण्याची कामही यांना करावे लागे .चौगुलेचा उल्लेख व इनामदार बद्दल .

जोहार मायबाप ऐका वचन! !
माणकोजी पाटलाने पाठविले हो न !!
मग चौगुल्यापाशी देऊन! !
जगज्जीवन परतले !!
चौगुले काय बोलती वचनं! तुम्ही महाराहाते पाठविले हो न !!
ते आम्ही सत्वरी घेऊन!!
पोते पाठविले राजव्दारी (राजे शिवरायाच्या स्वराज्यात असे उल्लेख समजवे )

गिरवीतील कदम घराण्यात गव गावाचे पाटीलकी सोबत चौगुलापण या घराण्यात होते.
चौगुले सामान्यत मराठा समाज तील असते पण छत्रपती शिवाजी राजे यांना एखाद्या व्यक्ती चे योग्यता .नेतृत्व व स्वराज्यावरील निष्ठा पाहुन काही ठिकाणी ब्राह्मण चौगुले (दाभोळ. हर्णे या भागातील ) शिंपी चौगुले, लिगायंत चौगुले., जैन चौगुले , माळी चौगुले , मुसलमान चौगुले(कोकणात ) पाथरूवट चौगुले (वडार समाज ) आढळतात.
तसेच गावातील वादविवाद, याचा हस्तक्षेप करावा लागत तसेच जमीन खरीद व्रिकी, न्यायनिवाडा, सरकारी अधिकारी म्हणून महत्वाचे स्थान चौगुला यास होते जो हिंदवी स्वराज्याचा निर्माता पासुन आहे. शिवकालीन कगदापत्रात चौगुले चा उल्लेख ” चौगुला ” असे आहे याचा नोंदी घ्या .चौगुले हे वतनदार पैकी शिवपुर्वी कालखंडात होते . 96 कुलतील 4था व चार कुंलचा मानकरी चौगुले हे आहेत सदर आडनाव नाही तर मानचा पदवी आहे व स्वराज्यातीद निष्ठावंत घटक . म्हणजे चौगुले हे आडनाव व लोक ….

सेवाशी ठाई व शब्दके न= संतोष झिपरे.
सदर लेख बदल आणखी माहिती आपणाकडे असेलतर मार्गदर्शन करावेत

1 Comment