महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,29,566

दुर्गम प्रदेशात तुमच्या कल्पनेचा घोडासुद्धा नाचवणे कठीण

By Discover Maharashtra Views: 2477 2 Min Read

दुर्गम प्रदेशात तुमच्या कल्पनेचा घोडासुद्धा नाचवणे कठीण –

माझ्या दुर्गम प्रदेशात तुमच्या कल्पनेचा घोडासुद्धा नाचवणे कठीण, मग तो प्रदेश काबीज करायची भाषा कशाला? भलत्याच खोट्या बातम्या लिहून बादशाहला पाठविण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही?”

औरंगजेब जेव्हा आपल्या सरदारांना आदेश पाठवत असे,

‘उस सीवा के किले और मुलुख काबीज करा.’ तेव्हा फुकाचा आत्मविश्वास बाळगलेले मुघलांचे सरदार म्हणत, की हो आम्ही लवकरच सारा मुलुख काबीज करू. या सर्व गोष्टींना महाराजांनी दिलेले हे उत्तर.. इसवी सन 1664-65 मध्ये शिवाजी महाराजांनी हे पत्र लिहिले.. पत्र कसले, मुघलांची लष्करी ऐपत आणि स्वराज्याची ताकदच दाखवून दिली.

आपली ताकद काय, हे मुघलांना समजावे म्हणून छत्रपती म्हणतात,

“अफझलखान जावळी मुलुखात फौज घेऊन आला आणि नाहक मृत्यूच्या मुखी पडला. हे सर्व प्रकार आपल्या बादशाहास का कळवत नाही तुम्ही ? अमिर उल उमराव शाहिस्तेखान आमच्या ह्या गगनचुंबी सह्याद्रीत व कातळ डोंगररांगात आणि पाताळास पोहोचणाऱ्या खोऱ्यात सारखा खपत होता.. म्हणत कि ‘सीवा चा पाडाव करून त्याचा प्रदेश काबीज करतो’ असे बादशाहकडे लिहून थकला. हा खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला.”

शाहिस्तेखानाला शिकवलेला धडा सूर्यप्रकाशाएव्हढा स्वच्छ असून तुम्हाला दिसत कसा नाही? हासुद्धा प्रश्न महाराजांनी मुघल अधिकाऱ्याला विचारला.

देशप्रेम, देश संरक्षण ‘राष्ट्रप्रथम’ ही भूमिका आम्हाला शिकवणारे छत्रपती शिवराय.. पत्राचा शेवट करताना दस्तुरखुद्द महाराज म्हणतात,

“आपल्या भूमीचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे, आणि त्यावर आक्रमण करणारा कधीही यशस्वी होऊ शकत नाही. मी आपले स्वकर्तृत्व बजावण्यास कधीही चुकणार नाही.”

पुढे जे घडलं, तो इतिहास आहे. अवघ्या 10 ओळींमध्ये मुघलांच्या अस्तित्वालाच धक्का देण्याचे सामर्थ्य या महाराष्ट्राच्या राजामध्ये होते. देशसंरक्षण करणे, हे आपले आद्यकर्तव्य आहे हीच शिकवण वेळोवेळी शिवरायांनी दिली आणि याचमुळे मराठ्यांचे साम्राज्य उदयास आले.

राष्ट्रनिर्माता म्हणून मान्यता पावणे, ह्याशिवाय दुसरं कोणतंही श्रेष्ठ विधिलिखित असू शकत नाही. शिवाजी महाराजांनी नेमके हेच करून दाखवले.

मर्यादेयं विराजते.

आम्हीच_ते_वेडे

फोटो साभार – अमर काळे

Leave a comment