महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,91,301

याच गावात गुप्तपणे वावरले छञपती…

By Discover Maharashtra Views: 3724 1 Min Read

याच गावात गुप्तपणे वावरले छञपती…

छञपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर (1700 )ताराबाई आणि राजसबाई यांच्यामध्ये गादीसाठी संघर्ष सुरु झाल्याने ताराबाईंनी आपला नातू जन्मताच निधन पावल्याची हूल उठऊन त्याला आपली मुलगी दर्याबाई निंबाजीराव निंबाळकर, पानगाव ता. बार्शी जि. सोलापूर याठिकाणी ठेवले. याकामी त्यांना तुळजापुरचे नारोजी भुते कदम यांनी मोठी मदत केली. 1745 ते 1750 अशी पाच वर्षे नातू रामराजे गुप्तपणे पानगावात वावरले.
दर्याबाईंचे पती निंबाजीराव नाईक निंबाळकर हे महाराणी सईबाईंचे बंधू साबाजींचे वंशज असुन त्यांनी पानगावात 300×300 फुट अष्टकोणी आकारात बांधलेला हत्ती तलाव आजही सुस्थितीत असून दुष्काळातही त्यात मुबलक पाणी आहे.

पुढे छञपती शाहूंचे निधन झाल्यानंतर 1750 ते 1777 पर्यंत छञपती रामराजांनी कारभार केला.यांच्याच काळात 14 जानेवारी 1761ला पानिपतचे युद्ध झाले. काहीकाळ निंबाजीराव निंबाळकर हे स्वराज्याचे सेनापती झाले. पुढे पानगाव पानसेंकडे दिल्याने निंबाळकर घराणे हे वैरागला स्थिरावले. रामराजेंच्या कारभारात दर्याबाईंचा वारंवार उल्लेख येतो. पानगावची वेस आणि हत्ती तलाव पाहिल्यानंतर छञपतींचे वास्तव्य आठवते…



माहिती साभार – Dr. Satish Kadam

Leave a Comment