महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,83,224

संभाजी राजांचे शौर्य

By Sonu Balgude Views: 3820 5 Min Read

संभाजी राजांचे शौर्य…

काही लोक आजही म्हणतात की शिवाजी महाराजांनी जेवढे कमावले ते संभाजी महाराजांनी फुकट घालवले.
अजूनही खूप लोकांचा हाच ग्रह आहे की संभाजी महाराज म्हणजे विलासी, व्यसनी अन रंगेल होते, फुटीर, सत्ताबुडवी राजपुत्र होते, स्वैराचारी होते, दुराचारी होते म्हणून.
अन जेव्हा औरंग्याने त्यांना पकडले तेव्हा त्यांचा छळ केला अन त्यांना मारले. एवढंच ठाऊक आहे लोकांना संभाजी महाराजांबद्दल??

अरे स्वराज्याचा दुसरा छत्रपती आहे, कल्याणच्या सुभेदाराची सून आईच्या मानाने माघारी पाठवणाऱ्या राजाचा पुत्र आहे, चाळीस दिवस औरंग्याच्या छावणीत अत्यंत क्रूर असा छळ अन हाल सहन केले त्यांनी, कशासाठी? कोणासाठी?

औरंग्याने त्यांना धर्मपरिवर्तन करण्याची ऑफर दिली होती, मग का नाही त्यांनी ऐकलं? का नाही झुकले त्याच्यासमोर?? कुठून आलं हे सगळं शौर्य, त्याग, धाडस, बलिदान करण्याची वृत्ती. अरे रंगेल असते तर कशाला ताठ मानेने उभे राहिले असते त्याच्या समोर, व्यसनी अन विलासी असते तर शरीराचे हे हाल सहन तरी केले असते का त्यांनी??

अरे झुकले असते नमले असते तर ऐश मध्ये जगले असते… मग का केलं असेल हे आत्मबलिदान. आजही त्यांची बदनामी करणाऱ्या आमच्यासारख्या हरामखोर लोकांसाठी.??? एवढ्या ज्वलंत तेजस्वी इतिहासाला आपण बदनामीच्या आगीत लोटाव हे त्या संभाजीराजांचे नाही, तर आपले दुर्दैव. आपण कसे एवढा वाईट विचार करू शकतो त्यांच्याबद्दल.

बर एवढं सगळं मानलं तरी पण हा विचार कधी कोणी करतो का की…..

ज्या शिवराय आग्ऱ्याला भेटीस गेले असताना औरंग्याने त्यांना फक्त कैदेत ठेवले होते,
मग संभाजी राजांचे एवढे अनन्वित हाल करण्याचे कारण काय असू शकते??
असे काय घडले असावे की औरंगजेब संभाजी महाराजांमुळे एवढा दुखावला असावा.?? त्यांना चाळीस दिवस त्याने कैद करून त्यांचे हाल हाल का केले असावेत?

शिवरायांनी औरंगजेबाची सुरत देखील दोन वेळा लुटली,
त्याचा मामा शाहिस्तेखान याची पुण्यात बोटे छाटली.
पण तरीसुद्धा औरंगजेबाने त्याचा बदला म्हणून जास्त काही केले नाही,
मग संभाजी राजांविषयी त्याच्या मनात एवढी चीड का असावी??? कारण संभाजी राजांनी औरंगजेबाच्या मग्रुरीला ठेचले होते, त्याचा अहंकार मातीत गाडला होता.

शिवरायांनी कधी बुऱ्हाणपूर व औरंगाबाद ला हात घातला नाही, पण राज्यभिषेकानंतर अवघ्या पंधरा दिवसात सुंदरीच्या गालावर तीळ शोभणारे बुऱ्हाणपूर लुटले, तेथील १८ व्यापारी पुरे उध्वस्त केले, एकही शिल्लक ठेवला नाही. त्यानंतर औरंगाबाद ला तडाखा दिला.
रामशेज सारखा छोटासा किल्ला कमी शिबंदी सह असा लढवला की शहाबुद्दीन खान, फत्तेखान, कासीमखान हे सरदार प्रचंड फौजफाटा घेऊन मोठ्या तोऱ्यात आले असताना जवळपास सहा वर्षे फक्त झुंजत राहिले, पराभूत होत राहिले, अन औरंगजेबाची नाचक्की होत राहिली.

१६८२ ला दस्तुरखुद्द औरंगजेब त्याच्या प्रचंड फौजेसह दख्खनवर चालून आला.
पण संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठे झुंजत राहिले. मराठे टकरा घेत राहिले.

संभाजी राजांनी विलक्षण युद्धनीती खेळली, औरंगजेब महाराष्ट्रात येताच मराठ्यांनी आपल्या फौजा सरळ मुघल प्रांतात घुसवल्या, कापाकापी केली, पुरती वाट लावली. त्या नीतीने औरंगजेबाच्या नजरा विस्फारून गेल्या.

औरंगजेबाने जंजिऱ्याचा सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज, चिक्कदेवराय यांना फितवून, उकसवून मराठ्यांवर चाल करायला लावले, पण या सगळ्या शाह्यांना, परिणामी औरंग्याच्या पदरी फक्त आणि फक्त पराभवच आला.
मोठी नामुष्की झाली.
एवढे अफाट सैन्य असूनही आपण संभाजी राजांना हरवू शकत नाही त्यामुळे औरंगजेब पुरता वैतागला, चरफडत राहिला,संतापला.

औरंगजेब आपल्याच सरदारांवर बरसत राहिला.
“क्या करते हो बंदोबस्त, खिल्लते पहन के खाली मार खाते हो. इतनी फौज दी दिमत मे, कहा गयी? कहा गया वो दख्खन का चुहा?”
सरदारानी उत्तरे दिली की “हुजूर वो बेबाक संभा सैतान है.”

स्वराज्याच्या सीमा तब्बल पाच पटींनी वाढवल्या.

शहाआलम, हसन अली खान, रणमस्त खान, बहादूरखान, कासीमखान यांना तुडव तुडव तुडवले.
एक २५-३० वर्षाचा पोरगा आपल्याला एवढा त्रास देतो, नाचक्की केरतो हे औरंगजेबाला जणू सहनच झाले नाही.
तो सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरला. हे साहस कोणाचं, हा पराक्रम कोणाचा, हे धाडस कोणाचं होत,
तर सर्जा संभाजी महाराजांचं.
त्रिवेंद्रम, त्रिचीनापल्ली, मद्रास, तंजावर, पाषाणकोट केरळ, आंध्रप्रदेश कुठवर कुठवर मजल मारली होती.

संभाजी राजांच्या या धगीने औरंगजेब हैराण झाला.

औरंगजेबाला वाटायचं संभाजी म्हणजे शिवाचा नादान अन तख्तनशील वारस. अनुमान तर बदलून घ्यावच लागलं. अरे शिवाजी राजपेक्षा दहा पटींनी हा संभाजी राजा तापदायक आहे हे त्याला उमगले.

शेवटी औरंगजेबाने आपल्या डोईवरची बादशाही पदाची पगडी डोक्यावरून खाली ठेवली. आणि म्हणाला, “जब तक उस संभा को गिरफतार नही करता, उसे मार नही देता, ये दख्खन पर मुघल सलतनत का झंडा नही लहराता टब तक ये बादशाही पगडी हम नही पेहनेंगे.”

शेवटी इथंच मेला औरंगजेब, पण मरेपर्यंत त्याला हे भाग्य लाभलंच नाही. दख्खन मधील एक खण सुद्धा त्याला जिंकता नाही आला.

राजांना कैद करताना सुद्धा औरंगजेबला कपटी डावच खेळावा लागला. त्यानेही मान्य केलं होतं जणू संभाजीला आपण उघड्या मैदानात पराभुतच करू शकत नाही.

अशा या महापराक्रमी छाव्याला मानाचा मुजरा.

माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील

Leave a comment