भादसकोंड लेणी

भादसकोंड लेणी

भादसकोंड लेणी –

ताम्ह्मणी घाटातील कैलासगडा च्या पोटात असलेली भादसकोंड लेणी ही गुहा लेणी फारसी परिचीत नाही. कैलासगडाच्या पुढे एक किमी.वर ही लेणी एका डोंगरात काताळात कोरली आहे. डोंगराच्या पायथाल्याच एक गावाच अनगड देवता च मंदिर असुन त्याच्या बरोबर मागच्या बाजुला हि लेणी आहे. या लेणी ला जायला मळलेली पायवाट नसून आपणच आपण वाट बनवत जायच.आपला भटकंतीचा अनुभव पणाला लावत लेणी शोधावी. थोड्याशा जंगलातून रस्ता शोधत आपण एका कातळा समोर येतो.येथुन पुढे रॉकप्याच मारत गुहेच्या तोंडापाशी येउन पोहचतो .गुहा प्रशस्त असुन दोन भागात विभागली गेली आहे.गुहेची उंची फार नसुन माणूस नीट उभा पण राहू शकत नाही.

गुहेच्या उजव्या बाजुला ह्याच गुहेला प्रमाणशीर खोदुन आतमध्ये ध्यान धारणे साठी विहार खोदले आहे.कधी काळी बौध्द भिक्षुक याचा वापर करीत असावे . गुहेत माणसांचा वावर फार कमी असल्याने आत मध्ये बरीच घाण साठली आहे. येथे स्वयंपाका साठी चुली पेटवल्या मुळे धुराने गुहेचे छत काळे पडले आहे.

ही गुहा स्वच्छ केली तर एक सुंदर गुहा,लेणी जतन केली जाईल. कैलासगडा बरोबर आनेक ट्रेकर्स या लेणीला बघायला येतील. एक वेळ तरी पाहुन घ्यावी अशी ही लेणी वजा गुहा पाहावी.एक वेळ तरी पाहुन घ्यावी अशी ही लेणी वजा गुहा पाहावी.

टिप – वाट सापडत नसल्यास स्थानिक माणसांची मदत घ्यावी. लेणी फार उंच नसुन केलासगडा बरोबर  हिचा ही अनुभव घ्यावा.

संतोष चंदने चिंचवड ,पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here