तळोदा येथील बारगळ गढी

तळोदा येथील बारगळ गढी

तळोदा येथील बारगळ गढी.

ही ३६० वर्ष जूनी आहे बारगळ गढीचे बांधकाम भोजराज बारगळ यांनी १६६२  साली लावले होते. हे काम एकूण  ७ वर्ष चालले होते, या गढीचा ८ फुट खोल बीम आहे. गढीचे बांधकाम एकूण ६ एकर जागेत पसरले आहे. ही गढी तापी नदिपासून ३.४ किलोमीटर व सातपुडाच्या पायथ्याशी आहे. गढीचे कारागीर हे राजस्थान हून बोलावले होते, राजस्थानी व मराठा शैलीत गढीचे काम झाले आहे, आजुबाजूच्या ७ गावांना येथे वस्तीसाठी आणले होते,तळोदा हे १६ व्या शतकात एक खेड गाव होत.

बारगळ हे मुळ नगर जिल्ह्यातले होते प्रथम शिवाजीराव बारगळ येथे आले. प्रथम ते सुल्तानपुर येथे थांबले. सुल्तानपुर हे ८०० वर्षापासून तालुका व परगणा होते नंतर ते तळोदा येथे आले. इथे सातपुडयाच्या रांगेत वसलेल्या अक्राणी येथील गडमुंजा संस्थानचे राजपूत राजे यांच्या सेवेत ते रुजू झाले राज्याच्या सिमेचे रक्षण करण्यासाठी बारगळ यांना तळोदा येथे गढी बांधून देण्यात आली.

या गढीचा अजुन एक उज्वल इतिहास म्हणजे भोजराज बारगळ हे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सख्खे मामा मल्हाररावांचे वडील लहानपनीच गेल्याने भोजराज यांनी बहिणीचा व भाच्याचा सांभाळ केला.मल्हाररावांचे संपूर्ण बालपण याच गढ़ीत गेले. पुढे त्यांना भोजराज यांनी २५ घोडयांचे शिलेदारी पथक तयार करून तोरखेडचे सरदार कदमबांडे यांच्या मनसबदारीत रुजू केले व तिथेच पेशव्यांनी त्यांचा पराक्रम पाहुन त्यांना आपल्याकड़े मागून घेतले मल्हाररावांना भोजराज बारगळ यांनी आपली कन्या दिली व याच गढित त्यांचे लग्न लावले,पुढे नारायणराव भोजराज बारगळ हे राजपुताना येथील राजा संग्रामसिंह व देवसिंह यांच्या सेवेत रुजू झाले. तिथे त्यांना बूढा परगणा जहागीरीत भेटली. त्याचे त्यांनी दोन भाग केले एक मल्हाररावांना दिले त्याचे नाव मल्हारगड व एक स्वतकडे ठेवले त्याचे नाव नारायणगड ..

तळोदा हे कसबे गाव तसे तळोदयाचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्व ही मोठे आहे. सध्या या गढीत बारगळांच ९  वे वंशज श्रीमंत अमरजीतराव बारगळ हे असतात तसेच हृषिकेश बारगळ हे त्यांचे भाऊबंद ही असतात. अमरजीत बारगळ हे मराठा साम्राज्यातिल सर्व संस्थानीक यांची जी राजघराणे संघटना आहे जिचे अध्यक्ष तंजावरचे भोसले आहेत तीचे उपाध्यक्ष अमरतजीत बारगळ हे आहेत व पेशव्यांचे वंशज हे कार्यध्यक्ष आहेत.. सावरकरांनी बारगळ जहागीरदार यांना भेट म्हणून दिलेली त्यांची टोपी

तळोदा महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील छोटे शहर आहे. हे शहर तळोदा तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. तळोदा – उत्तरेकडे विस्तीर्ण सातपुडा पर्वताच्या रांगा तर दक्षिणेकडे तापी नदिचे विस्तारलेले पात्र यात वसलेले तळोदे हे शहर. तळोदे शहराला स्वतःचा सांस्कृतीक, सामाजिक असा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे तळोदे, पहेलवानकीने गाजणारे तळोदे अशी तळोद्याची पहेचान आहे. क्रीडा, कला, शिक्षण व राजकीय क्षेत्रात तळोद्याचा नाव लौकीक आहे. तालुक्यात आदिवासी बांधवांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. सन १६६२ मध्ये जहागिरदार भोजराज बारगळ यांनी गढीचे बांधकाम केले. त्यासाठी सात ठिकाणाहून माती आणण्यात आली. सलग पाच वर्षे बांधकाम सुरु होते.

सहा एकर जागेत बारगळांची गढी वसलेली आहे. गढीचे प्रवेशद्वार पाहण्यासारखे आहे. त्यावरील कोरीव काम अप्रतिम असे आहे. तळोदा गाव बारगळ जहागीरदारांना इनाम म्हणून प्राचीनकाळी मिळालेले. त्यामुळे या परिसरावर संस्थानिक बारगळ जहागीरदारांचे वर्चस्व. त्यामुळेच संस्थानिक राणा मानसिंग यानी शिवाजी बारगळ यांचे पुत्र भोजराज याना तळोदे हे गाव इनाम दिले. कालांतराने बारगळ व संस्थानिकात वाद निर्माण झाले. त्यांचे पर्यावसान युद्धात होऊन बारगळानी पूर्ण संस्थान काबिज केले. पुढे समजोता होऊन हे संस्थान परत करण्यात आले व लढाईच्या खर्च्याबद्दल बारगळाना तळोदा गावाची हद्द वाढवून मीळाली.

राणानी बारगळाच्या पत्नीस बहिन मानले व या नात्याने दोन्ही घरातच कायमस्वरूपी स्नेहभाव निर्माण झाला. तळोदा शहरात श्रीमंत बारगळ जहागीरदारांची वैभावाची साक्ष असून प्राचीन गढ़ी आहे. या गढीचा काही भागाच्या आता पड़झड झाली असली तरी काही बांधकाम अजूनही शाबूत आहे. भोजराज बारगळ यानी १६६२ मधे या ऐतिहासिक वास्तुच्या बांधकामाला सुरुवात केली. पुढे त्यांचे पुत्र नारायणराव बारगळ यांनी गढीच्या कमानी दरवाजा बांधला. सुमारे सहा एकर परिसरात या ऐतिहासिक गढीचे बांधकाम झाले असुन हे बांधकाम पाच वर्ष चालले. बारगळ जहागीरदारांच्या घराण्यातील त्यांचे वंशज सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अमरजीतराव शिवाजीराव बारगळ व त्यांचे इतर आप्तेष्ट आजही या ऐतिहासिक गढीत राहतात.

१९५२ पर्यंत तळोदयाचे प्रशासन हे बारगळ जहागीरदार यांच्या नियंत्रणाखाली चालायचे. जहागीरदार व गावाचे कामकाज चालवीण्यासाठी एक दिवाण सहा कारकुन असायचे. त्यापैकी दोन कारकुन हे त्यांच्या खाजगी कारभार पहायचे तर चार कारकुन जहागीरदारीचे कामकाज, हिशेब, वसुलीचे काम पहायचे. शिवाय बाहेरच्या प्रशासकीय कामासाठी दोन पाटील होते. मुलकी पाटिल पोलीस पाटील ही दोन्ही पदे त्या वेळी होती. मुलकी पाटलाचे पाच वतनदार घराणे होते. मगन गनपत पाटील, गोविंद कडवा पाटील याप्रमाणे. प्रत्येक पाटीलला २७ एकर जमीन त्या वेळी उत्पनासाठी मीळायची. शिवाय ज़माबंदी दरबारात मुलकी पाटलाला ६९ रुपये १० आणे फेटा, पागोटे, उपरणे, पान-सुपारीचा मान मीळायचा.

पोलीस पाटलाला वर्षाला ५७ रुपये ६ आणे फेटा पागोटे, उपरणे, वेताची काठी हां मान मीळायचा. याशिवाय १६ मील कामदार, वनदार (जागले), चार महार कामदार, एक कोळी कामदार वतनदार होते. या कामदारानाही त्यांचा कामापोटी वतन दिले जायचे. येथील हल्लीचे बारगळ जहागीरदार अमरजीतराव बारगळ यांचे पणजोबा कृष्णराव आनंदराव बारगळ आजोबा शंकरराव कृष्णराव बारगळ यांच्या पीढ़ीपर्यंत दि: १-८-१९५३ पर्यंतताळोद्यात ही प्रशासन यंत्रणा बारगळ जहागीरदारांकडे सुरु होती. त्यानंतर ताळोद्यात शासकीय कारभार इनाम ॲंबॉंक्युशन ॲंक्ट आला व शासनाकडे कारभार आला त्यानंतर तळोदयात शासकीय कारभार सुरु झाला. सन १८६७ चा गॅंझेतेड रिपोर्ट व बारगळ जहागीरदार संस्थानचे जुने ऐतिहासिक दस्तावेज व कागदपत्राच्या नोंदीत या प्रशासकीय प्रणालीचा उल्लेख आहे.

माहिती लेखन – प्रसाद पाठक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here